जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
दळणवळण

पावसाळ्यापूर्वी रस्त्याची कामे पूर्ण करा-कोपरगाव राष्ट्रवादीची मागणी

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी)

कोपरगाव शहरातील नागरिकांना येणाऱ्या पावसाळ्यात खराब रस्ते तसेच स्वच्छता विभागाच्या रखडलेल्या कामांचा त्रास होवू नये यासाठी मंजूर करण्यात आलेली विकासकामे पावसाळ्याच्या आत पूर्ण करावी अशी मागणी कोपरगाव शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने नूकतीच करण्यात आली आहे.

“कोपरगाव शहरातील प्रमुख विकासकामे पावसाळ्याच्या पूर्ण होणे गरजेचे आहे.कोपरगाव शहरवासियांच्या विकास कामांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आ.काळे यांच्या माध्यमातून कोपरगाव शहराला कोट्यावधी रुपयांचा निधी प्राप्त होत आहे”-सुनील गंगूले,शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस.

कोपरगाव शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी मंजूर विकासकामे पावसाळ्याच्या आत पूर्ण करण्यासंदर्भात कोपरगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांना निवेदन देण्यात आले.दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की,”कोपरगाव शहरातील प्रमुख विकासकामे पावसाळ्याच्या पूर्ण होणे गरजेचे आहे.कोपरगाव शहरवासियांच्या विकास कामांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आ.काळे यांच्या माध्यमातून कोपरगाव शहराला कोट्यावधी रुपयांचा निधी प्राप्त होत आहे.कोपरगाव शहराच्या विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या असणाऱ्या विकासकामांच्या निविदा पाशवी बहुमताच्या जोरावर नामंजूर करण्यात आल्या होत्या.त्या निविदा जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या अधिकारात कलम (३०८) अन्वये मंजूर करून कोपरगाव शहरवासीयांना न्याय दिला आहे. कोपरगाव शहराच्या विकासाचे उद्दिष्ट्य डोळ्यासमोर ठेऊन आ.आशुतोष काळे यांनी हि विकास कामे मंजूर केली असून हि विकास कामे पावसाळ्याच्या आत लवकरात लवकर पूर्ण होणे गरजेचे आहे. त्यामुळे नागरिकांना दरवर्षी पावसाळ्यात सामोऱ्या जावे लागणारा त्रास कमी होणार आहे. त्यासाठी कोपरगाव शहरातील रस्ते,गटार दुरुस्ती,स्वच्छता विभागाची कामे,पाणी पुरवठा विभागाचे जे काही विकासकामे मंजूर करण्यात आली आहेत ती विकासकामे पावसाळ्याच्या पूर्ण करावीत व जी विकासकामे प्रगतीपथावर आहेत ती कामे देखील पावसाळ्याच्या आत पूर्ण कशी होतील याबाबत संबंधित ठेकेदाराला सूचना कराव्या अशी मागणी दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष सुनील गंगूले,नगरसेवक गटनेते वीरेन बोरावके,मंदार पहाडे,राजेंद्र वाकचौरे,गौतम सहकारी बँकेचे संचालक सुनील शिलेदार आदी उपस्थित होते.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close