कोपरगाव तालुका
कोपरगाव जिनिंग प्रेसिंग सोसायटीची वार्षिक सभा उत्साहात संपन्न
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव (प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यात कापूस प्रक्रिया उत्पादनात आघाडीवर असलेल्या कोपरगाव तालुका जिनिंग प्रेसिंग सोसायटीची वार्षिक सभा नुकतीच कर्मवीर काळे कारखान्याचे अध्यक्ष आशुतोष काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाली आहे.
या प्रसंगी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष पद्माकांत कुदळे, संचालक सुधाकर रोहोम, कारभारी आगवण, ज्ञानदेव जामदार, निवृत्ती शिंदे, दिलीप बोरनारे,डॉ.दिलीप जगताप, पंचायत समिती सदस्य मधुकर टेके, रोहिदास होन, राजेंद्र निकोले, जिनिंग प्रेसिंगचे संचालक सचिन आव्हाड, गणेश गायकवाड, बाबासाहेब औताडे, सुदामराव लोंढे, किसन आहेर, रावसाहेब मोरे, शिवाजी वाबळे, केरू पगारे आदी मान्यवरांसह सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पर्जन्यमानाचा फटका कापूस शेतीला बसला आहे. त्यामुळे कापसाचे उत्पादन घटले आहे. तर दुसरीकडे खुल्या बाजारपेठेमुळे कापूस खासगी व्यापाऱ्यांकडे जात असल्यामुळे सहकारी जिनिंग प्रेसिंगच्या सोसायटीकडे येणाऱ्या कापसाची आवक मंदावली आहे. बेरोजगारांच्या हाताला काम मिळावे या दृष्टीकोनातून कोपरगाव तालुका जिनिंग प्रेसिंग सोसायटीची स्थापना केली. त्यावेळी देशात व राज्यात कापसाचे उत्पादन चांगले होते परंतु दिवसेंदिवस अनियमित झालेले पर्जन्यमान व कापूस पिकावर पडणारे रोग यामुळे कापूस उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला त्याचबरोबर जिनिंग प्रेसिंग सोसायट्याही अडचणीत आल्या– आशुतोष काळे
सदर प्रसंगी आशुतोष काळे म्हणाले कि,कमी झालेल्या पर्जन्यमानाचा फटका कापूस शेतीला बसला आहे. त्यामुळे कापसाचे उत्पादन घटले आहे. तर दुसरीकडे खुल्या बाजारपेठेमुळे कापूस खासगी व्यापाऱ्यांकडे जात असल्यामुळे सहकारी जिनिंग प्रेसिंगच्या सोसायटीकडे येणाऱ्या कापसाची आवक मंदावली आहे. बेरोजगारांच्या हाताला काम मिळावे या दृष्टीकोनातून कोपरगाव तालुका जिनिंग प्रेसिंग सोसायटीची स्थापना केली. त्यावेळी देशात व राज्यात कापसाचे उत्पादन चांगले होते परंतु दिवसेंदिवस अनियमित झालेले पर्जन्यमान व कापूस पिकावर पडणारे रोग यामुळे कापूस उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला त्याचबरोबर जिनिंग प्रेसिंग सोसायट्याही अडचणीत आल्या. अशा परिस्थितीतही कोपरगाव जिनिंग प्रेसिंग हि संस्था प्रगतीपथावर आहे. कोपरगाव तालुका जिनिंग प्रेसिंग सोसायटीला ऑडीट वर्ग ‘अ’ मिळाला असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. ९७ व्या घटना दुरुस्तीनंतर सभासदांनी भागभांडवल वाढवून नवीन उद्योग सुरु करावे यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन केले.
सभेचे प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष गोरक्षनाथ जामदार यांनी केले. अहवालवाचन जनरल व्यवस्थापक सुरेश काशिद यांनी केले. सूत्रसंचलन शेख जी. बी. यांनी केले तर संस्थेचे उपाध्यक्ष भाऊसाहेब देवकर यांनी आभार मानले.