जाहिरात-9423439946
आरोग्य

कोपरगाव तालुक्यातील…या प्राथमिक आरोग्य केंद्राला मान्यता

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्याच्या पूर्व भागातील अनेक गावातील नागरिकांच्या आरोग्याच्या समस्या सोडविण्यासाठी जिल्हा नियोजन समितीने तीळवणी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला मान्यता दिली असून पुढील प्रशासकीय मान्यता तातडीने द्या अशी मागणी श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष आ.आशुतोष काळे यांनी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्याकडे दिलेल्या निवेदनात नुकतीच केली आहे.

“कोपरगाव तालुक्याच्या पूर्व भागातील नागरिकांना आरोग्याच्या दृष्टीने होत असलेली गैरसोय लक्षात घेवून कोपरगाव मतदार संघातील तीळवणी येथे जिल्हा नियोजन समितीकडून प्राथमिक आरोग्य केंद्राला मंजुरी मिळाली आहे.मात्र जिल्हा नियोजन समितीची मान्यता मिळाल्यानंतर मंत्रालय स्तरावर मान्यता मिळणे आवश्यक असून लवकरात लवकर तिळवणी प्रथमिक आरोग्य केंद्राला मंत्रालय स्तरावर प्रशासकीय मान्यता द्यावी यासाठी आपले प्रयत्न सुरु आहे”-आ.आशुतोष काळे,कोपरगाव विधानसभा मतदार संघ.

त्यांनी दिलेल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की,”कोपरगाव तालुक्याच्या पूर्व भागातील नागरिकांना कोपरगाव येथील ग्रामीण रुग्णालय जवळपास २० किलोमीटरच्या अंतरावर आहे.त्यामुळे तातडीने उपचार आवश्यक असणाऱ्या रुग्णांना खाजगी रुग्णालयाचा आधार घ्यावा लागत असून त्यामुळे नागरिकांचे आर्थिक नुकसान होत आहे.

तिळवणी प्रथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून तिळवणीसह कासली,शिरसगाव,आपेगाव,उक्कडगाव,सावळगाव,गोधेगाव,घोयेगाव आदी कोपरगाव तालुक्यातील गावांसह वैजापूर तालुक्यातील नजीकच्या गावातील नागरिकांचे आरोग्य आबाधित राहण्यासाठी मोठी मदत होणार आहे.कोपरगाव तालुक्याच्या पूर्व भागातील नागरिकांना आरोग्याच्या दृष्टीने होत असलेली गैरसोय लक्षात घेवून कोपरगाव मतदार संघातील तीळवणी येथे जिल्हा नियोजन समितीकडून प्राथमिक आरोग्य केंद्राला मंजुरी मिळाली आहे.मात्र जिल्हा नियोजन समितीची मान्यता मिळाल्यानंतर मंत्रालय स्तरावर मान्यता मिळणे आवश्यक असून लवकरात लवकर तिळवणी प्रथमिक आरोग्य केंद्राला मंत्रालय स्तरावर प्रशासकीय मान्यता द्यावी.

दरम्यान मागील ४ महिन्यांपासून आशा सेविकांचे वेतन थकलेले आहे.त्यामुळे त्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असून आशा सेविकांना तातडीने थकलेले वेतन देण्यात यावे अशी मागणी त्यां दिलेल्या निवेदनात शेवटी केली असल्याचे त्यांनी आपल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.या मागण्यांना आरोग्यमंत्री सावंत यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊव लवकरच प्रशासकीय मान्यता देण्याचे आश्वासन दिले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close