जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

..या सहकारी बँकेला १ कोटी ३९ लाखाचा नफा

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

सहकारी क्षेत्रात अग्रगण्य असणाऱ्या गौतम सहकारी बँकेने नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षात नफ्याची परंपरा पुढे सुरु ठेवली असून मागील वर्षाप्रमाणे या वर्षी गौतम सहकारी बँकेला १ कोटी ३९ लाख रुपयांचा नफा झाला असून मागील वर्षी ज्याप्रमाणे सभासदांना लाभांश देण्यात आला त्याचप्रमाणे याहीवर्षी रिझर्व्ह बँकेच्या संमतीने सभासदांना लाभांश देणार असल्याची माहिती कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आ.आशुतोष काळे यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.

सन २००४ पासून बँक खडतर परिस्थितीतून जात होती. २००२ सालापासून सभासदांना भाग भांडवलावर लाभांश मिळत नव्हता तरीही प्रतिकूल परिस्थितीवर मात करून बँकेने प्रगती केली आहे. बँकेने ३१ मार्च रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात १ कोटी ३९ लाख रुपये निव्वळ नफा मिळविला आहे.

सन २००४ पासून बँक खडतर परिस्थितीतून जात होती. २००२ सालापासून सभासदांना भाग भांडवलावर लाभांश मिळत नव्हता तरीही प्रतिकूल परिस्थितीवर मात करून बँकेने प्रगती केली आहे. बँकेने ३१ मार्च रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात १ कोटी ३९ लाख रुपये निव्वळ नफा मिळविला आहे. आजमितीस बँकेच्या ठेवी रु. ९३५१.८९ लाख, कर्जवाटप रु. ५७०१.१२ लाख, वसूल भागभांडवल रु. ४६८.४६ लाख, गुंतवणूक रु. ४३९६.५२ लाख, राखीव व इतर निधी रु. ८२८.६६ लाख इतका आहे. बँकेला माजी आ.अशोक काळे यांचे मार्गदर्शन मिळत आहे.बँक दि. ३१ मार्च अखेरच्या सभासदांना रिझर्व्ह बँकेच्या पूर्व परवानगीने सभासदांना लाभांश देणार असल्याचे आ. काळे यांनी केलेले सुतोवाच स्वागतार्ह असल्याचे बँकेचे अध्यक्ष बाबासाहेब कोते व मुख्य कार्यकारी व्यवस्थापक बापूसाहेब घेमुड यांनी म्हटले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close