जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

सुरेंगावात माजी लष्करी जवानांची आत्महत्या,उलटसुलट चर्चेला उधाण!

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव (प्रतिनिधी )

कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव ग्रामपंचायत हद्दीतील रहिवाशी मात्र पाच वर्षांपूर्वी सेवानिवृत्त झालेले लष्करी जवान तथा सुभेदार कैलास राधु निकम (वय-47) यांनी नुकतीच आपल्या राहत्या घराच्या छतास सुताचे दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली असून हि हत्या कि आत्महत्या या व परिसरात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.

दरम्यान सदर जवानाच्या पत्नीचे व मयताचे वैयक्तिक कारणावरून खटके उडत होते तर त्यांची उपवर मुलगी हि काही अज्ञात कारणामुळे घर सोडून गेली असल्याची विश्वसनीय माहिती हाती आली आहे.त्या ताण-तणावातून त्यांनी आपली जीवन यात्रा संपवली असल्याचा कयास व्यक्त होत आहे.त्यांच्या भ्रमणध्वनिवरून शेवटचे कॉल हे त्यांचा मेहुणा व परागंदा मुलगी हिच्याशी झाल्याची माहिती पोलिसी सूत्रांकडून मिळाली आहे.तथापि सदरची आत्महत्या हि आत्महत्याच असल्याची माहिती शवविच्छेदनातून समोर आली आहे.या बाबत उलटसुलट चर्चा सुरु आहे.संबंधित इसम सामाजिक कार्यात अग्रेसर असल्याने त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

कोपरगाव शहराच्या पश्चिमेस साधारण पंधरा कि.मी.अंतरावर सुरेगाव ग्रामपंचायत हद्दीत रहिवाशी असलेले व लष्करात सुभेदार पदावर आपली इमाने इतबारे सेवा बजावलेले कैलास राधु निकम यांनी बुधवार दि.5 नोव्हेंबर रोजी रात्री दहा वाजेच्या नंतर आपल्या राहत्या घरात दोरीने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली.त्या बाबत 6 नोव्हेंबर रोजी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात आ. मृ.रजी. नं. व कलम 74/2019 सी.आर.पी.सी.174 प्रमाणे मयत जवानांचा पुतण्या महेश केशव निकम (वय-29) यांनी अकस्मात मृत्यू दाखल केला होता.सदर घटनास्थळी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल कटके.पोलीस उपनिरीक्षक सचिन इंगळे यांनी भेट दिली होती.पुढील तपास पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली उप-पोलीस निरीक्षक सचिन इंगळे हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close