जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

कोपरगावात गृहमंत्र्यांविरुद्ध आंदोलन नडले,२२ भाजप कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या कोरोनाचे नियम न पाळता व गर्दी करून सामाजिक अंतर न पाळता जोरजोराने राजीनाम्याची मागणी करणाऱ्या भाजप कोल्हे गटाच्या सुमारे बावीस कार्यकर्त्यांविरुद्ध कोपरगाव शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याने खळबळ उडाली आहे.

भाजपने राज्यात राज्याच्या गृहमंन्त्र्याविरुद्ध राजीनामा दयावा या साठी आंदोलन छेडले आहे.त्याचे लोण कोपरगाव पर्यंत पोहचले असून काल सकाळी भाजप कोल्हे गटाने या विरुद्ध कोपरगाव शहरातील गुरुद्वारा रोड येथील कार्यालयासमोर काल सकाळी अकरा वाजेच्या सुमारास कोरोना मुळे नागरिकांना एकत्र येण्यास नगर जिल्हाधिकारी यांनी दि.१६ मार्च रोजी प्रतिबंध केलेला असतानाही सुरक्षित अंतर न पाळता व सरकारची परवानगी न घेता अचानक आंदोलन केले आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,”राज्याचे गृहमंत्री देशमुख यांच्यावर शंभर कोटी रुपये दर महा गोळा करण्याचा आरोप माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग नुकताच करण्यात आला आहे.त्यामुळे राज्याच्या कायदा आणि सुव्यवस्था तसेच महाविकास आघाडीच्या सावळ्या गोंधळाच्या कारभाराची लक्तरे आता परमबीर सिंह यांच्या ‘लेटर बॉम्ब’मुळे वेशीवर मांडली गेली आहेत.अॅन्टिलिया स्पोटक तपासावरुन सुरु झालेले हे प्रकरण नंतर मनसुख हिरण, सचिन वाझे, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यापासून आता राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुखांपर्यंत पोहचलं आहे.त्यामुळे राज्यातील भाजपने त्या विरुद्ध रान न उठवले तर नवल होते.भाजपने राज्यात राज्याच्या गृहमंन्त्र्याविरुद्ध राजीनामा दयावा या साठी आंदोलन छेडले आहे.त्याचे लोण कोपरगाव पर्यंत पोहचले असून काल सकाळी भाजप कोल्हे गटाने या विरुद्ध कोपरगाव शहरातील गुरुद्वारा रोड येथील कार्यालयासमोर काल सकाळी अकरा वाजेच्या सुमारास कोरोना मुळे नागरिकांना एकत्र येण्यास नगर जिल्हाधिकारी यांनी दि.१६ मार्च रोजी प्रतिबंध केलेला असतानाही सुरक्षित अंतर न पाळता व सरकारची परवानगी न घेता अचानक आंदोलन केले आहे.त्यावर कोपरगाव पोलीस ऍक्शन मोड मध्ये आले असून त्यांनी भाजप कार्यालयासमोर जमलेल्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.त्यात भाजपचे तालुकाध्यक्ष साहेबराव रोहोम,शहराध्यक्ष दत्तात्रय रुपचंद काले,उपनगराध्यक्ष स्वप्नील निखाडे,नगर परिषद गटनेते रवींद्र पाठक,अविनाश पाठक,आरोग्य सभापती शिवाजी खांडेकर,स्वीकृत नगरसेवक सत्येन मुंदडा,माजी शहराध्यक्ष कैलास खैरे,सुशांत खैरे,काँग्रेसचे बाळासाहेब दीक्षित,सुजल चंदनशिव,गोपीनाथ गायकवाड,संजू खराटे,रवी रोहमारे,कुरेशी (पूर्ण नाव माहिती नाही) सर्व रा.कोपरगाव व इतर पाच ते सात अनोळखी इसम आदी विरुद्ध पाच पेक्षा जास्त माणसे जमवल्याने गुन्हा दाखल केला आहे.कोपरगाव शहर पोलिसानी या प्रकरणी भा.द.वि.कलम गुन्हा ९२/२०२,१८८(२),२६९,२७०,२९० प्रमाणे दाखल केला आहे.पुढील तपास पोलिस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार एस.सी पवार हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close