जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
दळणवळण

कोपरगाव तालुक्यातील…या रस्त्यांसाठी मोठा निधी !

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव विधान मतदार संघातील रस्त्यांचीमोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली होती.त्यासाठी कोपरगावातून आ.काळे यांचा राज्यसरकारकडे पाठपुरावा सररू होता त्याला नूकतेच यश आले असून राज्यातील महाविकास आघाडी सरकारने ग्रामीण भागातील रस्त्यांसाठी ५ कोटी निधी मंजूर केला असल्याची माहिती श्री.साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना.आशुतोष काळे यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.

कोपरगाव मतदार संघात प्रचंड प्रमाणात सुरु असलेला वाळू उपसा,समृद्धी महामार्गाचे सुरु असलेले काम या मुळे तालुक्यातील रस्त्यांची मोठ्या प्रमाणावर दुरावस्था झाली होती.त्यासाठी पाठपुरावा करणे गरजेचे होते.राज्यात आघाडी सरकार स्थापन झाल्यावर या कामास लोकप्रतिनिधी आ.आशुतोष काळे यांनी पाठपुरावा सुरु केला होता.त्याला यश येताना दिसत असून त्याची प्रचिती येऊ लागली आहे.वर्तमानात आघाडी सरकारने त्यास दुजोरा दिला आहे.

गत अडीच वर्षात अडचणीच्या कोरोना साथीच्या काळात मतदार संघातील रस्त्यांसाठी १४० कोटी रुपये निधी मिळाला आहे.महाविकास आघाडी सरकारने पुन्हा एकदा ग्रामीण भागातील रस्त्यांसाठी ५ कोटी निधी दिला असून आजपर्यंत १४५ कोटी निधी रस्त्यांसाठी मिळाला आहे.
मिळालेल्या ५ कोटी निधीतून मतदार संघातील रस्त्यांचे खडीकरण व डांबरीकरण करण्यात येणार आहे.
या मंजूर रस्त्यामध्ये कारवाडी वडाची वाडी येथील भास्करराव गायके वस्ती ते मारुती मंदिर,संदीप भोसले घर ते नानासाहेब तनपुरे वस्ती,मंजूर रा.मा.७ ते हंडेवाडी दादासाहेब गावंड वस्ती,नारायण गावंड वस्ती ते दादासाहेब मोरे वस्ती,दौलत मोरे वस्ती ते विठ्ठलराव तिरसे वस्ती,मारुती मंदिर ते एकनाथ तिरसे वस्ती आदी कामांचा समावेश आहे.

तर माहेगाव देशमुख चारी नं.६ ज्ञानेश्वर खैरनार वस्ती ते सुनील जाधव वस्ती,चारी नं.५ कदम वस्ती (शासकीय विहीर) या रस्त्याचा समावेश आहे.तर कोळपेवाडी शिव,चारी नं.५ ग्रा.मा.३० ते कुंभारी शिव गोकुळ घुले घर,चांदगव्हाण ईजीमा १६० शिवाजी बाचकर वस्ती ते सुहास शिंदे शेत आदींचा समावेश आहे.
कुंभारी ग्रामपंचायत हद्दीत प्र.जि.मा.८५ डॉ.कोपरे ते विजय कारभारी कदम घर या एकमेव कामाचा समावेश आहे.तर डाऊच बु.ग्रामपंचायत हद्दीत मच्छिंद्र दहे घर (चौफुली) होन वस्ती ते अर्जुन दहे घर या कामाचा समावेश आहे.
मढी बु.हद्दीतील रा.मा.७ गवळी वस्ती ते ग्रा.मा.चारी नं.७,कोळपेवाडी माहेगाव शिव चारी नं.५ ते इजिमा १ पर्यंत शिव रस्ता या कामाचा समावेश आहे.
याशिवाय कोळपेवाडी हद्दीतील माहेगाव शिव चारी नं.५ ते चारी नं.६ शिव रस्ता आदी रस्त्याचा समावेश आहे.
धोत्रे ग्रामपंचायत हद्दीतील शिवाजी आगवन शेत ते दत्तात्रय जामदार शेत या कामाचा समावेश आहे.
याशिवाय भोजडे शिवनाथ दिघे घर ते विक्रम सिनगर घर या रस्त्याच्या कामाचा समावेश आहे.
कोकमठाण येथील पुणतांबा रोड ते रमेश वाघ घर,वारी देवी मंदिर ते अनिल जाधव घर, कोकमठाण बारवाचे आळे ते राजेंद्र देशमुख घर या तीन रस्त्याचा समावेश आहे.
लौकी हद्दीत गाव ते कोटकर वस्ती या कामाचा समावेश आहे.
उक्कडगाव येथे जनार्दन स्वामी मंदिर ते आण्णा निकम घर (सुरेगाव रोड),कासली येथील दत्तात्रय मलिक घर ते बाबासाहेब सुंबे घर या कामाचा समावेश आहे.
गोधेगाव हद्दीत गोधेगाव ते कासली शिव रस्ता (हाडळ रस्ता) तर तिळवणी दगू शिंदे घर ते विष्णू वाघ घर,पढेगाव संवत्सर शिव रस्ता (जुना कॅनॉल)ते म्हसोबा वस्ती,ओगदी निवृत्ती पोळ घर ते राजाराम गोणटे घर,अंचलगाव लक्ष्मीमंदिर पासून शेख वस्ती ते दिलीप यंडाइत घर,मढी खु.जगन गवळी घर ते कैलास गवळी घर,देर्डे कोऱ्हाळे बाळू घाडगे घर ते नानासाहेब शिंदे घर आदींचा समावेश आहे.
जवळके हद्दीत शांताराम दरेकर घर ते गणेश थोरात घर,जवळके दगुबाई थोरात घर ते तलाठी कार्यालय जवळके या कामांचा समावेश आहे.
पोहेगाव हद्दीत के.बी.रोहमारे घर ते संतोष वाके घर,देर्डे चांदवड गणपत गुंड घर ते रामचंद्र कोल्हे घर,चांदेकसारे नबाजी नन्नवरे घर ते दौलत आहेर घर,डाऊच खु.नारायण पुंगळ पाण्याची टाकी ते विक्रांत रोहमारे पोल्ट्री,डाऊच खु.विक्रांत रोहमारे पोल्ट्री ते रमेश रोहमारे घर,जळगाव–वाकडी-जळगाव रस्ता ते ज्ञानदेव आदमाने घर,जळगाव–वाकडी-जळगाव रस्ता ते दिनकर औताडे घर,वाकडी म्हसोबा मंदिर ते सोमनाथ लांडे घर,वाकडी श्रीराम मंदिर ते संतोष लांडे घर आदी कामाचा समावेश आहे.
पुणतांबा येथील धन्वंतरी पतसंस्था कार्यालय ते संजय शेळवंटे घर,पुणतांबा अनिल उदावंत घर ते सचिन थोरात घर,रामपूरवाडी चांगदेव सांबारे घर ते शिवाजी जगताप घर,रामपूरवाडी संपत शेळके घर ते शाम जगताप घर,मढी बु.रेवजी गवळी शेत ते मारुती मोकळ घर,मढी बु.एकनाथ गवळी शेत ते स्मशानभूमी मढी बु.,मढी बु.उंबरी नाला ते संभाजी आभाळे घर या रस्त्यांसाठी प्रत्येकी १० लाख रुपये मंजूर झाले आहे.
तसेच संवत्सर येथील शांताराम गायकवाड घर ते दिलीप बोरनारे वस्ती या रस्त्याच्या खडीकरण व डांबरीकरणसाठी २० लाख रु.असा एकूण ५ कोटी निधी मंजूर करण्यात आला आहे. त्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,उपमुख्यमंत्री अजित पवार,ग्रामविकास ना.हसन मुश्रीफ यांचे ना.आशुतोष काळे यांनी आभार मानले आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close