जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

चोरट्यांचा धुमाकूळ,दोन चोऱ्या,कोपरगावात दोन अटकेत

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहर आणि तालुक्यात पुन्हा एकदा चोरट्यानी डोके वर काढले असून कोपरगाव शहरातील राज्य परिवहन विभागाच्या कोपरगाव बस आगारात नुकताच एका तरुणाच्या ३५ हजार रुपयांच्या सोन साखळीवर चोरट्याने डल्ला मारला असून या प्रकरणी फिर्यादी शहरातील किराणा दुकानदार शुभम संजय धाडीवाल (वय-२६) यांनी अज्ञातच चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.तर दुसऱ्या कान्हेगाव येथील गुन्ह्यात दोन चोरट्यांना ग्रामस्थांनी पाठलाग करून रंगेहात पकडले आहे.त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.

दरम्यान दुसऱ्या घटनेत भोजडेच चौकी ते वारी मार्गावर कान्हेगाव हद्दीत पत्रकार जनार्दन जगताप यांचे वस्तीच्या दक्षिणेस दि.१७ सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास शेतजमुर असलेली महिला हि शेतकरी व कान्हेगावचे माजी सरपंच राजेंद्र सांगळे यांच्या शेतातून घरी येत असताना तिच्यावर पाळत ठेवून दुचाकीवर आलेल्या दोघा भामट्यांनी तिच्या गळ्यातील मणी मंगळसूत्र ओरबाडून पोबारा केला होता.त्यांना पकडण्यात ग्रामस्थांना यश आले आहे.ते सराईत गुन्हेगार असल्याचे उघड झाले आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,”कोपरगाव शहरात काही दिवसापूर्वी चोरट्यानी आपली वक्रदुष्टी दुचाकी व चार चाकी वहाने यांच्यावर पडली होती.त्यामुळे वाहनचालक हैराण झाले होते.त्यास काही अंशी कमी आली असताना आता चोरट्यांनी आपले लक्ष दागिने ओरबडण्यावर केंद्रित केले आहे.त्यामुळे नागरिक व महिला यांच्यात दहशत निर्माण झाली आहे.अशीच घटना कोपरगाव शहरात नुकतीच घडली आहे.राज्य परिवहन विभागाच्या कोपरगाव आगारात गर्दीचा फायदा घेत दि.२० डिसेंबर रोजी रात्री ०८.४० वाजेच्या सुमारास फिर्यादी हे तेथे गेले असता तेथे अज्ञातच चोरट्यांचे लक्ष त्यांच्या गळ्यात असलेल्या सोनसाखळीवर गेले होते.त्यांनी पळत ठेवून तेथील गर्दीचा गैरफायदा घेत त्यांच्या गळ्यातील एक तोळा वजनाची सुमारे ३५ हजार रुपये किमतीची सोन्याची साखळी लांबवली आहे.हि बाब त्यांच्या लक्षत आल्यावर त्यांनी त्वरित कोपरगाव शहर पोलीस ठाणे येथे धाव घेऊन फिर्याद दाखल केली आहे.

सदर घटनास्थळी पोलीस ठाण्याचे प्रमुख वासुदेव देसले व यांनी घटनास्थळी धाव घेतली होती.मात्र तोपर्यंत चोरट्यांनी पोबारा केला होता.
दरम्यान दुसऱ्या घटनेत वारी नजीक असललेल्या कान्हेगाव हद्दीत समृद्धी महामार्गालगत भोजडेच चौकी ते वारी मार्गावर कान्हेगाव हद्दीत पत्रकार जनार्दन जगताप यांचे वस्तीच्या दक्षिणेस दि.१७ सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास शेतजमुर असलेली महिला हि शेतकरी व कान्हेगावचे माजी सरपंच राजेंद्र सांगळे यांच्या शेतातून घरी येत असताना तिच्यावर पाळत ठेवून दुचाकीवर आलेल्या दोघा भामट्यांनी तिच्या गळ्यातील मणी मंगळसूत्र ओरबाडून पोबारा केला होता.दरम्यान आरडा-ओरडा झाल्याने हि बाब समोरुन त्याच रस्त्याने येणाऱ्या नजीकच्या कार चालकाच्या लक्षात आली असता त्यांनी आपली कार आडवी घालून त्यांना पाळण्यास अडथळा केला.तरीही त्यांनी आपली दुचाकी काट्याकुट्यातून घालून भोजडे चौकीच्या दिशेने दामटली असता सदर खबर माजी सरपंच सांगळे याना कळवली त्यांनी भोजडे चौकीवर फोन करून तेथील नागरिकांना सावध केले त्यांनी त्या चोरट्यांना अडविण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी त्यांना गुंगारा दिला होता.मात्र रेल्वे मार्गाच्या भुयारी मार्गातून समोरून अवजड ट्रक आल्याने त्या बोळात ते गाठले होते.अखेर मागावून पाठलाग करत येणाऱ्या नागरिकांनी त्यांना पकडले होते.त्यांना नजीकच्या ग्रामस्थांनी साथ दिली त्यामुळे हे शक्य झाले आहे.त्यांना ग्रामस्थांनी हिसका दाखवला असता त्यांनी या चोरीची कबुली दिली आहे. व सदर रस्त्याचे कडेला झाडाझुडपात फेकुन दिलेले सोन्याचे मंगळसूत्र काढून दिले आहे.त्याबाबतची खबर ग्रामस्थांनी तालुका पोलिसांना कळवून चोरट्यांना पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे.त्यातील राहाता तालुक्यातील पुणतांबा येथील सराईत यश बाळासाहेब लांडगे (वय-२२) तर दुसरा आरोपी ऋषिकेश कमलेश नाईक (वय-२३) या दोघांना अटक केली आहे.त्यांना कोपरगाव येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी बनसोडे मॅडम यांचे समोर हजर केले असता त्यांनी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.वर्तमानात ते न्यायिक कोठडीत आहेत.यातील पहिल्या आरोपीवर या आधीच श्रीरामपूर येथील अवैध हत्यार बाळगल्या प्रकरणी गुन्हा दाखल असून त्यांच्यावर अजून काही गुन्हे दाखल असल्याचीम माहिती आहे.त्यातील काही गुन्ह्यासाठी शिर्डी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे.

दरम्यान पहिल्या गुन्ह्या प्रकरणी कोपरगाव शहर पोलिसांनी आपल्या दप्तरी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा क्रं.४५२/२०२२भा.द.वि.कलम ३७९ अन्वये दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक देसले यांचे मार्गदर्शनाखाली पो.ना.ए.एम.दारकुंडे हे तर दुसऱ्या गुन्ह्यात (क्रं.५१०/२०२२ भा.द.वि.कलम ३९३,३४ प्रमाणे) तपास पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close