जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
तंत्रज्ञान

पहिलयांदाच ‘जीवसृष्टीला पूरक ठरू शकणाऱ्या’ ग्रहावर सापडलं पाणी

जाहिरात-9423439946
K2-16b तारा

दूरवरच्या ताऱ्याभोवती प्रदक्षिणा घालणाऱ्या एका ग्रहाच्या वातावरणामध्ये खगोलशास्त्रज्ञांना पहिल्यांदाच पाणी सापडलंय.

या ग्रहाचं नाव K2-16b असं आहे आणि हा ग्रह एक्सोप्लॅनेट या प्रकारात मोडतो.

यामुळेच या ग्रहावर जीवसृष्टी आहे का याचं कुतुहल आता साऱ्या जगाला असेल.

जीवसृष्टीला अनुकूल असलेले वायू K2-16b च्या वातावरणामध्ये आहेत का, हे ठरवणं नवीन अंतराळ दुर्बिणींच्या (स्पेस टेलिस्कोप) मदतीने पुढच्या दहा वर्षांमध्ये शक्य होईल.

‘नेचर ऍस्ट्रॉनॉमी’ शोधपत्रिकेमध्ये याविषयीचा तपशील छापण्यात आला आहे.

कसा आहे हा ग्रह?

हा ग्रह पृथ्वीपेक्षा दुप्पट आकाराचा असून इथलं तापमान शून्य ते 40 अंश सेल्शियस दरम्यान असल्याचं वैज्ञानिकांचं म्हणणं आहे. सध्या या ग्रहाला K2-16b नाव देण्यात आलं असून हा ग्रह पृथ्वीपासून 111 प्रकाशवर्षं म्हणजेच 650 दशलक्ष मैल दूर आहे.

पण हा ग्रह पृथ्वीपासून अत्यंत दूर असल्याने तिथे जीवसृष्टी आहे वा नाही हे तिथे प्रोब पाठवून तपासणं शक्य नाही. म्हणून मग 2020च्या दशकात अत्याधुनिक अंतराळ दुर्बिणींच्या मदतीने या ग्रहाच्या वातावरणामधील वायुंचा अभ्यास करून ही गोष्ट ठरवता येणार असल्याचं युनिर्व्हसिटी कॉलेज लंडनचे (UCL) डॉ. इंगो वॉल्डमन सांगतात.

“आपण या विश्वामध्ये एकटे आहोत का, हा प्रश्न मानवजातीला कायमच पडत होता. पुढच्या 10 वर्षांमध्ये आपल्याला समजेल की जीवसृष्टीच्या अस्तित्त्वामुळे निर्माण होणारी रसायनं त्या वातावरणात आहेत का.”

युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनच्या मुख्य वैज्ञानिक प्रा. जिओवान्ना टायनेट्टी म्हणतात, “पहिल्यांदाच आपल्याला एखाद्या ग्रहावर पाणी सापडलंय. आणि हा ग्रह एका ताऱ्याच्या ‘हॅबिटेबल झोनमध्ये’ म्हणजे ‘राहण्यायोग्य भागामध्ये’ आहे. म्हणजेच इथलं तापमान हे सजीवांच्या जगण्यासाठी योग्य आहे.”

हॅबिटेबल झोन म्हणजे एखाद्या ताऱ्या सभोवतीचा असा भाग जिथलं तापमान बऱ्यापैकी सामान्य असतं, त्यामुळे त्या ग्रहाच्या पृष्ठभागावर द्रवरूपामध्ये पाणी आढळू शकतं.


एक्सोप्लॅनेट (Exoplanet) म्हणजे काय?

  • आपल्या सौरमालेच्या पलिकडच्या ग्रहांना एक्सोप्लॅनेट असं म्हणतात
  • 1992मध्ये पहिल्या एक्सोप्लॅनेटचा शोध लागला होता.
  • आतापर्यंत विविध तंत्रांचा वापर करत 4,000पेक्षा जास्त एक्सोप्लॅनेट्सचा शोध लावण्यात आला आहे.
  • यातले अनेक मोठे ग्रह ज्युपिटर (गुरू) किंवा नेपच्युनसारखे आहेत.
  • तर अनेक मोठे ग्रह हे त्यांच्या ताऱ्याच्या अतिशय जवळून प्रदक्षिणा घालतात.

हा शोध लावणाऱ्या टीमने हबल दुर्बिणीने 2016 आणि 2017 कालावधीमध्ये शोधलेल्या ग्रहांचा अभ्यास केला. हे ग्रह त्यांच्या सूर्याला प्रदक्षिणा घालत असतना त्यांच्यावरून परावर्तित होणाऱ्या प्रकाशावरून या ग्रहांच्या वातावरणामध्ये कोणकोणते वायू आहेत हे संशोधकांनी ठरवलं.

ESA/STFC RAL SPACE/UCL/EUROPLANET-SCIENCE OFFICE
प्रतिमा मथळायेत्या काही वर्षांत अशाप्रकारच्या शेकडो ग्रहांचा शोध लागू शकेल.

यापैकी फक्त K2 – 18b ग्रहावर पाण्याच्या रेणूच्या खुणा आढळल्या. पृथ्वीवरील जीवसृष्टीचा हा महत्त्वाचा घटक आहे. K2 – 18b या ग्रहाच्या वातावरणामध्ये 50% पर्यंत पाणी असल्याचं कॉम्प्युटर मॉडेलिंगवरून मिळालेल्या माहितीतून कळतं आहे.

UCL च्या टीमचे सदस्य डॉ. अँजेलोस त्सिआरास म्हणतात की इथल्या वातावरणामध्ये पाणी सापडल्याने या एक्सोप्लॅनेटवर जीवसृष्टी असण्याची शक्यता वाढते. ही शक्यता खूपच उत्साहवर्धक आहे. ते म्हणतात, “यामुळे आपण आपल्या आदिम प्रश्नाचं उत्तर शोधू शकतो, पृथ्वी सर्वांपेक्षा वेगळी आहे का?”

पण सगळेच खगोलशास्त्रज्ञ याच्याशी सहमत नाहीत. काहींच्या म्हणण्यानुसार पृथ्वीच्या दीडपट वस्तुमान असणाऱ्या ग्रहावर खडकाळ पृष्ठभाग असणं शक्य नाही म्हणूनच तिथे पाणी द्रवरूपात असणं शक्य नाही. शिवाय K2-18bचा आकार आणि गुरुत्वाकर्षण, वातावरणातला हायड्रोजन आणि हेलियम तसंच या ग्रहाच्या ताऱ्यातून होणारं उत्सर्जन हे सगळं जीवसृष्टीला अनुकूल नाही.

दुसरं म्हणजे जीवसृष्टी निर्माण होण्यासाठी वातावरण नेमकं कसं असायला हवं, याविषयी खगोलशास्त्रज्ञांचं एकमत नाही. आपल्याला फक्त पृथ्वीवर अस्तित्वात असलेली जीवसृष्टी माहिती आहे, ती कोणत्या परिस्थितीत तयार झाली याचा अंदाज आहे. पण जीवसृष्टीला पुरक वातावरण अनेक प्रकराचं असू शकतं. ते पृथ्वीशी साधर्म्य साधणारं असेलच असं नाही.

प्रा. टिनेट्टी म्हणतात, “आपल्या सौरमालेतली पृथ्वी सगळ्यांत वेगळी आहे. इथे ऑक्सिजन, पाणी आणि ओझोन आहे. पण दूरवरच्या ताऱ्याभोवती फिरणाऱ्या ग्रहावर आपल्याला हे सगळं सापडलं म्हणून तिथे आयुष्य असू शकतं असं म्हणता येणार नाही. असे अनेक ग्रह आहेत आकाशगंगेमध्ये. म्हणूनच आम्हाला अशी आशा आहे की जीवसृष्टी असणारे ग्रह काहीसे वेगळे असतील आणि आपल्याला जीवसृष्टी असणाऱ्या आणि नसणाऱ्या ग्रहांमधला फरक कळेल.”

भविष्यात कधीतरी दूरवरच्या ताऱ्याभोवती फिरणाऱ्या ग्रहावर आयुष्याच्या खुणा आढळतीलच असं एडिनबर्ग युनिव्हर्सिटीच्या इन्स्टिट्यूट ऑफ अॅस्ट्रॉनॉमीच्या डॉ. बेथ बिलर म्हणतात, “सगळ्याच मानवजातीसाठी ही मोठी गोष्ट असेल. पण अगदी ET चित्रपटासारखं काही घडणार नाही. सूक्ष्मजीव किंवा इतर साध्या रूपातली जीवसृष्टी पहायला मिळेल. असं झालं तरी ती खूप मोठी गोष्ट असेल.”

2021मध्ये लाँच होणाऱ्या नासाच्या जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप (James Webb Space Telescope) आणि सात वर्षांनी होऊ घातलेलं युरोपियन स्पेस एजेन्सीचं एरियल मिशन (Ariel Mission) यामुळे अंतराळवीरांना आतापर्यंत शोध लावण्यात आलेल्या जगांमधल्या वातावरणाचा तपशीलवार अभ्यास करता येईल.

K2-18bचा शोध 2015मध्ये लागला होता आणि तो हजारो सुपर-अर्थ (Super Earth)पैकी एक आहे. पृथ्वी आणि नेपच्युन यांच्या दरम्यानचं आकारमान असणाऱ्या ग्रहांना सुपर अर्थ म्हणतात. नासाच्या केप्लर स्पेसक्राफ्टने या ग्रहाचा शोध लावला होता. नासाचं टेस मिशनही येत्या काही वर्षांमध्ये अशाच प्रकारचे शेकडो ग्रह शोधेल, असा अंदाज आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close