धार्मिक
महेश्वराची यात्रेस मोठ्या उत्साहात प्रारंभ

न्युजसेवा
माहेगाव देशमुख -(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथेमहेश्वर म्हसोबाची यात्रेस मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला असून या निमित्ताने सकाळी पाच वाजता महेश्वर महाराजांचा अभिषेक, महापूजा,दही आणि दूध याने अभिषेक करण्यात आला आहे.

या यात्रे निमित्ताने भव्य रक्तदान शिबिर संध्याकाळी नऊ वाजता किरण ढवळपुरीकर यांच्या लोकनाट्य तमाशा आणि आर्केस्ट्रा असे भव्य दिव्य कार्यक्रम कोळपेवाडी येथील गावकऱ्यांनी व यात्रा कमिटीने कार्यक्रमाचे नियोजन केले असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.
कोळपेवाडीला पाडव्याला कोळपेवाडीतील सगळे ग्रामस्थ घरातील दिवाळी सारखाच मोठ्या उत्साहात संपन्न करत असतात.आहे. या माहेश्वराचे महत्त्व कोळपेवाडी येथे पूर्वीपासून आहे.पूर्वी याठिकाणी एक तळ होतं आणि त्या तळ्यातील पाणी अनेक लोक प्यायचे.त्याने अनेक लोकांचे आजार हे बरे व्हायचे अशी अख्यायिका आहे.या महेश्वराची संध्याकाळी पाच वाजता बारा गाड्या या माणसाने फुल भरून एक देवीचा भगत ह्या बारा गाड्या एकटा ओढत असतो.आजूबाजूंनी जत्रा सारखे लोक पाहण्यासाठी गर्दी करत असतात.सकाळी गोदावरी नदीवर पाणी आणून कावड्यांची मिरवणूक असते आणि सहा वाजता तक्रार काढून ताकातरावची मिरवणूक काढली जाते आणि ३१ मार्चला स्थानिक कलाकार यांच्या हजर यांचा कार्यक्रम असतो.दुपारी बारा वाजता बैलगाडी शर्यत असते आणि चार वाजता कुस्त्यांचा हंगामा पोवाडे हा कार्यक्रम असतो.भव्य रक्तदान शिबिर संध्याकाळी नऊ वाजता किरण ढवळपुरीकर यांच्या लोकनाट्य तमाशा आणि आर्केस्ट्रा असे भव्य दिव्य कार्यक्रम कोळपेवाडी येथील गावकऱ्यांनी व यात्रा कमिटीने कार्यक्रमाचे नियोजन केले जाते यात्रेमध्ये राहट,पाळणा अनेक वेगवेगळ्या प्रकारचे खेळ जत्रेत आलेले असल्याची माहिती कोळपेवाडीच्या लोकनियुक्त सरपंच चंद्रकला सूर्यभान कोळपे आणि यात्रा कमिटी व ग्रामस्थ यांनी ही माहिती दिली आहे.