जाहिरात-9423439946
आंदोलन

कोपरगावात शहरात…या कामासाठी उद्या आंदोलन होणार

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव नगरपरिषदेचे पाच क्रमांकाच्या तलावाचे काम तात्काळ चालू करणेसाठी मुख्याधिकारी दालना समोर आज सकाळी अकरा वाजेच्या सुमारास सत्याग्रह करण्यात आला असून सदर काम उद्या दि.०३ जानेवारी रोजी चालू करणार असल्याची माहिती अधिकार कार्यकर्ते संजय काळे यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.

“आपण समृध्दीच्या ठेकेदाराला फुकट दगड घेऊन जाण्यासाठी व तलाव क्रमांक ५ खोदून देण्यासाठी तयार केले होते.पण निविदा मंजूर झाली व तलावासाठी ५४ कोटी मंजूर झाले.ठेकेदाराने काम सुरू केले आणि ३० जून रोजी राज्यात सरकार बदलले आहे.आता १७ नोव्हेंबर २०२२ पासून तलावाचे खोदकाम ठेकेदाराने बंद केले आहे.आपण त्यांना याबाबत विचारले असता ठेकेदार गुजरातचा असल्याने व त्या राज्याच्या निवडणूका चालू असल्यामुळे काम बंद केले असल्याचे तकलादू कारण दिले होते मात्र आंदोलनानंतर सदर काम सुरु करण्याचे आश्वासन दिले आहेसंजय काळे,सामाजिक कार्यकर्ते,कोपरगाव.

कोपरगाव शहर पाणी योजनेसाठी महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियान अंतर्गत १३१.२४ कोटी रुपयांचा निधी आ.आशुतोष काळे यांनी महाआघाडी सरकारच्या माध्यमातून उपलब्ध करून दिला होता.त्याची निविदा नुकतीच जुलै महिन्यात जाहीर झाली होती.सदरचे काम गुजरात मधील सुरत येथील ‘लक्ष्मी कन्ट्रक्शन’ या कंपनीस दिले असून सदर काम चाचणी कालावधीसह दोन वर्षात दि.३० जून २०२४ पूर्वी पूर्ण करावयाचे नियोजन आहे.त्या विजबिलाचा ताण कमी करण्यासाठी सौर उर्जा वापर प्रस्तावित आहे.

कोपरगाव शहरासाठी यापूर्वी चार साठवण तलाव असताना व जलसंपदा विभागाकडून पुरेसे पाणी मंजूर असतानाही शहराला पाणी कमी आहे असा जावई शोध लावून त्यावर आपल्या राजकीय फायद्यासाठी बनाव उभा करणाऱ्या व ४२ कोटींच्या केंद्रीय पाणी योजनेची वासलात लावणाऱ्या व कारण नसताना निळवंडे धरणाच्या जलवाहिणीचे गाजर दाखविणाऱ्या नेत्यांना चाप लावण्यासाठी आ.आशुतोष काळे यांनी शहरासाठी नवीन पाणी ३.३२ द.ल.घ.मी.मंजुर केले होते.या शिवाय साठवण तलावाची उणीव दूर करण्यासाठी कोपरगाव शहरासाठी महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियान अंतर्गत १३१.२४ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला होता.त्याची निविदा नुकतीच जाहीर झाली होती.व सदरचे काम गुजरात मधील सुरत येथील ‘लक्ष्मी कन्ट्रक्शन’ या कंपनीस दिले होते.सदर काम चाचणी कालावधीसह दोन वर्षात दि.३० जून २०२४ पूर्वी पूर्ण करावयाचे आहे.मात्र सुमारे दोन महिन्यापूर्वी काम बंद पडले असून त्या मागे कोण आहे ? असा सवाल निर्माण झाला आहे.त्याची गंभीर दखल कोपरगाव येथील सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी घेतली होती.त्यांनी या साठी आंदोलनाचा इशारा दिला होता.

त्यांनी पालिकेला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे होते की,”कोपरगाव नगरपरिषदेच्या येसगाव येथील साठवण तलावाचे काम चालू व्हावे यासाठी आपण समृध्दीच्या ठेकेदाराकडे पाठपूरावा केला.मात्र ते काम श्रेयवादात अडकले होते.अखेर हो-ना करत ठेकेदार कंपनी माती उचलून घेऊन गेली.तलाव खोदाईत दगड लागला आणि संबधीत ठेकेदाराने काम थांबवले होते.त्या बाबत आपण त्यांना कारण विचारले असता ठेकेदार,”दगड नको” असल्याचे म्हणतात.तर ठेकेदाराने आपल्याला,”मातीत रस नाही दगड पाहिजे” असे म्हटल्याची आठवण करून दिली आहे.

“आपण समृध्दीच्या ठेकेदाराला फुकट दगड घेऊन जाण्यासाठी व तलाव क्रमांक ५ खोदून देण्यासाठी तयार केले होते.पण निविदा मंजूर झाली व तलावासाठी ५४ कोटी मंजूर झाले.ठेकेदाराने काम सुरू केले आणि ३० जून रोजी राज्यात सरकार बदलले आहे.आता १७ नोव्हेंबर २०२२ पासून तलावाचे खोदकाम ठेकेदाराने बंद केले आहे.आपण त्यांना याबाबत विचारले असता ठेकेदार गुजरातचा असल्याने व त्या राज्याच्या निवडणूका चालू असल्यामुळे काम बंद असल्याचे कारण दिले असल्याची आठवण त्यांनी करून दिली आहे.तथापि सदर निवडणूक संपून दहा दिवस झाले असताना अद्याप काम चालू झालेले नाही.कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न सुटण्यासाठी तलावाचे काम होऊ नये म्हणून अनेक जण त्यांचे शासनातील देव अगोदरच पाण्यात घालून बसले आहेत.त्यामुळे आपण तात्काळ काम चालू करण्यासाठी पालिकेसमोर सत्याग्रह केला आहे.पावसाळ्यापूर्वी काम सुरु होण्यासाठी प्रत्येक दिवस महत्वाचा असताना आपण एक महिना काम बंद ठेऊन शहर पाणी योजनेच्या आड येत असल्याचा आरोप केला आहे.

संबंधित नगरपरिषदेच्या पाणी पुरवठा व बांधकाम विभागाने तलावाचे काम तात्काळ चालू न केल्याने त्यांनी आज दि.२ जानेवारी २०२३ सोमवार रोजी सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत काळे यांनी मुख्याधिकारी यांचे दालना समोर पाण्याचा रिकामा हंडा डोक्यावर घेऊन उभे राहून आंदोलन केले आहे.दरम्यान मुख्याधिकारी यांनी आज त्यांना आपण उद्या दि.०३जानेवारी रोजी काम सुरु करणार असल्याचे आश्वासन दिले असल्याची माहिती शेवटी संजय काळे यांनी दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close