गुन्हे विषयक
कोपरगावात आजही कोरोनाचे तीन ‘बळी’
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यात आज एक अखेर १० हजार ३४७ बाधित रुग्ण आढ आढळले असून त्यातील १ हजार १३३ रुग्ण सक्रिय आहे.तर आज पर्यंत १४७ जणांचा बळी गेला आहे.त्याचे प्रमाण टक्केवारीत १.४५ टक्के आहे.तर आज अखेर एकूण ४१ हजार ९६० नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे.त्याची दर दहा लाखाला आकडेवारी ०१ लाख ६७ हजार ८४० इतकी आहे.त्याचा बाधित दर हा २४.१८ टक्के आहे.तर आज अखेर उपचारानंतर ८ हजार ८६६ रुग्ण बरे झाले आहे.त्यांचा आकडेवारीत दर ८७.३८ टक्के असल्याची माहिती कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी कृष्णा फौलसुंदर यांनी दिली आहे.
नगर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या ०२ लाख ०२ हजार ८१६ झाली असून सक्रिय रुग्ण संख्या २४ हजार ४५२ झाली आहे.तर आज अखेर पर्यंत ०१ लाख ७६ हजार ०७६ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहे.तर ०२ हजार २९० रुग्ण आतापर्यंत दगावले आहे.कोरोना संच तूर्त उपलब्ध झालं असले तरी आगामी काळात शासकीय स्तरावरून ते केंव्हा मिळणार याकडे नागिकांचे लक्ष लागून आहे.रुग्णवाढीला उतार आला असला तरी मृत्युदर मात्र धक्कादाक पद्धतीने वाढला आहे.त्यामुळे आता कोपरगाव शहर येत्या १५ मे पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.