तंत्रज्ञान
चीनमध्ये इलेक्ट्रिक विमानाची यशस्वी चाचणी
संपादक-नानासाहेब जवरे
वृत्तसंस्था /शेनयांग
चीन हा देश अजब गोष्टीचा शोध घेण्यात नेहमीच पुढे असल्याचे विविध उत्पादन निर्मितीमधून समोर येत असते. त्यात कमी किमतीत अधिकच्या सुविधा असणारे स्मार्टफोन, अन्य इलेक्ट्रिक उत्पादने सादर करण्यात माहिर असल्याचे पहावयास मिळत आहे. सध्या चीनने आपले पहिले चार सीटर इलेक्ट्रिक विमानाची निर्मिती केली असून त्याचे यशस्वी उड्डाणाची चाचणी नुकतीच पूर्ण केली आहे.
चाचणी घेतलेल्या विमानाचे वजन 1200 किलोग्रॅम असून 8.4 मीटर लांब आहे. तर त्याचे पंख 13.5 मीटर आहेत. विशेष बाब म्हणजे या विमानाला एका वेळी चार्ज केल्यानंतर ते 300 किलोमीटर उड्डाणाची क्षमता त्यांच्यामध्ये आहे. एक उड्डाण 90 मिनिटापर्यंत घेण्याची शक्ती त्यामध्ये असल्याची माहिती न्यूज एजन्सीज शिन्हुआ यांनी दिली आहे.
वजनाने अगदी पातळ असलेल्या विमानाची निर्मिती करताना त्याचे पार्ट्स कार्बनपासून तयार केले आहेत. त्यामुळे त्यांचे वजन सामान्य विमानांपेक्षा कमी आहे. या विमानाची यशस्वी उड्डाणाची चाचणी चीनमधील उत्तरेकडील शहर शेन्यांग येथे घेतली आहे.