खेळजगत
महर्षी विद्यालयाचे जिल्हास्तरीय ज्युदो स्पर्धेत यश.
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव (प्रतिनिधी )
पुणे येथील राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय व अ, नगर येथील जिल्हा क्रीडा कार्यालय यांच्या संयुक्त विद्यामानाने घेण्यात आलेल्या शालेय जिल्हास्तरीय ज्युदो स्पर्धेत संत जनार्दन स्वामी (मौ.) महाराज महर्षी विद्या मंदिर विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी लक्षवेधी यश संपादन केले आहे.त्यांच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
यात अनुक्रमे पार्थ राजेंद्र शेळके 55 कि.ग्रॅ. वर वजनीगटात सुवर्ण पदक मिळविले व याची विभागीय स्तरावर निवड करण्यात आली आहे. तसेच सिध्देश गोकुळ डांगे 70 कि.ग्रॅ.वजनीगटात रजत पदक, मिथिलेश संजय लोहारकर 50 कि.ग्रॅ.वजनीगटात रजत पदक, यश सुनिल डांगे 60 कि.ग्रॅ.वजनीगटात कास्य पदक व सक्षम घनशाम साळुंके 50 कि.ग्रॅ. वजनीगटात कास्य पदक प्राप्त केले असून शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे..
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष मोहनराव चव्हाण सर्व विश्वस्त,प्राचार्य राजेंद्र पानसरे पर्यवेक्षिका सौ.जे.के. दरेकर, व सर्व शिक्षकवृंद यांनी अभिनंदन केले आहे. व पुढिल वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहे. या यशस्वी खेळाडूंना विद्यालयाचे ज्युदो प्रशिक्षक योगेश बिडवे यांचे मार्गदर्शन लाभले होते.