धार्मिक
कोपरगाव शहरातून साई गाव पालखी हजारो भाविकांच्या उपस्थितीत रवाना

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
मुंबादेवी मित्र मंडळाच्या वतीने दर वर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या साईगाव पालखीचे यावर्षीही मोठ्या उत्साहात आयोजन करण्यात आले होते.त्यावेळी श्री प्रभू रामचंद्र आणि श्री साई बाबांच्या नावाचा जयघोष करत हजारो भाविकांनी दुपारी ४.३० वाजेच्या सुमारास वाद्यांच्या गजरात शिर्डी कडे प्रयाण केले आहे.
मुंबादेवी तरुण मित्र मंडळाच्या वतीने कोरोना साथीच्या नंतर सालाबादा प्रमाणे दर वर्षी रामनवमीचा कार्यक्रम संपन्न होत असतो.त्या निमित्ताने दरवर्षी सर्वात मोठा पालखी सोहळा शिर्डी साठी प्रस्थान करत असतो.तत्पूर्वी,’ देवी भागवत’ सात दिवस मोठ्या उत्साहात संपन्न झाले असून त्यासाठी पुरुष भाविकांसह महिला वर्गाने मोठी हजेरी लावली आहे.यावर्षी पालखी सोहळा आज गुरुवार दि.३० मार्च रोजी दुपारी ०४.३० वाजता सोहळा संपन्न झाला आहे.
श्री क्षेत्र शिर्डी हे देशातील नामांकित देवस्थान असून श्री साईबाबांच्या समाधीच्या दर्शनाकरीता देशाच्या व जगाच्या कानाकोप-यातुन भक्त दर्शनाकरीता शिर्डी येथे येत असतात.तसेच श्री साईबाबा संस्थानच्या वतीने दरवर्षी श्रीरामनवमी,श्री गुरुपौर्णिमा,श्रीपुण्यतिथी आदी प्रमुख उत्सवांचे आयोजन करण्यात येते.पालखीसह येणारे पदयात्री या उत्सवांचे प्रमुख्य वैशिष्टये असते.त्यामुळे राज्याच्या विविध ठिकाणाहून पालखीसह येणारे पदयात्रींची संख्या ही मोठया प्रमाणात असते.मात्र सर्वात मोठी पालखी म्हणून कोपरगाव शहरातील मुंबादेवी मित्र मंडळाची पालखी हि सर्वात मोठी गणली जाते.
मुंबादेवी तरुण मित्र मंडळाच्या वतीने कोरोना साथीच्या नंतर सालाबादा प्रमाणे दर वर्षी रामनवमीचा कार्यक्रम संपन्न होत असतो.त्या निमित्ताने दरवर्षी सर्वात मोठा पालखी सोहळा शिर्डी साठी प्रस्थान करत असतो.तत्पूर्वी,’ देवी भागवत’ सात दिवस मोठ्या उत्साहात संपन्न झाले असून त्यासाठी पुरुष भाविकांसह महिला वर्गाने मोठी हजेरी लावली आहे.यावर्षी पालखी सोहळा आज गुरुवार दि.३० मार्च रोजी दुपारी ०४.३० वाजता सोहळा संपन्न झाला आहे.त्यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते.संजीवनी सहकारी कारखाण्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.त्यावेळी आधी मुंबादेवी मंदिरापासून या पालखीचे प्रस्थान झाले आहे.त्यावेळी भाविकांत हि मानाची पालखी सेवा घेण्यास चढाओढ आढळून आली आहे.
दरम्यान या पालखी मार्गावर अंबिका तरुण मंडळ,हिंदुवाडा तरुण मंडळ,जनार्दन स्वामी आश्रम,रवीन्द्र आढाव व राहुल आढाव आदींनी पाच मशीन द्वारे भाविकांना उसाचा रस उपलब्ध करून दिला आहे.कहार समाज मित्र मंडळ,पटेल आणि कंपनी,साई बालाजी ट्रस्ट यासह अनेक सेवाभावी संस्था आणि समता सहकारी पतसंस्था,लायन्स क्लब विविध मंडळे आदींनी या भक्तांसाठी पाण्याची,थंड पेयांची व्यवस्था केलेली आढळून आली आहे.तर कचरा व्यवस्थापणासाठी ज्योती सहकारी पतसंस्था पोहेगाव नागरी सहकारी पतसंस्था आदींनी जबाबदारी स्वीकारली असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.आणि कार्यकर्त्यानी जागोजागी खोक्यांची व्यवस्था केली होती.सदर व्यवस्थापणासाठी कोपरगाव शहर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.