जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कृषी विभाग

…या तालुक्यातील शेतकऱ्यांना पिक विम्याची भरपाई जाहीर !

न्यूजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी)

  कोपरगाव तालुक्यात मागील वर्षीच्या खरीप हंगाम २०२५ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे काढणीला आलेल्या खरीप हंगामातील पिकांचे नुकसान झाल्याने १५ हजार शेतकऱ्यांना पंतप्रधान पिक विमा योजेन अंतर्गत उत्पादन आधारित ९.६६ कोटी नुकसान भरपाई रक्कम महायुती शासनाने मंजूर करून हि रक्कम नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली असल्याची माहिती आ.आशुतोष काळे यांनी दिली आहे.

“कोपरगाव तालुक्यातील बाधित १५ हजार शेतकऱ्यांना ९.६६ कोटी नुकसान भरपाई रक्कम मंजूर केली आहे.त्यामुळे निश्चितच शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून खरीप हंगाम २०२६ च्या तयारीसाठी आर्थिक मदत होणार आहे”- आ.आशुतोष काळे,कोपरगाव.

   अहिल्यानगर जिल्ह्यातील अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे ३०० गावे बाधित झाली असून,२५ कोटी रुपयांचा नुकसान भरपाई प्रस्ताव सादर करण्यात आला होता.खरीप २०२५ मधील पीकविमा भरपाई मिळण्याची प्रक्रिया सुरू असून,नगरसह अनेक जिल्ह्यांत १,२१९ कोटी रुपयांची भरपाई मंजूर झाली आहे,त्यात कोपरगाव तालुक्यातील बाधित १५ हजार शेतकऱ्यांना ९.६६ कोटी नुकसान भरपाई रक्कम मंजूर केली आहे.त्यामुळे निश्चितच शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून खरीप हंगाम २०२६ च्या तयारीसाठी आर्थिक मदत होणार आहे.खरीप हंगामातील पिके उभे करण्यासाठी आवश्यक असलेले आर्थिक भांडवल उपलब्ध झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंता दूर झाल्या आहेत.त्यामुळे नुकसान भरपाई मिळवून देणाऱ्या आ.आशुतोष काळे यांचे कोपरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ९.६६ कोटी नुकसान भरपाई रक्कम जमा झाली आहे.

  दरम्यान या नुकसान भरपाईबद्दल आ.काळे यांनी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस,उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,कृषी मंत्री दत्ता भरणे,पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांचे आभार मानले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close