जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
पर्यटन व तीर्थक्षेत्र

तीर्थक्षेत्राचे काम संथगतीने सुरू,…यांनी केली नाराजी व्यक्त !

न्यूजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी)
  
   कोपरगाव तालुक्यातील माहेगाव देशमुख येथील तीर्थक्षेत्र विकास योजने अंतर्गत सुरु असलेल्या श्री दत्त देवस्थानच्या विविध विकास कामांची आ.आशुतोष काळे यांनी नुकतीच पाहणी केली असून त्यांनी संथगतीने काम सुरु असल्याबद्दल नाराजी व्यक्त करून सुरु असलेल्या कामाला गती द्या अशा सूचना संबंधित ठेकेदाराला दिल्या असल्याची माहिती हाती आली आहे.

माहेगाव देशमुख येथील तीर्थक्षेत्र विकास योजनेची पाहणी करताना आ. काळे.

  श्री दत्त देवस्थानच्या विकासकामांच्या पाहणीनंतर त्यांनी जनसुविधा योजने अंतर्गत सुरू असलेल्या स्थानिक स्मशानभूमीच्या कामाची पाहणी केली.या कामासाठी आ.आशुतोष काळे यांनी २० लाखांचा निधी उपलब्ध करून दिला आहे.हे काम दर्जेदार करून वेळेत पूर्ण करावे अशा सूचना संबंधितांना केल्या आहेत.

     माहेगाव देशमुख येथील तीर्थक्षेत्र ‘क’ वर्ग दर्जा असलेल्या श्री दत्त देवस्थान परीसरात विविध विकास कामे सुरू आहेत.या विकास कामांसाठी आ.काळे यांनी ५० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे.जनसुविधा योजनेअंतर्गत सुरू असलेल्या स्मशानभूमीच्या कामाची आ.काळे यांनी माहेगाव देशमुख ग्रामस्थ व देवस्थान ट्रस्टच्या सदस्यांसमवेत पाहणी करून सुरु असलेल्या कामाची ग्रामस्थ व ठेकेदाराकडून माहिती जाणून घेतली आहे.

जनसुविधा योजनेअंतर्गत सुरू असलेल्या स्मशानभूमीच्या कामाची आ.काळे यांनी माहेगाव देशमुख ग्रामस्थ व देवस्थान ट्रस्टच्या सदस्यांसमवेत पाहणी केली आहे.

   त्यावेळी संबंधित ठेकेदाराला श्री दत्त देवस्थान येथे येणाऱ्या भाविकांसाठी विशेषत: महिला भाविकांसाठी चांगल्या दर्जाच्या व दीर्घकाळ टिकतील अशा सोयी सुविधा निर्माण करा.स्वच्छतागृह तसेच इतर विकास कामे करतांना कोणतीही उणीव किंवा त्रुटी राहणार नाही याची काटेकोर दक्षता घ्यावी.सुरू असलेल्या घाटाचे बांधकाम अतिशय धीम्या गतीने सुरू असून त्या कामाला गती देवून हे काम वेळेत पूर्ण करावे असे आवाहन केले आहे.

   या पाहणी प्रसंगी श्री दत्त देवस्थान ट्रस्टचे सदस्य,पदाधिकारी,शासकीय अधिकारी व संबंधित ठेकेदार गावचे सरपंच,उपसरपंच,ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

   श्री दत्त देवस्थानच्या विकासकामांच्या पाहणीनंतर त्यांनी जनसुविधा योजने अंतर्गत सुरू असलेल्या स्थानिक स्मशानभूमीच्या कामाची पाहणी केली.या कामासाठी आ.आशुतोष काळे यांनी २० लाखांचा निधी उपलब्ध करून दिला आहे.हे काम दर्जेदार करून वेळेत पूर्ण करावे अशा सूचना त्यांनी संबंधित ठेकेदाराला व प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close