जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

शहरात दोन गटात हाणामारी,सहा जण अटक,कोपरगावात एक फरार

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहरातील सुभाषनगर या उपनगरात काल रात्री १०.३० वाजेच्या सुमारास कामाची आगाऊ ५०० रुपयांची रक्कम दिली नाही याचा राग मनात धरून त्याच भागातील आरोपी शाहरुख आकलीस शेख यासह सात जणांनी फिर्याडीचे वडिलांना लाकडी दांडक्याने व विटांनी मारहाण करून जखमी केल्याची घटना घडली आहे.या प्रकरणी फिर्यादी वसीम सय्यद बागवान (वय-२७) याने कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.त्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे.यातील सहा आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे तर एक जण मात्र फरार झाला आहे.

दि.०७ एप्रिल रोजी रात्री १०.३० वाजेच्या सुमारास सुभाषनगर येथील आरोपी शाहरुख शेख,सोहेल जावेद पठान,राजु आरिफ शेख,गोलु ऊर्फ गगणदिप सिंग रा.सुभाषनगर कोपरगाव मुळ रा.पंजाब,विजय आरक,शुभम ऊर्फ लारा जाधव,गोटया (पुर्ण नाव माहीती नाही)आदींना कामासाठी आगाऊ रुपये ५०० दिले नाही म्हणुन या आरोपींनी बेकायदेशीरपणे जमाव करुन आपले घरात घुसुन आपले वडिल,भाउ,मामाचा मुलगा आदींना त्यांचे हातातील विटा फेकुन मारुन जखमी करुन “तुम्हांला सोडणार नाही” अशी धमकी देवुन पोबारा केला आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,”कोपरगाव शहरातील सुभाषनगर,संजय नगर आणि हनुमाननगर,गांधीनगर आदी भाग अत्यंत संवेदनशील मानला जातो.त्या भागात किरकोळ कारणावरून वारंवार तंटेबखेडे होताना दिसत असतात.त्यामुळे या भागात पोलिसांना कायम लक्ष ठेवून रहावे लागते.तरीही या गुन्ह्यात घट होताना दिसत नाही.अशीच घटना नुकतीच काल रात्री १०.३० वाजता सुभाषनगर येथे फिर्यादीच्या घरासमोर घडली आहे.

यातील फिर्यादी वसीम बागवान याने आपल्या फिर्यादीत म्हटलं आहे की,”आपण आयेशा कॉलनी संजयनगर येथील
रहिवासी असून आपल्या कुटुंबासोबत राहतो.दि.०७ एप्रिल रोजी रात्री १०.३० वाजेच्या सुमारास सुभाषनगर येथील आरोपी शाहरुख शेख,सोहेल जावेद पठान रा.सुभाषनगर,राजु आरिफ शेख रा.संजयनगर,गोलु ऊर्फ गगणदिप सिंग रा.सुभाषनगर कोपरगाव मुळ रा.अमृतसर राज्य पंजाब,विजय आरक रा.सुभाषनगर,शुभम ऊर्फ लारा जाधव,रा.सुभाषनगर,गोटया (पुर्ण नाव माहीती नाही)आदींना कामासाठी आगाऊ रुपये ५०० दिले नाही म्हणुन या आरोपींनी बेकायदेशीरपणे जमाव करुन आपले घरात घुसुन आपले वडिल सय्यद बागवान यांना लाकडी दांडयाने व आपला भाउ जावेद बागवान,मामाचा मुलगा अकबर फकिरा बागवान यांना त्यांचे हातातील विटा फेकुन मारुन जखमी करुन शिवीगाळ केली आहे.व “तुम्हांला सोडणार नाही” अशी धमकी देवुन तेथुन पळुन गेले आहे.या दरम्यान आरोपींनी विटा फेकुन मारल्याने शेजारील रहिवासी इम्मतीयाज कोथमिरे यांचे घराच्या काचा फुटुन त्यांच्या घराचे नुकसान झाले आहे.

दरम्यान या घटनेत सय्यद अहमद बागवान,अकबर फकिरा बागवान,जावेद सय्यद बागवान सर्व रा.सुभाषनगर कोपरगाव हे तीन जण जखमी झाले आहे.यातील एक जेष्ठ नागरिक मयत झाल्याची अफवा शहरात पसरली होती त्यास पोलीस अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला नाही ‘ती’ अफवा असल्याचे सांगितले आहे.

दरम्यान या गुंह्यातील आरोपी राजू आरिफ शेख वगळता सर्व सहा आरोपी पोलिसांनी जेरबंद केले असल्याची माहिती तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक ठोंबरे यांनी दिली आहे.

दरम्यान कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामराव ढिकले,पोलीस उपरिक्षक रोहिदास ठोंबरे आदींनी घटनास्थळी भेट देऊन या प्रकरणी कारवाई केली आहे.

या प्रकरणी फिर्यादी वसीम बागवान (वय-२७) यांच्या फिर्यादीवरून कोपरगाव शहर पोलिस ठाण्याच्या दप्तरी पहाटे २.१९ वाजता नोंद केली क्रं.१६७/२०२३ भा.द.वि.कायदा कलम-४५२,१४३,१४७,१४८,१४९,३२४,४२७,३२३,५०४,५०६ अन्वये आज नोंद केली आहे.पुढील तपास पोलिस निरीक्षक ढिकले यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस पोलीस उपनिरीक्षक ठोंबरे हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close