कोपरगाव तालुका
लवकरच अमेरिकन चिकनची आयात?
संपादक-नानासाहेब जवरे
वृत्तसंस्था /नवी दिल्ली :
भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच चिकनची भारतात आयात करण्यासंदर्भातील करार करण्याची प्रक्रिया संपन्न होण्याची शक्यता आहे. यामुळे आगामी काळात भारतीयांना अमेरिकन चिकन खाण्याची संधी मिळणार आहे. तेही स्वस्तात उपलब्ध होणार असल्याचे अनुमान मांडण्यात येत आहे. परंतु यावर भारतीय पोल्ट्री इंडस्ट्रीजने या निर्णयाला मोठा विरोध दर्शवलेला आहे. कारण अमेरिकेतील चिकन भारतात आल्यास देशातील लाखो चिकन फार्म आणि त्यांची निर्मिती केंद्र बंद होण्याची भिती व्यक्त केली असून जवळपास 40 लाख लोक बेरोजगार होण्याचे संकेत पोल्ट्री इंडस्ट्रीजने व्यक्त केले आहेत.
स्वस्त उपलब्ध होणार
भारत आणि अमेरिका यांच्यात मुक्त व्यापारासाठीचा करार करण्याची बोलणी सुरु आहेत. या चर्चेवेळी अमेरिकेतून स्वस्तातील चिकन आयात केली जाणार आहे. आयातीवर लावण्यात येणारे आयात शुल्क 100 टक्क्यात घट करुन ते 30 टक्के करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. यामुळे चिकन तब्बल 70 टक्क्यांनी स्वस्तात उपलब्ध होण्याची शक्यता आहे. या विषयांच्या चर्चेसाठी वाणिज्य विभागाकडून वाणिज्य, पशुपालन, कृषीसोबत अन्य सचिवांची बैठक बोलवली होती