जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

महिलेचा मारहाण करत विनयभंग,कोपरगावात गुन्हा दाखल

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील करंजी ग्रामपंचायत हद्दीत रहिवासी व फिर्यादी असलेली महिला व तिचा पती हे काल सायंकाळी ०७ वाजेच्या सुमारास शेतातून आपल्या घरी जात असताना रस्त्यात अडवून त्याच गावातील एका घरातील चार आरोपीनीं त्यांना शिवीगाळ करून मारहाण करून फिर्यादी महिलेचा विनयभंग केला असल्याचा गुन्हा कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाल्याने करंजी परिसरात खळबळ उडाली आहे.

दि.०१ जानेवारी रोजी सायंकाळी ०७ वाजेच्या सुमारास फिर्यादी महिला व तिचे पती हे आपल्या दुचाकीवर घरी येत असताना त्यांना गायकवाड वस्तीजवळ एकाच घरातील आरोपी एक ते चार यांनी अडवून शिवीगाळ करून सदर महिलेस व तिच्या पतीस मारहाण करून सदर महिलेचा विनयभंग केला आहे.या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

सदरची सविस्तर वृत्त असे की,फिर्यादी महिला व तिचे पती हे करंजी येथिल रहिवासी आहेत.त्यांचे मागील भांडणाचे कारण समजू शकले नाही तथापि काल दि.०१ जानेवारी रोजी सायंकाळी ०७ वाजेच्या सुमारास फिर्यादी महिला व तिचे पती हे आपल्या दुचाकीवर घरी येत असताना त्यांना गायकवाड वस्तीजवळ एकाच घरातील आरोपी एक ते चार यांनी अडवून शिवीगाळ करून सदर महिलेस व तिच्या पतीस मारहाण करून सदर महिलेचा विनयभंग केला आहे.

या प्रकरणी फिर्यादी महिलेने कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात धाव घेऊन गुन्हा दाखल केला आहे.घटनास्थळी पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव यांनी भेट दिली आहे.

दरम्यान या गुन्ह्या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलिसांनी आपल्या दप्तरी आरोपी विरुद्ध गुन्हा नोंद क्रं.०६/२०२३ भा.वि.कलम ३५४,३५४(ब) ३४१,३२४,३२३,५०४,५०६,३४ अन्वये नोंद केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक चंद्रकांत काळे हे करीत असल्याचे वृत्त आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close