जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
धार्मिक

श्री क्षेत्र अंतापुर दिंडीचे होणार प्रस्थान….

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील श्री क्षेत्र पोहेगाव येथील दावल बाबा मंदिर ते सटाणा तालुक्यातील श्री क्षेत्र अंतापूर येथील दावल मालिक बाबा येथील मंदिर या दरम्यान गुरुवार दि.01 ऑगस्ट ते दि.08 ऑगस्ट रोजी सालाबादा प्रमाणे पायी दिंडीचे आयोजन केले असल्याची माहिती पोहेगाव येथील आयोजक ह.भ.प.रमेश औताडे (बाबा) यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.या दिंडीचे भाविकांनी स्वागत केले आहे.

सदर दिंडीचे प्रस्थान होण्यापूर्वी पादुका पूजन गुरुवार दि.01 ऑगस्ट रोजी काळी 07 वाजता कोपरगाव बेट येथील श्री काशी विश्वनाथ महादेव ट्रस्टचे महंत रमेशगिरीजी महाराज यांच्या तर काठी पूजन साध्वी शारदानंदगिरिजी महाराज यांच्या शुभ हस्ते संपन्न होणार आहे.

    उत्तर भारतातील हिमालयाच्या पायथ्याशी वसलेल्या एका शांत गावात जन्मलेले,दावल मलिक बाबा,ज्यांना बाबा साहिब म्हणूनही ओळखले जाते,त्यांच्या उपस्थितीने जगाला कृपा करून गेले अशी त्यांच्या भाविकांची श्रद्धा आहे.त्यांच्या जन्माची अचूक तारीख त्यांच्या अनुयायांमध्ये वादाचा विषय आहे,कारण त्यांच्या शिकवणींमध्ये सांसारिक तपशीलांना फारसे महत्त्व नव्हते.तथापि,असे मानले जाते की तो विसाव्या शतकाच्या सुरुवातीला उदयास आला असे मानले जाते.त्यांना मानणारा मोठा वर्ग देशभर पसरला आहे.त्यांचे मंदिर सटाणा तालुक्यातील श्री क्षेत्र अंतापूर या ठिकाणी उंचावरील डोंगरावर प्रस्थापित आहे.त्या ठिकाणी आठवड्यातील प्रत्येक गुरुवारी भाविकांनी व श्रद्धाळूंची दिवसभर मोठी गर्दी असते.त्यात हिंदूसह प्रामुख्याने मुस्लिमांचाही समावेश असतो त्या मुळे संत कबिर व साईबाबा प्रमाणे हे दैवत सर्व जाती धर्मासाठी खुले मानले जाते.मात्र मंदिराच्या ठिकाणी हिंदू-मुस्लिम वाद आढळून येतो.त्या साठी श्रावण महिन्यात बऱ्याच ठिकाणाहून पायी दिंड्यांचे आयोजन होत असते अशीच एक दिंडी श्री क्षेत्र पोहेगाव येथून सुमारे 43 वर्षांपासून सुरु आहे.ती येथील ह.भ.प.रमेश औताडे बाबा यांनी सुरु केली आहे.व अद्याप पर्यंत सुरु आहे.या वर्षी ती गुरुवार दि.01 ऑगस्ट ते दि.08 ऑगस्ट रोजी ह.भ.प.रमेश औताडे बाबा यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न होणार आहे.त्यासाठी औताडे यांनी संपूर्ण तयारी केली असल्याचे आमच्या प्रतिनिधीस सांगितले आहे.

सदर दिंडीचे प्रस्थान होण्यापूर्वी पादुका पूजन गुरुवार दि.01 ऑगस्ट रोजी काळी 07 वाजता कोपरगाव बेट येथील श्री काशी विश्वनाथ महादेव ट्रस्टचे महंत रमेशगिरीजी महाराज यांच्या तर काठी पूजन साध्वी शारदानंदगिरिजी महाराज यांच्या शुभ हस्ते संपन्न होणार आहे.

   सदर दिंडीचा पहिला मुक्काम हा चासणली या ठिकाणी तर दुसरा मुक्काम हा टाकळी विंचूर शंकर रोकडे व नरहरी जाधव वस्ती याठिकाणी तर तिसरा मुक्काम हा बोपाने रोड चांदवड आदिनाथ नगर शेलार वस्ती,याठिकाणी संपन्न होत आहे.तर चौथा मुक्काम हा वाखारी,हनुमान मंदिर ता.देवळा या ठिकाणी संपन्न होत आहे.पाचवा मुक्काम ठेंगोडे,ठेंगोडे मंगल कार्यालय,सहावा मुक्काम हा साईश्रद्धा लॉन्स वनोली ता.सटाणा,सातवा मुक्काम अंतापूर,’गंगामाय भक्तनिवास’औताडे बाबा आश्रम,शेवरे शिवार,अंतापूर गडाजवळ या ठिकाणी संपन्न होणार आहे.तर गुरुवार दिनांक 08 ऑगस्ट रोजी सकाळी 07 वाजता दोन्ही गडांचे दर्शन होणार आहे.त्यानंतर उपस्थित भाविकांना महाप्रसादाचे आयोजन केले जाणार आहे.

दरम्यान सदरच्या दिंडीसाठी विविध भाविक आणि विविध गावचे रहिवासी यांचे सहकार्य लाभणार असून ते भोजन व चहा-पाण्याची व्यवस्था करणार आहे.तर येताना भक्तांनी खर्च स्वतः करायचा असल्याचे आवाहन औताडे यांनी शेवटी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close