जाहिरात-9423439946
तंत्रज्ञान

कोपरगावच्या कन्येला पी.एच.डी.प्रदान

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगावची कन्या असलेल्या डॉ.पल्लवी चौधरी यांना रसायनशास्त्रातील संशोधनाबद्दल तैवान येथील विद्यापीठाने नुकतीच पी.एच.डी.प्रदान केली आहे.त्यांच्या या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.

डॉ.पल्लवी चौधरी यांनी पदवित्तर एम.एस.सी.शिक्षण कोपरगाव येथील रयत शिक्षण संस्थेच्या सद्गुरू गंगागिरी महाराज महाविद्यालयातून २०१२ मध्ये पूर्ण केले होते.त्यानंतर २०१३-१४ साली तैवान येथील चियायी कंट्री या शहरांमध्ये जगभरातील नामांकित विद्यापीठ नॅशनल च्युंन्ग चॅन्ग युनिव्हर्सिटीमध्ये संशोधनासाठी प्रवेश मिळविला होता.मागील पाच-सहा वर्षे अथक अभ्यास परिश्रम संशोधन करून त्यांनी तीन संशोधन पूर्ण केले आहे.

डॉ.पल्लवी चौधरी यांचे माहेर कोपरगावचे जपे हे असून त्या शारदानगर येथील नयना व इंजिनीयर बापूराव जपे यांच्या जेष्ठ कन्या व नगरसेविका श्रीमती ताराबाई गणपत जपे सभापती महिला व बालकल्याण कोपरगाव नगरपरिषद यांच्या पुतणी आहे. रसायन शास्त्रातील त्यांचे संशोधनाचे एक शोध निबंध अमेरिकेतील सायन्स जनरल मध्ये प्रसिद्ध झाले आहे.(१) एफ.ओ.पी.आर.(२) बायोसेंसोर फाॅर अल्ट्रा सेन्सिटिव्ह डिटेक्शन ऑफ बीटा लॅक्टोमस अँटी बायोटिक्स (३) पेस्टिसाइड अँड सिंगल न्यूक्लिओ साईड पाॅलीमाफिसम इन डी.एन.ए.असा त्यांचा संशोधनाचा विषय होता.
वरील विषया पैकी (२) चे संशोधन एक्स-रे मशीन मध्ये वापरण्यात येणाऱ्या द्रव्या बाबत असुन तैवान मधील डॉक्टरांनीही हे संशोधन उपयुक्त ठरले असल्याचा निर्वाळा दिला आहे.त्यांच्या वरील संशोधनाबाबत नॅशनल च्युन्ग चॅन्ग युनिव्हर्सिटीने त्यांना पी.एच.डी.प्रदान केली आहे.या अगोदर २०१८ त्यांचे पती डॉ.प्रकाश चौधरी (चितळी जळगाव ता.राहता) यांनाही त्याच विद्यापीठाने पी.एच.डी.प्रदान केली आहे.त्यानंतर त्यांनी तेथेच त्यांनी पोस्ट डॉक्टरेट केली आहे.अतिशय प्रतिकूल परिस्थितीत राहून डॉक्टर पल्लवी चौधरी-जपे यांनी पी.एच.डी.मिळवल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close