गुन्हे विषयक
…’त्या’ लुटीतील चोरटे गजाआड,पोलिसांचे कौतुक

न्युजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील तीळवणी नजीक असलेल्या उपबाजार समितीजवळ रात्रीच्या सुमारास एक जोडपे आपल्या दुचाकीवरून जात असताना त्यांना पाठलाग करणाऱ्या अज्ञात चौघा चोरट्यांनी कोयत्याचा धाक दाखवून लुटले असून बायकोच्या अंगावरील दागिन्यांसह ४५ हजार ६०० रुपयांची लूट केल्या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी काल पहाटे पाच आरोपींना जेरबंद केले असून यात राहुल केदार लोहकणे (वय -२०),कुणाल अनिल चंदनशिवे,(वय-१९),नितेश बाळासाहेब भोकरे (वय-१९),प्रमोद कैलास गायकवाड (वय -१९) व त्याच गावातील एक सतरा वर्षीय अल्पवयीन मुलगा अशा पाच जणांचा समावेश आहे.याबाबत नागरिकांनी पोलिसांचे कौतुक केला आहे.

नवरा बायकोची अंगावरील दागिन्यांसह ४५ हजार ६०० रुपयांची लूट केल्या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी काल पहाटे पाच आरोपींना जेरबंद केले असून यात राहुल केदार लोहकणे (वय -२०),कुणाल अनिल चंदनशिवे,(वय-१९),नितेश बाळासाहेब भोकरे (वय-१९),प्रमोद कैलास गायकवाड (वय -१९) व त्याच गावातील एक सतरा वर्षीय अल्पवयीन मुलगा अशा पाच जणांचा समावेश आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की,”यातील फिर्यादी इसम संदीप बोळींज व त्यांची पत्नी हे आपल्या दुचाकी वरून वैजापूरवरून कोपरगावच्या दिशेनं येत असताना त्यांच्या गाडीचा पाठलाग करून उक्कडगाव तीळवणी यांच्या मध्ये असलेल्या उपबाजार समितीचे जवळ दोन दुचाकीस्वारांनी त्यांना अडवून त्यांच्याकडील असलेल्या कोयत्याचा धाक दाखवून सदर महिलेच्या अंगावरील दागिने काढून घेतले आहे.त्यात १५ हजार रुपये किमतीचे ३ ग्रॅम वजनाचे मनी मंगळसूत्र,१२ हजार ५०० रुपयांचे अडीच ग्रॅम वजनाचे सोन्याचे वेल,७ हजार ५०० रुपये किमतीचे दीड ग्रॅम वजनाचे कर्णफुले,तेवढ्याच किमतीचे आणखी कर्णफुले याशिवाय ०४ हजार रुपये किमतीचा ‘रेड मी’ मोबाईल त्यात एअरटेल कंपनीचे कार्ड (क्रं.९४०४ ३२ २३६७) असा एकूण ४५ हजार ५०० रुपयांचा ऐवज ओरबाडून धूम ठोकली होती.
या प्रकरणी त्यानी अज्ञात चोरट्याविरुद्ध कोपरगाव तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक-१४०/२०२४ भारतीय न्याय संहिता सन-२०२३चे कलम ३०९(४),३(५) प्रमाणे अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला होता.घटनास्थळी पोलिस निरीक्षक संदीप कोळी यांचेसह त्यांचे सहकाऱ्यांनी भेट देऊन तपास सुरू केला होता.
दरम्यान पोलिसांना एका गुप्त माहितीनुसार या गुन्ह्यातील चोरटे हे संवत्सर येथील असल्याची माहिती मिळाली होती.त्यानुसार तालुका पोलिसांनी या प्रकरणी काल रात्री सापळा लावला होता.व त्यातून कोकमठाण येथून अटक केली आहे.त्यात वरील पाचही अरोपी जेरबंद केले आहे.यासाठी स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी मोठी जबाबदारी पार पाडली आहे.त्यांचेसह तालुका पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्याचे कौतुक होत आहे.यातील एक आरोपी अल्पवयीन असल्याने त्याला बाल न्यायालयासमोर हजर केले जाणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.दरम्यान चोरट्यांना अटक केल्या प्रकरणी जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला यांचेसह स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिनकर आहेर,पोलिस निरीक्षक संदीप कोळी आदींचे कौतुक होत आहे.