जाहिरात-9423439946
शैक्षणिक

महर्षी स्कुलचे विद्यार्थी कोपरगाव तालुक्यात प्रथम

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

नवी दिल्ली येथील केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचे बोर्डाचे निकाल नुकताच जाहीर झाला असुन कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण येथील संत जनार्दन स्वामी महाराज महर्षी स्कुलने शंभर टक्के निकालाची परंपरा कायम ठेवली आहे. या वर्षी महर्षी स्कुलची चौदाव्या बॅचचे सर्वाधिक ८४ विद्यार्थ्यांनी परिक्षा दिली होती.ते सर्व शंभर टक्के निकालासह उत्तीर्ण झाले आहेत.त्यांच्या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

प्रथम येणा-या विद्यार्थीनीने ५०० पैकी ४८५ गुण (९७ %) मिळवले व तालुक्यात प्रथम येणाचा मान मिळविला आहे.इयत्ता दहावीची १४ वी बॅच असुन इ.१२ वी ची ९ वी बॅचच्या विद्यार्थ्यांनी लक्षवेधी यश संपादंन केले आहे. विद्यार्थ्यांचे परिश्रम व शिक्षकांचे बहुमोल मार्गदर्शन यामुळे शहरी व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनीं नेत्रदिपक यश मिळविले आहे.गेल्या २२ वर्षापासुन गुणवंत विद्यार्थी घडविणे हेच विद्यालयाचे ध्येय असल्याचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मोहनराव चव्हाण यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले आहे.

विद्यालयाची गुणवत्ता यादी मध्ये इ.दहावी ची सलग चौदावी बॅच असुन तालुक्यात प्रथम क्रमांक मिळविणारी विद्यार्थी कु.धनश्री राजेंद्र बेलदार – ९७%,द्वितीय क्रमांक-अनुजा सुनिल आभाळे-९५.४०%,तृतीय क्रमांक-श्रेया अजय लोढें – ९५.२० %,चतुर्थ क्रमांक-अथर्व महेश काळे-९५.२० %,पाचवा क्रमांक-क्षितीज दत्तात्रय कानडे-९४%,इ.१२ वी सायन्सची १२ वी बॅच असुन यामध्ये प्रथम क्रमांक – ऋत्वीक दिनेष कोल्हे-८१%,द्वितीय क्रमांक-तेजश्री शामराव गुरसळ-८०%,तृतीय क्रमांक -देवेद्रं सुरेष जागींड-८० %,तसेच १२ वी काॅमर्स मध्ये प्रथम क्रमांक-सिध्दांत रविद्रं भनगे-७८%,द्वितीय क्रमांक-रूची महेश प्रेमानी-७५%,तृतीय क्रमांक – दिया राजेश गिगना-७३.४ % ,यासह याही वर्षी इ.१० वी मध्ये ५ विद्यार्थी ९५ % च्या पुढे,१३ विद्यार्थी-९०% च्यापुढे तर ३९ विद्यार्थ्यांनी ८५% च्या पुढे गुण मिळविले आहे.

तसेच इ.१०वी ची धनश्री बेलदार हिने गणित विषयात १०० पैकी १०० गुण मिळविले आहे.तर इ.१२ वी मध्ये देवेन्द्र जांगीड याने शरीरशास्त्र या विषयात १०० पैकी १०० गुण मिळविले आहे.तसेच संस्कृत,सामाजिक शास्त्र,इंग्रजी या विषयांमध्ये १०० पैकी ९९ गुण मिळविले आहेत.अशी माहिती विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र पानसरे यांनी दिली आहे.

या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष मोहनराव चव्हाण,रमेशगिरी महाराज,सर्व विश्वस्त यांनी अभिनंदन केले आहे. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना प्राचार्य राजेंद्र पानसरे,पर्यवेक्षिका सौ.जे.के.दरेकर,जयप्रकाश पाण्डेय,मेघराज काकडे,स्वप्निल पाटील,बाळासाहेब बढे,डाॅ. रविन्द्र कोहकडे,राहुल काशिद,शिवप्रसाद घोडके,कैलास कुलकर्णी,अनिता वरकड,निकीता गुजराथी आदी शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close