जाहिरात-9423439946
शैक्षणिक

कोपरगाव नजीक असलेल्या…या शाळेचा निकाल जाहीर

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव नजीक असलेल्या कोकमठाण शिवारात असलेल्या सी.बी.एस.ई.चा २०२२-२३ चा इ.१० वी आणि इ.१२ वी चा निकाल नुकताच जाहीर झाला आहे.त्यामध्ये समता इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी अ.नगर जिल्ह्यात बाजी मारत उज्वल निकालाची परंपरा कायम राखली आहे.इ.१० वीत अथर्व बेरगळ आणि हर्ष कासलीवाल यांनी ९७ टक्के गुण मिळवुन स्कूलमध्ये प्रथम येण्याचा मान मिळविला तर तनिषा जैन हिने ९६.४ टक्के गुण मिळवत द्वितीय तर गणेश गवळी आणि आयुष जोर्वेकर यांनी ९५.४ टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक मिळविला आहे यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

समताच्या उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे समता इंटरनॅशनल स्कूलचे संस्थापक अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे,मॅनेजिंग ट्रस्टी स्वाती कोयटे,मुख्य कार्यवाहक संदीप कोयटे,व्यवस्थापन समितीचे सदस्य,प्राचार्या हर्षलता शर्मा,उपप्राचार्य समीर अत्तार,शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

अन्य यशस्वी विद्यार्थ्यांत तर इ.१२ वीत श्रुतिका देशमुख हिने ९५ टक्के,ओम जाधव आणि प्रीती परदेशी यांनी ९४.२ तर गार्गी कदम हिने ८८ टक्के गुण मिळवत अनुक्रमे प्रथम,द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळवत यश संपादन केले आहे.समता इंटरनॅशनल स्कूलचे या वर्षी सर्वच विद्यार्थी प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण होऊन समताची इ.१० वी आणि इ.१२ वीच्या निकाल १०० टक्के लागण्याची परंपरा राखली आहे.

समता इंटरनॅशनल स्कूल मधील ६ विद्यार्थी ९५ टक्केच्या पुढे गुण मिळवुन उत्तीर्ण झाले आहे.त्यात अथर्व बेरगळ,हर्ष कासलीवाल,तनिषा जैन,गणेश गवळी,आयुष जोर्वेकर,सोनल अहिरे या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.९० ते ९५ टक्केच्या दरम्यान स्वरूपा दास,पलक भुतडा,दिवा सांड,संजना विभुते,भावेश बोथरा,समर्थ शिंदे,साईश कथले,युग लोढा,सुधांशु आदिक या ९ विद्यार्थ्यांनी गुण मिळवून यश संपादन केले आहे.गणित विषयात अथर्व बेरगळ याला १०० पैकी १०० गुण मिळाले आहे तर समाजशास्त्र विषयात सोनल अहिरे,संजना विभुते यांनी १०० पैकी १०० गुण मिळविले आहे.इ.१२वीच्या विज्ञान शाखेतील प्रीती परदेशी हिने कॉम्प्युटर सायन्स या विषयात १०० पैकी १०० गुण मिळविले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close