जाहिरात-9423439946
जगावेगळे

…या समाजावरील अत्याचार होणार कमी,पोलिसांचा नाविण्यपूर्ण उपक्रम

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(नानासाहेब जवरे)

कोपरगाव तालुक्यातील पढेगाव ग्रामपंचायत हद्दीत रहिवासी असलेल्या पारधी वस्ती परिसरात कोपरगाव तालुका पोलिसांच्या पुढाकाराने दोन सी.सी.टी.व्ही.कॅमेरे सामाजिक कार्यकर्ते नामदेव भोसले यांचे सौजन्याने बसविण्यात आले असून या कॅमेऱ्यामुळे पारधी समाजातील बांधवात सुरक्षितता मिळेल व त्यांच्यावर होत असलेला अन्याय अत्याचार कमी होईल असा विश्वास कोपरगाव तालुका पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी व्यक्त केला आहे.

दोन्ही संकल्पित छायाचित्रे.

स्वातंत्र्यानंतर जवाहरलाल नेहरूंनी आदिवासींना जन्मजात गुन्हेगार ठेवणारे कायदे बंद करून त्यांचा अनुसूचित जमाती जमातीत समावेश केला.कागदोपत्री त्यांच्याकरता बऱ्याच योजना राबवल्या जाऊनही पोलीस आणि समाजाने त्यांना मुख्य प्रवाहात व्यवस्थितपणे सामावून घेतले नाही.बहुसंख्य पारधी समाज भटका असल्यामुळे आजही त्यांच्यावर गुन्हेगारीचा शिक्का बसला असल्याने त्यांना वावरणे मुश्किल झाले आहे.ती अडचण ओळखून त्यांच्यावर होणार अत्याचार कमी करण्यासाठी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी चलचित्रण बसविण्याचा नाविन्यपूर्ण उपक्रम सुरु केला आहे.त्याकडे आता संपूर्ण पोलीस दलाचे लक्ष लागून आहे.

“फासे पारधी” समाज हा भारतातील जंगलात शिकारी करून जगणाऱ्या समाजापैकी एक विशिष्ट समाज आहे.पारधी समाज हा आदिवासी आहे.इंग्रजांनी भारतातील जंगलातून शिकारींवर मोठ्या प्रमाणावर बंदी घालून जंगलाबाहेर काढलेला हा समाज,भारताच्या ग्रामीण भागाने मुख्य प्रवाहात सामील करून न घेतल्यामुळे, उपजीविकेसाठी गुन्हेगारीच्या मार्गास लागला. इंग्रजांनी विशेष कायदा करून त्यांना जन्मजात गुन्हेगारी जमात हा ठसा मारला.इंग्रजांच्या काळात त्यांच्याकडून दिवसा शासकीय वेठबिगारी कामे करून घेतली जात आणि रात्री कडा पहारा ठेवून त्यांना वस्तीबाहेर पडण्यास पूर्ण बंदी घातलेली असे.स्वातंत्र्यानंतर जवाहरलाल नेहरूंनी आदिवासींना जन्मजात गुन्हेगार ठेवणारे कायदे बंद करून त्यांचा अनुसूचित जमाती जमातीत समावेश केला.कागदोपत्री त्यांच्याकरता बऱ्याच योजना राबवल्या जाऊनही पोलीस आणि समाजाने त्यांना मुख्य प्रवाहात व्यवस्थितपणे सामावून घेतले नाही.बहुसंख्य पारधी समाज भटका असल्यामुळे मतदारयादीतील नोंदणी,रेशनकार्ड आणि त्यापरत्वे मिळणाऱ्या शासकीय सुविधंपासून आणि शिक्षणापासून वंचित रहात आला आहे.अनुसूचित जमाती जातिबांधवांचे पारधी समाज हे एक अंग आहे.त्या समूहात ५४ जमाती,जवळपास पावणेदोनशे पोटजमाती आणि त्यांच्यात सामावलेला सुमारे दोन-अडीच कोटींचा जनसमूह आहे.मात्र गुन्हेगारीचास शिक्का बसल्याने आजही हा समाज मुख्यप्रवाहापासून दूर असल्याचे दिसत आहे.त्यानां मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विविध योजना सरकार रबवत असले तरी त्या त्यांच्या पर्यंत पोहचत नाही हे वास्तव आहे.या समाजातील नागरिकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी काही अधिकारी विशेष प्रयत्न करताना दिसत आहे.या पूर्वी श्रीगोंदा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असताना पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी असा उपक्रम राबवला होता.त्या नंतर या जमातीस मुख्य प्रवाहात आणण्यासाठी व त्यांना सुरक्षा प्रदान करण्यासाठी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गत माहिन्यात रुजू झालेले पोलीस अधिकारी वासुदेव देसले यांनी चंग बांधला असल्याचे दिसत असून त्यासाठी त्यांनी तेथील सामाजिक कार्यकर्ते नामदेव भोसले यांच्या सहकार्याने या वस्तीवर चलचित्रण कॅमेरे बसविण्याचा निर्णय घेतला आहे. व तो थेट कृतीत आणला आहे.व त्यासाठी त्यांनी आगामी काळात गुन्हेगारी पासून परावृत्त करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्याचे ठरवले असल्याचे आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले आहे.

“समाजातील विविध असामाजिक घटक पारधी समाजातील घटकांना गुन्हेगार समजून त्यांच्यावर अत्याचार करताना दिसतात त्यास आळा बसण्यास मदत होणार आहे.व त्यांना न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा होऊ नये यासाठी या उपक्रम सुरु केला आहे.त्यामुळे सदर ठिकाणी अत्याचार करायला जाताना शंभर वेळा विचार करावा लागणार आहे”-वासुदेव देसले,पोलीस निरीक्षक,कोपरगाव तालुका पोलीस ठाणे.

सदर प्रकरणी पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी सांगितले की,”पोलीस हे सर्वच समाजातील सर्वच घटकांचे मित्र आहे.व त्यानां त्या पासून संरक्षण मिळणे गरजेचे होते.त्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे.या दिनरात्र सुरु असलेल्या चलचित्रण कॅमेऱ्यामूळे विविध असामाजिक घटक पारधी समाजातील घटकांना गुन्हेगार समजून त्यांच्यावर अत्याचार करताना दिसतात त्यास आळा बसण्यास मदत होणार आहे.व त्यांना न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा होऊ नये यासाठी या उपक्रम सुरु केला आहे.त्यामुळे सदर ठिकाणी अत्याचार करायला जाताना शंभर वेळा विचार करावा लागणार असल्याचे सांगितले आहे.व ते आपल्या घरीच असल्याने त्यांच्यावर अनेक वेळा अन्यत्र गुन्हे दाखल होऊन त्यात अनेक वर्ष कोर्ट कचऱ्यात विनाकारण वाया जातात त्यात मानसिक व आर्थिक त्रास,छळ सहन करावा लागतो तो या उपाय योजनांमुळे त्यास प्रतिबंध होताना दिसणार आहे.त्याकडे एक नाविण्यपूर्ण उपक्रम म्हणून पाहायला हरकत नाही.

दरम्यान हा राज्यातील पहिलाच प्रयोग असल्याने त्याकडे अनेकांचे लक्ष लागून आहे.या शिवाय त्यांच्यासाठी सरकारने सुरु केलेल्या विविध योजना त्यांच्या पर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न करणार आहे.त्यासाठी आठवड्यातून पोलीस अधिकारी बैठका घेऊन समाज प्रबोधन करणार आहे.त्यासाठी त्यांनी त्यासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले असल्याचे पोलीस निरीक्षक देसले यांनी शेवटी सांगितले आहे.आगामी काळात त्याचे परिणाम व त्यापासून निघणारे निष्कर्ष दिसणार आहेच.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close