जाहिरात-9423439946
धार्मिक

इंग्रजी माध्यमातील विद्यार्थ्यांना मराठी बोलताना येत नाही -…या महाराजांची व्यक्त केली खंत !

न्यूजसेवा

संवत्सर-(शिवाजी गायकवाड)
 
  सर्वसामान्यांच्या दारात शिक्षणाची गंगा घेऊन जाणाऱ्या जिल्हा परिषदेच्या शाळा टिकल्या पाहिजे तरच सर्वसाधारण रयतेची मुलं शिक्षण घेतील आज-काल इंग्रजी माध्यमांच्या मुलांना मराठी बोलता येत नाही किंवा घरातील कामे करता येत नाही यामुळे प्रस्थापित पुढाऱ्यांनी या गोष्टीकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन ह.भ.प.निवृत्ती महाराज इंदोरीकर यांनी नुकतेच संवत्सर येथील एका कार्यक्रमात बोलताना केले असून हा उपस्थित प्रस्थापित नेत्याना भीम टोला समजला जात आहे.

निवृत्ती महाराज देशमुख,इंदोरीकर.

संवत्सर येथील श्री जालिंदर महाराज यांचे यात्रा उत्सवाचे निमित्ताने ह.भ.प.इंदोरीकर महाराज हे शिक्षणाविषयी आणि मातृ भाषेविषयी बोलत असताना त्याच वेळी सहकार महर्षी कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांचा प्रवेश झाला त्यावेळी त्यांनी आपला बोलण्याचा रोख त्यांचेकडे वळवत प्रस्थापित नेत्याना खडे बोल सुनावले असल्याचे उघड झाले आहे.

   राज्यात विद्यार्थ्यांना इंग्रजी शाळांत घालण्याचा पालकांचा कल वाढत असून कोकण,विदर्भ,पश्चिम महाराष्ट्र,मराठवाडा,उत्तर महाराष्ट्रात २५५ मराठी शाळा बंद झाल्याची खळबळजनक कबुली खुद्द शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी दिली आहे.मराठी शाळांचा पट वाढविण्यासाठी सरकारकडून विविध उपाययोजना करण्यात येत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.राज्यात दोन हजार मराठी शाळा अडचणीत आल्या असून २५ हजार शिक्षक अतिरिक्त ठरणार असल्याबाबतचा तारांकित प्रश्न अमोल मिटकरी,विक्रम काळे यांनी उपस्थित केला.राज्यात २०२५ मध्ये ६२० मराठी शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.या पार्श्वभूमीवर कोपरगाव तालुक्यातील संवत्सर ग्रामपंचायत हद्दीत कासली रेल्वे चौकी (गेट) जवळ असलेल्या श्री जालिंदरनाथ (जंगलीबाबा) यांचा यात्रा उत्सव नुकताच विविध कार्यक्रमांनी संपन्न झाला असून त्यावेळी समाज प्रबोधनकार ह.भ.प.निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर) यांचे जाहिर हरी किर्तन आयोजित केले होते.त्यावेळी शिक्षणाविषयी आणि मातृ भाषेविषयी बोलत असताना त्याच वेळी सहकार महर्षी कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांचा प्रवेश झाला त्यावेळी त्यांनी आपला बोलण्याचा रोख त्यांचेकडे वळवत प्रस्थापित नेत्याना खडे बोल सुनावले आहे.

संवत्सर येथील जिल्हा परिषदेच्या डिजिटल शाळेविषयी माहिती घेताना इंदोरीकर महाराज,राजेश परजणे व अन्य मान्यवर दिसत आहेत.

यावेळी राजेश परजणे यांनी इंदोरीकर महाराज यांना संवत्सर येथील जिल्हा परिषद शाळेचे चार एकरात उभारलेले शैक्षणिक संकुल,डिजिटल साहित्य,सुसज्ज इमारत,सायन्स हॉल,ओपन सायन्स,पार्क डिजिटल हॉल,ऑफिस,क्रीडांगण  आदी उपक्रम दाखवले आहे.ते पाहून इंदोरीकर महाराज यांनी या शाळेचे आणि नेतृत्वाचे कौतुक केले आहे.त्याचबरोबर इयत्ता दुसरीच्या मुलांनी डिजिटल बोर्डवर चार अंकी वजाबाकी करून दाखवली त्या विद्यार्थ्यांचेही त्यांनी कौतुक केले आहे.

   सदर प्रसंगी गोदावरी परजणे तालुका सरकारी दूध संघाचे अध्यक्ष राजेंद्र परजणे,सहकार महर्षी कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे,उपाध्यक्ष ज्ञानेश्वर परजणे,उपसरपंच विवेक परजणे,दिलीप ढेपले,रमेश गायकवाड आदीसह यात्रा उत्सव समिती आदिसंह मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.

इंदोरीकर महाराज यांनी संवत्सर येथील जिल्हा परिषद शाळेस भेट दिली तो क्षण.

  त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,”ज्ञानेश्वर माऊली यांच्या ज्ञानेश्वरीबद्दल तसेच निवृत्तीनाथ सोपान काका मुक्ताई यांचे दिपावलीचे भाऊबीजेचे वर्णन करून भावाने बहिणीला काय दिलं पाहिजे हे सांगत असताना महाराज भाऊक झाले.मुक्ताईनी ज्ञानेश्वरांकडे गोरगरीब शेतकरी यांच्यासाठी हरिपाठ याची मागणी केली पसायदानाची मागणी केली हे त्या काळच्या लहान मुलींनी भावाजवळ ओवळणी मागितली होती याची आठवण करून दिली आहे.

   दरम्यान यावेळी भाविकांनी कीर्तनानंतर महाप्रसादाचा लाभ घेतला व पसायदान झाल्यानंतर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,संवत्सर या ठिकाणी विवेक परजणे,रमेश गायकवाड,दिलीप ढेपले यांनी राजेश परजणे यांचे लक्ष वेधून महाराजांना संवत्सर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दाखवण्याचा आग्रह धरला होता.त्या विनंतीस मान देऊन इंदुरीकर महाराज शाळा पाहण्यास आले असता संवत्सरची शाळा म्हणजे इंग्रजी माध्यमाच्या शाळेला लाजवेल असे गौरवोद्गार काढले आहे.माझ्या शाळेतील शिक्षकांना ही शाळा बघण्यासाठी आपण जरूर पाठवू असे सांगून त्यांनी स्व.नामदेवराव परजणे यांची गरिबाबद्दल असलेली तळमळ व सर्वांनी शिक्षण घ्यावे यांची आठवण करून दिली आहे. राजेश परजणे यांनाही शुभेच्छा दिल्या आहेत.

सदर प्रसंगी राजेश परजणे यांनी इंदोरीकर महाराज यांना पुस्तक व शाल देऊन सत्कार केला तो क्षण.

  सदर प्रसंगी राजेश परजणे यांनी इंदोरीकर महाराज यांना पुस्तक व शाल देऊन सत्कार केला आहे.या वेळी चंद्रकांत लोखंडे,बाळासाहेब दहे,रमेश गायकवाड,दिलीप तिरमके,गणपत रानडे,फैयाज पठाण,ग्रामपंचायत अधिकारी कृष्णकांत अहिरे यांचेसह शाळेचे मुख्याध्यापक,शिक्षक आदी मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close