जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

कोपरगाव तालुक्यात आणखी एक चोरी उघड,गुन्हा दाखल

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्याच्या वायव्येस सुमारे पंधरा कि.मी.अंतरावर असलेल्या रवंदे ग्रामपंचायत हद्दीत रहिवासी असलेल्या अनंत मारुती कदम (वय-४२) यांच्या घरात दि.३० ऑगष्ट रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास भावजय व आई या दोघी झोपलेल्या असताना अज्ञातच चोरट्यानीं घरात प्रवेश करून उशाला ठेवलेले काळ्या मण्यात ओवलेले ३० सोन्याचे मणी व दोन पळ्याचे २ मणी मंगळसूत्र असा जवळपास ३० हजारांचा अवैज अज्ञात चोरट्यानी चोरून नेल्याने रवंदेसह कोपरगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.

रवंदे हद्दीत फिर्यादीची भावजय व आई हे दि.३० ऑगष्ट रोजी रात्री १० ते एकच्या सुमारास झोपल्या असताना भावजयीने आपले मनिमंगळसूत्र व अन्य दागिने आपल्या उशाला काढून नैसर्गिक विधीसाठी फिर्यादीची आई रात्री नैसर्गिक विधीसाठी दरवाजा उघडा ठेवल्याची संधी साधून अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश मिळवून उशाला ठेवलेले काळ्या मण्यात ओवलेले ३० सोन्याचे मणी व दोन पळ्याचे २ मणी मंगळसूत्र असा जवळपास ३० हजारांचा अवैज अज्ञात चोरट्यानी चोरून नेले आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,”कोपरगाव तालुक्यातील रांजणगाव देशमुख येथील अंजनापूर रस्त्यावर काथे वस्ती येथे दि.३० ऑगष्ट रोजी मध्यरात्री १२ ते आज पहाटे ५ वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी घराच्या मागील बाजूने असलेल्या स्वयंपाक गृहाचे कुलूप तोडून त्यातील त्यात झोपलेल्या इसमाच्या तोंडावर काही अज्ञात रसायन फवारून घरातील लोखंडी पेटी उचलून नेऊन नजीकच्या उसाच्या शेतात ती उचकटून त्या चोरीत २ तोळे सोन्याचे गंठण,सोन्याचे झुबे,८ हजार रुपये रोख,व एक ओपो कंपनीचा भ्रमणध्वनी असा जवळपास ८० हजारांचा अवैज अज्ञात चोरट्यानी चोरून नेल्याचा गुन्हा शिर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दाखल झाला असताना व त्याच्या बातमीची शाई अद्याप वाळलेली नसताना रवंदे हद्दीतही अशीच घटना त्याच रात्री घडल्याचे उघड झाली आहे.यापूर्वी आपेगाव हद्दीत पतीपत्नीचा चोरट्यानीं चोरीसाठीं हत्या केल्याचे मे महिन्यात उघड झाले होते.त्यामुळे उत्तर नगर जिल्ह्यात चोरट्यांना पोलिसांचा धाक राहिला नसल्याचे उघड झाले आहे.

रवंदे हद्दीत फिर्यादीची भावजय व आई हे दि.३० ऑगष्ट रोजी रात्री १० ते एकच्या सुमारास झोपल्या असताना भावजयीने आपले मनिमंगळसूत्र व अन्य दागिने आपल्या उशाला काढून ठेवले होते.मात्र नैसर्गिक विधीसाठी फिर्यादीची आई रात्री नैसर्गिक विधीसाठी उठली असताना तिने दरवाजा उघडा ठेवल्याची संधी साधून अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश मिळवून उशाला ठेवलेले काळ्या मण्यात ओवलेले ३० सोन्याचे मणी व दोन पळ्याचे २ मणी मंगळसूत्र असा जवळपास ३० हजारांचा अवैज अज्ञात चोरट्यानी चोरून नेल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे.त्यामुळे रवंदेसह कोपरगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.
दरम्यान घटनास्थळी कोपरगाव तालुका पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुरेश आव्हाड व पोलीस हे.कॉ.सुरेश बोटे यांनी भेट दिली आहे.

कोपरगाव तालुका पोलिस ठाण्यात या प्रकरणी गु.र.क्रं.३३९/२०२२ भा.द.वि.कलम ३८० प्रमाणे अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांचे मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.बोटे हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close