जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

तरुणींवर शारीरिक अत्याचार,कोपरगावात गुन्हा,खळबळ

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

देशभरात वर्तमान स्थितीत ‘द केरला स्टोरी’या चित्रपटाने हिंदू तारुणींवर होत असलेले अत्याचाराचे वास्तव दाखवून वादळ उठवलेले असताना कोपरगाव शहरानजीक राहाता तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रहिवासी असलेल्या व खाजगी कंपनीस कलेशनची नोकरी करत असलेल्या तरुणीस (वय-२२) काल दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास,”मला तुझ्या सोबत बोलायचे आहे,तू माझ्या सोबत चल,नाही आली तर तूझी बदनामी करील” अशी धमकी देऊन तिला स्कुटीवर बसवून तिला कोपरगाव नजीक असललेल्या खेड्यातील मित्राच्या घरी नेऊन तिच्यावर शारीरिक अत्याचार केल्या प्रकरणी कोपरगाव हनुमाननगर येथील आरोपी शरीफ मोहम्मद पठाण याच्यावर कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्याने शहर आणि तालुक्यात खळबळ उडाली आहे.

कोपरगाव येथील आरोपी आरोपीने दि.२४ मे २०२३ रोजी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास तिला,”मला तुझ्या सोबत बोलायचे आहे,तू माझ्या सोबत चल,माझ्या सोबत नाही आली तर तूझी बदनामी करील” अशी धमकी देऊन तिला स्कुटीवर बसवून मूर्शतपुर फाट्यावर नेऊन आरोपीचा मित्र आकाश जालिंदर पवार याच्या घरात नेऊन तिच्या मनाविरुद्ध बळजबरीने अत्याचार केला आहे.त्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

महिलांना अथवा तरुणींना पळवून नेऊन तिच्या संमतीशिवाय किंवा बळजबरीने लैंगिक संबंध प्रस्थापित करणे म्हणजे बलात्कार समजला जातो.यात पीडित व्यक्ती ही बहुतांशी स्त्री असते.हा एक लैंगिक अत्याचार व कायदेशीर गुन्हा मानला जात असताना व यात आरोपीला मोठी शिक्षा होऊ शकत असताना यात कोणतीही कमी येताना आढळत नाही अशीच घटना कोपरगाव नजीक पश्चिमेस एका खेड्यात घडली असून आरोपी हा कोपरगाव शहरातील हनुमानगर येथील रहिवासी असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे.

सदर प्रकरणात पीडित तरुणी हि राहाता तालुक्यातील असून ती खाजगी कंपनीत आर्थिक कलेशन करत असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.सदर तरुणी हि कोपरगाव शहरात कलेक्शनसाठी आपल्या दुचाकीवर नेहमी येत असते.या दरम्यान आरोपी आणि तिच्यात जुजबी ओळख झाली होती.त्याचा गैर फायदा घेऊन आरोपीने दि.२४ मे २०२३ रोजी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास तिला आरोपी शरीफ मोहंमद पठाण रा.हनुमाननगर कोपरगाव येथील रहिवासी असलेल्या तरुणाने,”मला तुझ्या सोबत बोलायचे आहे,तू माझ्या सोबत चल,माझ्या सोबत नाही आली तर तूझी बदनामी करील” अशी धमकी देऊन तिला स्कुटीवर बसवून मूर्शतपुर फाट्यावर नेऊन आरोपीचा मित्र आकाश जालिंदर पवार याच्या घरात नेऊन तिच्या मनाविरुद्ध बळजबरीने तिच्या सोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले तसेच फिर्यादी घरी जात असताना आरोपी शरीफ पठाण याने तिच्या पाठीमागून येऊन पीडित तरुणीला ‘आत्मा मालिक हॉस्पिटल’ समोर गाडी अडवून पीडित तरुणीच्या गाडीची चावी काढून फिर्यादी तरुणीला धमकी दिली आहे.

दरम्यान घटनास्थळी शिर्डी येथील उपविभागीय पोलीस अधिकारी,कोपरंगाव शहर पोलीस ठण्याचे पोलीस निरीक्षक रामराव ढिकले,उपनिरीक्षक भरत दाते यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून भेट दिली आहे.

दरम्यान या प्रकरणी कोपरगाव हनुमाननगर येथील आरोपी शरीफ मोहम्मद पठाण याच्यावर कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रं.२४९/२०२३ भा.द.वि.कलम ३७६,३४१,५०६ अन्वये गुन्हा दाखल केल्याने कोपरगाव शहर आणि राहाता तालुक्यात खळबळ उडाली आहे.या प्रकरणी पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांचे मार्गदर्शनाखाली पो.उपनिरीक्षक भरत दाते हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close