जाहिरात-9423439946
खेळजगत

समर्थ स्पोर्ट्स अकॅडमीच्या तीन खेळाडूंची तलवारबाजी स्पर्धेसाठी निवड

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

पुणे येथे नुकत्याच आबासाहेब गरवारे महाविद्यालयांत आंतरमहाविद्यालयीन विभागीय तलवारबाजी स्पर्धा संपन्न झाल्या असून या स्पर्धेत अ.नगर,नाशिक,पुणे शहर आणि पुणे ग्रामीण चे संघ सहभागी झाले होते या मध्ये कोपरगाव येथील समर्थ स्पोर्ट्स अकॅडमी येथे तलवारबाजीचे प्रशिक्षण घेत असलेल्या तीन खेळाडूंची निवड जम्मू काश्मीर येथे होणाऱ्या अखिल भारतीय अंतरविद्यापीठ तलवारबाजी स्पर्धेसाठी झाली असल्याची माहिती हाती आली आहे.त्यांच्या या यशाचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

आर्यन घोडके, सार्थक बडजाते, मोनिका वराडे.

निवड झालेल्या विद्यार्थ्यांत आर्यन दिलीप घोडके-रौप्यपदक,सार्थक निलेश बडजाते-कांस्यपदक,मोनिका रामचंद्र वराडे-कांस्यपदक या स्पर्धेत तीनही खेळाडूंनी इपी या प्रकारात लक्षवेधी यश संपादन केले आहे.

या सर्व यशस्वी खेळाडूंचे समर्थ स्पोर्ट्स अकॅडमी कोपरगाव चे मार्गदर्शक ज्येष्ठ विधिज्ञ जयंत जोशी,अध्यक्ष शिवछत्रपती पुरस्कार विजेते श्री दिलीप घोडके,प्रा.गणेश नरोडे,उपाध्यक्ष बाबासाहेब गवारे,असिफ शेख,अविनाश निकम,निवृत्ती मुरडणर,दीपक कसाब,संदिप गवारे, अॅड.सुहास क्षीरसागर,प्रमोद नरोडे,बाळासाहेब शेंडगे,प्रा.संदेश भागवत,प्रा.विशाल पवार,सुनील गोडळकर,कोपरगाव तालुका क्रीडा समितीचे अध्यक्ष नितीन निकम,केदार कानडे,शिवा साठे,सनी कडू,अजय शेळके,राहुल रुईकर याआदी मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

या सर्व यशस्वी खेळाडूंना तलवारबाजी प्रशिक्षक निलेश बडजाते,आकाश लकारे यांचे मार्गदर्शन लाभले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close