जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

दुचाकीस अपघात,एक ठार,एक जखमी,कोपरगावात गुन्हा

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील संवत्सर शिवारातील मुंबई-नागपूर या रस्त्यावरून जात असताना समोरून येणाऱ्या अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत भानुदास भिवराव गोरे हे मयत झाले त्यांची पत्नी शोभा भानुदास गोरे या जखमी झाल्या असल्याचा गुन्हा कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात फिर्यादी अनिल भानुदास गोरे (वय-३२) यांनी दाखल केल्याने घोयेगाव सह वैजापूर,कोपरगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.

फिर्यादीचे वडील भानुदास गोरे व आई शोभा गोरे व त्यांचा नातू सोहम विनायक बर्डे (वय-११) दि.१२ मार्च रोजी सायंकाळी ०६ वाजता कोपरगाव तालुक्यातील रवंदे येथील पाहुण्यांच्या गावी जागरण गोंधळ असल्याने जात असताना ते कोपरगाव तालुक्यातील संवत्सर शिवारात मुंबई-नागपूर ये मार्गावर प्रवास करत असताना त्यांना एका अज्ञात वाहनाने धडक दिली होती.त्यात ते गंभीर रित्या जखमी झाले होते.त्यात वडील जखमी होऊन त्यात त्यांचे निधन झाले होते तर आई गंभीर जखमी झाली होती.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,फिर्यादी इसम हे घोयेगाव ता.वैजापूर येथील रहिवासी आहेत.त्यांचे मयत वडील भानुदास गोरे व आई शोभा गोरे व त्यांचा नातू सोहम विनायक बर्डे (वय-११) दि.१२ मार्च रोजी सायंकाळी ०६ वाजता कोपरगाव तालुक्यातील रवंदे येथील पाहुण्यांच्या गावी जागरण गोंधळ असल्याने जात असताना ते कोपरगाव तालुक्यातील संवत्सर शिवारात मुंबई-नागपूर ये मार्गावर प्रवास करत असताना त्यांना एका अज्ञात वाहनाने धडक दिली होती.त्यात ते गंभीर रित्या जखमी झाले होते.त्याबाबत फिर्यादीला माहिती मिळाल्यावर ते घटनास्थळी गेले असता त्या जखमींना नजीकच्या ग्रामस्थानीं उपचारार्थ नजीकच्या संत जनार्दन स्वामी रुग्णालयात हलविले होते.तेथे उपचार सुरु असताना जखमी वडील भानुदास गोरे यांचे दि.१३ मार्च रोजी रात्री १.३० वाजता निधन झाले होते.त्यांना पुढील कार्यवाहीसाठी कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते.त्यांच्या अंत्यविधी झाल्यानंतर व आईला घरी आणल्या नंतर व वडिलांचा दहावा आणि तेरावा झाल्यानंतर सदर फिर्यादी इसम अनिल गोरे यांनीं आज नुकतीच कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

दरम्यान कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांनी व पोलीस फौजदार पुंड आदींनी घटनास्थळी भेट देऊन या प्रकरणी अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणी फिर्यादी महिलेच्या फिर्यादीवरून कोपरगाव तालुका पोलिस ठाण्याच्या दप्तरी नोंद केली क्रं.१४९/२०२३ भा.द.वि. कायदा कलम-३०४(अ),३३७,३३८,४२७,मोटार वाहन कायदा कलम १८४,१७७,१३४(अ)१३४(ब) अन्वये आज नोंद केली आहे.पुढील तपास पोलिस देसले यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस हे.कॉ. राजू पुंड हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close