जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कृषी विभाग

…या कंपनीचे मस्टायटीस साठी भारतीय पेटंट

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

भारतीय शेतकऱ्यांचा शेती पूरक व्यवसाय म्हणून दूध व्यवसायाची ओळख आहे. गेल्या काही वर्षापासून दूध व्यवसाय शेतकरी आधुनिक पद्धतीने करत आहेत परंतु या व्यवसायामध्ये जनावरांच्या आरोग्याचे प्रश्न निर्माण होत आहेत. मागील वीस वर्षात मस्टायटीस सारखे घातक आजार जनावरांमध्ये फोफावत चालले आहे. या आजारावर आत्तापर्यंत लस निघालेली नसून अश्वमेधने संशोधन करून आयुर्वेदिक मेडिसिनची नोंदणी मागील तीन वर्षांपूर्वी केली होती व हजारो जनावरांना उपचार करून बरे केले आहे. मस्टायटिस आयुर्वेदिक उपचारासाठी भारतीय पेटंट फाईल केले होते. नुकतेच मस्टेक या अश्वमेध च्या उत्पादनाचे भारतीय पेटंट प्रकाशित झाले असून येणाऱ्या काळात अश्वमेध तर्फे जनावरांच्या आरोग्याच्या दृष्टीने मोठे सेवेचे काम कासदाह या आजारात होईल.

   “या आजारामध्ये जनावरांचे आरोग्य अबाधित राहील शिवाय दुधाची गुणवत्ता देखील टिकून ठेवली जाईल.मस्टायटीस साठी सध्या ५ ते १० हजार औषधोपचार खर्च येत होता तो आता एक हजाराच्या आत राहणार आहे”-डॉ.ज्ञानेश्वर वाघचौरे,कीटक व शेतीतज्ञ.

      त्यांचे हे संशोधन शेतकऱ्यांसाठी खूप मोलाचे ठरणार आहे यापूर्वी देखील लॅम्पी स्कीन आजारावर त्यांनी मोठी मोहीम हाती घेऊन या आजाराचे निर्मूलन करण्यासाठी शेतकऱ्यांना मोठी मदत केली होती.मागील वर्षी टाकळी कोपरगाव येथील गो पालक शेतकरी अण्णा साहेब देवकर यांच्या ५ गाईंना मस्टायटिस लागण झाली होती.इतर उपचार निरर्थक ठरल्यावर त्यांनी. मस्टेक वापरले.अश्वमेध चे मस्टेक सिरप वापरून त्यांना मोठा दिलासा मिळाला होतो.


   या पेटंट मुळे शेतकऱ्यांना औषधी वनस्पती लागवड प्रक्रिया यामध्ये देखील मोठा फायदा होणार असून या उत्पादनाचे हक्क अश्वमेधने राखून ठेवले आहे आणि ते अधोरेखित झाले आहे.
अश्वमेचे मस्टेक हे कासदाह आजारात फायदेशीर ठरत असून मस्टायटिस आजार होऊ नये म्हणून गाई व्याल्यावर ताबडतोब पहिले पाच दिवस दररोज ५० मिली सकाळ संध्याकाळ गायींना दिल्यास मस्तयटीस आजारापासून त्यांचे संरक्षण होते तसेच ज्या गाईंना मस्टाइटिस आजार झाला आहे त्यांना सकाळ संध्याकाळ शंभर मिली पाच ते दहा दिवस मस्टेक सिरप दिल्यास मस्टायटिस वर नियंत्रण मिळते अशा या बहुआयामी उत्पादनास नुकतेच पेटंट प्रसिद्ध झाले असून आयुर्वेदातील मस्टायटिस आजारावरील हे पहिले भारतीय पेटंट आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close