जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

माहेराहून १० लाख आणण्यासाठी महिलेचा छळ,कोपरगावात गुन्हा

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

आपल्या माहेरहून व्यवसायासाठी १० लाख रुपये आणावे या साठी सासरी असताना महिलेचा शारीरिक मानसिक छळ करून तिला नांदविण्यास नकार देऊन दुसरे लग्न करण्याची धमकी दिल्याच्या कारणावरून कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात नाशिक माणिकशहानगर येथील फिर्यादी महिला आरती संतोष हासे (वय-४१) यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्याने कोपरगाव,नाशिक परिसरात खळबळ उडाली आहे.

१९८६ मध्ये हुंड्यापासून संरक्षण देण्यासाठी कलम-४९८(अ) या कलमाची तरतूद करण्यात आली.हुंड्याच्या मागणीसाठी शारिरीक अथवा मानसिक अशा कोणत्याही पद्धतीने महिलेचा छळ केल्यास या कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात येतो असे गुन्हे अलीकडील काळात मोठया प्रमावणावर वाढले आहे.कोपरगाव शहरही त्याला अपवाद नाही.कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात असा गुन्हा नुकताच नाशिक माणिकशहा नगर येथील सासर असलेली फिर्यादी महिला आरती हासे पाटील यांनी आपल्या नवऱ्या विरुद्ध दाखल केला आहे.

या कलमाअंतर्गत लग्नानंतर पत्नीच्या सुरक्षिततेची सगळी जबाबदारी पतीकडेच देण्यात आली असल्याचे मानण्यात येत आहे.पण भारतीय दंड विधान कलम-४९८ (अ) अंतर्गत याची व्याख्या करण्यात आलेली नाही.१९८६ मध्ये हुंड्यापासून संरक्षण देण्यासाठी कलम-४९८(अ) या कलमाची तरतूद करण्यात आली.हुंड्याच्या मागणीसाठी शारिरीक अथवा मानसिक अशा कोणत्याही पद्धतीने महिलेचा छळ केल्यास या कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात येतो असे गुन्हे अलीकडील काळात मोठया प्रमावणावर वाढले आहे.कोपरगाव शहरही त्याला अपवाद नाही.कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात असा गुन्हा नुकताच नाशिक माणिकशहा नगर येथील सासर असलेली फिर्यादी महिला आरती हासे पाटील यांनी आपला नवरा संतोष गुलाबराव हासे पाटील रा.नाशिक माणिकशहा नगर प्रसन्न बंगला प्रसन्न हौसिंग सोसायटी समोर याचे विरुद्ध नुकताच दाखल केली आहे.

आपल्या फिर्यादीत फिर्यादी महिलेने म्हटले आहे की,”आपले लग्न दि.०१ फेब्रुवारी २०२० रोजी झाले होते.त्यानंतर नव्या नवलाईचे नऊ दिवस संपल्यावर नवरा संतोष हासे याने आपले खरे रंग दाखविण्यास सुरुवात केली होती.त्याने आपण आपल्या माहेराहून त्यास लागणाऱ्या धंद्यासाठी लागणारे १० लाख रुपये आणावे यासाठी आपला शारीरिक,मानसिक छळ सुरु करून नांदविण्यास नकार दिला होता.व दुसरे लग्न करण्याची धमकी दिली असल्याचे म्हटलं आहे.दरम्यान या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांनी घटनास्थळी भेट दिली आहे.

या प्रकरणी फिर्यादी माहिलेच्या फिर्यादीवरून कोपरगाव शहर पोलिस ठाण्याच्या दप्तरी नोंद केली क्रं.१६९/२०२३ भा.द.वि.कायदा कलम-४९८(अ),३२३,५०४,५०६ अन्वये आज नोंद केली आहे.पुढील तपास पोलिस निरीक्षक ढिकले यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस पोलीस हे.कॉ.डी.आर.तिकोणे हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close