आरोग्य
कोपरगावात रुग्णसेवेत कमतरता ठेऊ नका अन्यथा गय नाही-इशारा

न्यूजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणावर कोविड रुग्ण वाढत असून नवीन विषाणूने मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे.त्यामुळे आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आगामी काळात तिसरी लाट येणार असल्याचे तज्ज्ञांनी जाहीर केले असल्याने प्रशासनाच्या कोणत्याही अधिकारी अथवा कर्मचाऱ्यांकडून रुग्णसेवेत कमतरता आढळून आल्यास त्यांची गय केली जाणार नाही असा इशारा आ.आशुतोष काळे यांनी तालुका आरोग्य विभाग व प्रशासनाला दिला आहे.
“आरोग्य विभागाने कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करतांना त्या रुग्णांची हेळसांड होणार नाही याची खबरदारी घ्यावी.संभाव्य तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी योग्य नियोजन करून स्वतंत्र व्यवस्था निर्माण करा.त्यासाठी आवश्यक असणारी मदत करण्यास सदैव तयार आहे.लहान मुलांना या लाटेचा धोका पोहोचणार यासाठी बालरोग तज्ञांची समिती स्थापन करून जगजागृती केली जाणार आहे”-आ.आशुतोष काळे.
महाराष्ट्रात कोरोनाचा प्रकोप सुरुच आहे.आजही कोरोना रुग्णांचा आकडा ५० हजारांच्या वरच आला आहे.आज राज्यात ५४ हजार ०२२ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे तर ३७ हजार ३८६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्याचा रिकव्हरी रेट ८५.३६ टक्क्यांवर पोहोचला आहे. काल राज्यात ६२ हजार ६२ हजार १९४ कोरोनाबाधीत रुग्णांची वाढ झाली होती तर ६३ हजार ८४२ कोरोना बाधित रुग्ण बरे झाले होते.मात्र अनेक रुग्णालयात कोरोना रुग्णांना प्राणवायूच भेटत नाही.त्यामुळे अनेक रुग्ण हातपाय खोडून मरत आहे.याबाबत कोपरगाव शहरही अपवाद नाही आता तर आरोग्य तज्ज्ञांनी तिसरी लाट येण्याचा धोका बजावलं असून त्या बाबत दक्षता घेण्यास बजावले आहे.या पार्श्वभूमीवर तातडीने निर्णय घेण्यासाठी कोपरगावचे आ.आशुतोष काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठकीचे आयोजन अकरण्यात आले होते.त्यावेळी ते बोलत होते.
सदर प्रसंगी तहसीलदार योगेश चंद्रे,उपसभापती अर्जुनराव काळे,नगराध्यक्ष विजय वहाडणे,कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम, धरमशेठ बागरेचा,पंचायत समिती सदस्य मधुकर टेके,अनिल कदम, राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे, शहराध्यक्ष सुनील गंगुले, माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील, डॉ. अजय गर्जे, नगरसेवक मंदार पहाडे, गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी,मुख्याधिकारी प्रशांत सरोदे,ग्रामीण रुग्णालय अधीक्षक डॉ. कृष्णा फुंलसौंदर,तालुका आरोग्य अधिकारी डॉ.संतोष विधाते,डॉ.वैशाली बडदे,ग्रामीण पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव,शहर पोलीस निरीक्षक वासुदेव देसले,डॉ.महेंद्र गोंधळी,डॉ.अतिश काळे,डॉ.कुणाल गर्जे,डॉ.चंद्रशेखर आव्हाड,राहुल रोहमारे,संतोष गंगवाल आदि मान्यवर उपस्थित होते.
या बैठकीत मार्गदर्शन करतांना आ.काळे म्हणाले की,”मागील वर्षी आलेल्या कोरोनाच्या पहिल्या लाटेची तीव्रता कमी होती मात्र ही लाट जेष्ठ नागरिकांसाठी जीवघेणी ठरली.दुसऱ्या लाटेने सर्वत्र हाहाकार उडाला असून २० ते ५० वयोगटातील हजारो नागरिकांना आपला जीव गमवावा लागला असून अजूनही या लाटेची तीव्रता कायम आहे.अशा परिस्थितीत शासनाने तिसरी लाट येण्याचा अंदाज वर्तविला असून या तिसऱ्या लाटेचा सर्वाधिक धोका लहान मुलांना आहे. त्यामुळे आरोग्य विभाग व प्रशासनाने अजिबात गाफील राहून चालणार नाही अशा सूचना दिल्या.तसेच संभाव्य तिसऱ्या लाटेच्या शासनाच्या सूचनांप्रमाणे काय उपाय योजना करायच्या आहेत त्यासाठी आरोग्य विभाग व प्रशासनाने कोणती पूर्व तयारी केली आहे.येणाऱ्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा लहान मुलांना जास्त धोका असल्यामुळे त्याबाबत शासनाने दिलेल्या निर्देशानुसार आरोग्य विभाग व प्रशासनाने वेगळ्या काय उपाय योजना केल्या आहेत याची माहिती घेतली.लहान मुलांना होणारा धोका ओळखून वेळीच पावले उचलत त्यांनी या बैठकीसाठी बालरोग तज्ञांना पाचारण करून त्यांच्याकडून लहान मुलांना कोरोनाची बाधा होवू नये यासाठी पालकांनी कोणती काळजी घेतली पाहिजे याची माहिती जाणून घेतली. सर्व नागरिकांनी योग्य ती काळजी घेवून शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करावे व कोरोनाची बाधा जरी झाली तरी घाबरून न जाता आपल्या परिवारातील इतरांचे आरोग्य अबाधित राहावे यासाठी कोविड केअर सेंटरमध्ये दाखल व्हावे असे नागरिकांना आवाहन केले आहे. आरोग्य विभागाने जेष्ठ नागरिकांना लसीचा दुसरा डोस व १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना लसीचा पहिला डोस देण्यासाठी लसीकरण मोहीम राबवितांना योग्य नियोजन करा अशा सूचना आ.काळे यांनी यावेळी आरोग्य विभाग व प्रशासनाला शेवटी दिल्या आहेत.