तंत्रज्ञान
कोपरगाव तालुक्यातील विद्यार्थी अहिरे राष्ट्रीय संशोधन परिक्षेत द्वितीय

जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
जळगाव येथील गांधी रिसर्च फौंडेशन व मराठी विज्ञान परिषद मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या राष्ट्रीय नवसंशोधन परीक्षेत कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव येथील श्री.ग.र.औताडे पाटील विद्यालयातील इयत्ता नववीतील विद्यार्थी आदित्य अशोक अहिरे याने “आम आदमी हिटर” हे उपकरण सादर करून राष्ट्रीय पातळीवर द्वितीय क्रमांक पटकावला आहे.त्याच्या या यशाचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
भारतीय विज्ञान अणू शास्रज्ञ डॉ.अनिल काकोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली परीक्षण समितीने या प्रयोगाचे परीक्षण करून आदित्य अहिरे यास आठवी ते दहावी गटात राष्ट्रीय पातळीवर द्वितीय क्रमांक घोषित केला आहे.व त्याला रोख एकवीस हजार रुपयांचे पारितोषिक प्रदान केले आहे.
जळगाव येथील गांधी रिसर्च फौंडेशन व मराठी विज्ञान परिषद मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या राष्ट्रीय नवसंशोधन परीक्षा नुकतीच आयोजित केली होती.त्यासाठी संपूर्ण भारतातून इयत्ता पाचवी ते सहावी अशा दोन गटातून ०१ हजार ९५० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता.भारतीय विज्ञान अणू शास्रज्ञ डॉ.अनिल काकोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली परीक्षण समितीने या प्रयोगाचे परीक्षण करून आदित्य अहिरे यास आठवी ते दहावी गटात राष्ट्रीय पातळीवर द्वितीय क्रमांक घोषित केला आहे.व त्याला रोख एकवीस हजार रुपयांचे पारितोषिक प्रदान केले आहे.
ऑनलाइन झालेल्या बक्षीस वितरण प्रसंगी डॉ.अनिल काकोडकर,नॅशनल इनोव्हेशनचे विपिनकुमार,गुजरात विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ.सुदर्शन अय्यंगार आदी मान्यवर उपस्थित होते.
त्याच्या या यशाचे रयत शिक्षण संस्थेच्या सल्लागार समितीचे उत्तर विभागाचे प्रमुख आ.आशुतोष काळे,रयत शिक्षण संस्थेचे सहसचिव प्राचार्य संजय नागपुरे, विभागीय अधिकारी कन्हेरकर,पोहेगाव शाळा समितीचे सदस्य उत्तमराव औताडे,माध्यमिक विद्यालयाचे मुंख्याध्यापक काकासाहेब गवळी,त्याच्या मार्गदर्शक शिक्षिका श्रीमती एस.व्ही.बागुल,वर्गशिक्षिका पवार मॅडम,पर्यवेक्षक बांगरकर,शिक्षक आदींनी यांनी अभिनंदन केले आहे.