गुन्हे विषयक
पाण्यात बुडून आणखी एका तरुणाचा मृत्यू,कोपरगाव शहरातील घटना

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरातील उपनगर असलेल्या सुभाषनगर येथील रहिवासी असलेला तरुण ऋषिकेश लक्ष्मण त्रिभुवन (वय-१८) याचा मृतदेह आज दुपारी १.३० वाजे पूर्वी गोदावरी नदीचे छोट्या पुलाजवळ असलेल्या नदीपात्रातील पाण्यात आढळून आला आहे.या प्रकरणी कोपरगाव शहर पोलिसांनी आपल्या दप्तरी अकस्मात मृत्यूची नोंद दाखल केली आहे.त्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
मयत तरुणाचे छायाचित्र.
आपल्या वडिलांना मी,”रोडवर फिरून येतो” असे सांगून घराबाहेर गेला होता.मात्र तो उशीर होऊनही परत आला नाही.त्याचा नातेवाईक आणि मित्रमंडळी यांचेकडे शोध घेऊनही तो मिळून आला नव्हता.त्यामुळे घरच्या नातेवाईकांनी याबाबत कोपरगाव शहर पोलिसांना खबर दिली होती.मात्र उशिराने त्याचा मृतदेह आज दुपारी १.३० वाजे पूर्वी गोदावरी नदीचे छोटे पुलाजवळ आढळून आला आहे.त्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
यंदा पावसाळा भरपूर झाल्याने गोदावरी नदीस मोठ्या प्रमाणावर पाणी वाहून गेले होते.तर ऑक्टोबरच्या शेवटी जलसंपदा विभागाने कोल्हापुर पद्धतीच्या बंधाऱ्यांवर फळ्या टाकल्याने नेहमीप्रमाणे पाणी अडवले गेले होते.मात्र पावसाची टंचाई नसल्याने मार्च महिना मध्यावर आला असतानाही अद्याप नदी पात्रात पाणी बऱ्यापैकी टिकून आहे.गोदावरी नदीच्या छोटया पुलाजवळही अद्याप बरेच पाणी नदीपात्रात दिसत आहे.या पुलाजवळ पूर असताना बऱ्यापैकी आत्महत्या होताना दिसत आहे.त्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून खरे तर उंच सरंक्षण जाळ्या उभारणे गरजेचे आहे.मात्र अनेक आत्महत्या होऊनही त्यावर कार्यवाही होताना दिसत नाही.त्यामुळे या आत्महत्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे.अशीच एक आत्महत्या नुकतीच घडली असल्याचा संशय व्यक्त होत आहे.त्यात सुभाषनगर येथील तरुण ऋषिकेश लक्ष्मण त्रिभुवन याचा समावेश आहे.मग हि आत्महत्या आहे की आणखी काही हे पोलीस तपासात उघड होणार आहे.
दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार सदर तरुण हा आपले वडील लक्ष्मण त्रिभुवन यांना मी,”रोडवर फिरून येतो” असे सांगून घराबाहेर गेला होता.मात्र तो उशीर होऊनही परत आला नाही.त्याचा नातेवाईक आणि मित्रमंडळी यांचेकडे शोध घेऊनही तो मिळून आला नव्हता.त्यामुळे घरच्या नातेवाईकांनी याबाबत कोपरगाव शहर पोलिसांना खबर दिली होती.मात्र उशिराने त्याचा मृतदेह आज दुपारी १.३० वाजे पूर्वी गोदावरी नदीचे छोटे पुलाजवळ आढळून आला आहे.त्याबाबत त्याचे वडील लक्षण त्रिभुवन यांनी कोपरगाव शहर पोलिसांना या प्रकरणी खबर दिली आहे.घटनास्थळी पोलिस निरीक्षक रामराव ढिकले यांनी भेट दिली आहे.
कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात पोलिसांनी आपल्या दप्तरी अकस्मात मृत्यू नोंद क्रं.१७/२०२३ सी.आर.पी.सी.कलम-१७४ अन्वये नुकतीच नोंद दाखल केली आहे.पुढील तपास पोलिस निरीक्षक रामराव ढिकले यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस ना.बी.एम.कोरेकर हे करीत आहेत.