जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

शहरात २.१२ लाख रुपयांचा दागिना गहाळ,कोपरगाव पोलिसांत नोंद

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहरातील व्यापारी संजय प्रेमसुख बंब यांच्या मुलाचे लग्नानंतर त्यांचे वर व वधू कोपरगाव शहरातील,’हॉटेल विरा पॅलेस’ या ठिकाणी विश्रांती व ताजेतवाने होण्यासाठी थांबले असता येथील वधूच्या दंडावरील २.१२ लाखांचे सोन्याचा बाजूबंद गहाळ झाला असून या बाबत त्यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गहाळ मालमत्ता नोंदणी रजिस्टर मध्ये नोंद करण्यात आल्याने कोपरगाव शहरात खळबळ उडाली आहे.याबाबत उलट-सुलट चर्चेला उधाण आले आहे.

दोन्ही छायाचित्रे संकल्पित.

बंब यांचा लग्न सोहळा संपन्न झाल्यानंतर वर आणि वधु यांना घेऊन वऱ्हाडी मंडळी उशीर झाला म्हणून,’हॉटेल विरा पॅलेस’ या ठिकाणी दि.१० मे रोजी मुक्कामी राहिली असता त्या ठिकाणी सदर नवीन जोडपे विश्रांती व ताजेतवाने होण्यासाठी थांबले होते.त्यानंतर ते हॉटेलच्या वरील मजल्यावरून खाली उतरून येत असताना वधूच्या दंडावरील चार तोळे वजनाचा २.१२ लाख रुपये किमतीचे सोन्याचा बाजूबंद पडला असून तो अज्ञात व्यक्तीने उचलला असल्याचे समजते.

गत महिन्यात अस्त असल्याने लग्नाला मुहूर्त नव्हता त्यामुळे अनेक लग्ने खोळंबली होती.मात्र मे महिना सुरु झाला आणि लग्नाची धूम उडाली आहे.त्यामुळे सर्वत्र लग्नाची गर्दी दिसत आहे.लग्नाच्या या धामधूमीत विविध चित्रविचित्र घटना घडत असून या गर्दीचा फायदा चोरट्यानी न उठवला तर नवल ! प्रत्येक ठिकाणी चोरीचा होते असे नव्हे तर काही ठिकाणी लगीनघाईत कोणती वस्तू कुठे ठेवली जाते याचा लग्न घरच्या कर्त्या पुरुषांना विसरही पडत असतो.त्यामुळे काही वेळा जवळ वस्तू असूनही ती सापडत नाही त्यामुळे मोठी धांदल उडताना दिसत आहे.तर काही ठिकाणी चोरटे गर्दीचा संधीचा फायदा उठवून आपला हात साफ करताना दिसत आहे.अशीच घटना कोपरगाव शहरातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यासमोर असलेल्या ‘हॉटेल विरा पॅलेस’ या ठिकाणी घडली आहे.

त्याचे झाले असे की,”कोपरगाव येथील प्रसिद्ध व्यापारी संजय प्रेमसुख बंब यांचे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात ‘प्रसन्न पाईप’ नावाचे दुकान आहे.त्यांच्या मुलाचा लग्न सोहळा नुकताच दि.०९ मे रोजी महाबळेश्वर येथील थंड हवेच्या ठिकाणी संपन्न झाला आहे.लग्न सोहळा संपन्न झाल्यानंतर वर आणि वधु यांना घेऊन वऱ्हाडी मंडळी उशीर झाला म्हणून,’हॉटेल विरा पॅलेस’ या ठिकाणी दि.१० मे रोजी मुक्कामी राहिली असता त्या ठिकाणी सदर जोडपे विश्रांती व ताजेतवाने होण्यासाठी थांबले होते.त्यानंतर ते हॉटेलच्या वरील मजल्यावरून खाली उतरून येत असताना वधूच्या दंडावरील चार तोळे वजनाचा २.१२ लाख रुपये किमतीचे सोन्याचा बाजूबंद पडला असून तो अज्ञात व्यक्तीने उचलला असल्याचे समजते.त्याचा त्यांनी खूप शोधाशोध करूनही त्याचा शोध घेऊनही तो लागला नाही त्यामुळे अखेर त्यांनी सदर खबर कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात त्यांची नोंद केली आहे.

दरम्यान या बाबत कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात हरवलेली मालमत्ता या सदरात नोंद दाखल केली आहे.कोपरगाव शहर पोलीस पुढील ठाण्याचे पोलीस निरीक्षक ढिकले यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close