जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

कोपरगावात पुन्हा एकास गंभीर मारहाण,तिघांविरुद्ध ऍट्रॉसिटीचा गुन्हा

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(नानासाहेब जवरे)

कोपरगाव तालुक्यात मंजूर ग्रामपंचायत हद्दीत ऍट्रॉसिटीचा एक गुन्हा दाखल होऊन त्यात एक जण ठार झाला असल्याचे प्रकरण ताजे असताना तीळवणी या ठिकाणी पुन्हा एक घटना समोर आली असून यात एका आदिवासी समाजाच्या तरुणास जातीचा उल्लेख करून आरोपी पप्पू भास्कर गव्हाळे याचे सह तिघांनी मारहाण केल्याची दुसरी घटना समोर आल्याने कोपरगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.

फिर्यादी भाऊसाहेब गायकवाड हा दि.२७ ऑगष्ट रोजी रात्रीच्या सुमारास आपले काम आटोपून आपल्या घरी जात असताना त्याच्या घराजवळ यातील आरोपी पप्पू गव्हाळे,गणेश भुजाडे,वाल्मिक निकम हे दारू पिऊन एकमेकांना शिवीगाळ करून आरडाओरडा करत असताना आढळून आले होते.तेव्हा फिर्यादी भाऊसाहेब गायकवाड हा त्यांना म्हणाला की,”तुम्ही येथे आरडाओरडा करू नका,”तुम्ही तुमच्या घरी जा” असे म्हणाल्याचा आरोपींना राग येऊन त्यांनी फिर्यादीची जात माहीत असताना देखील फिर्यादीस शिवीगाळ करून लाथाबुक्यांनी मारहाण केली आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,”मंजूर तालुक्यात जमिनीच्या वादातून दोन गटात हाणामारी होऊन त्यात एक आदिवासी समाजाच्या तरुणास शिर्डी-लासलगाव रस्त्यावर हंडेवाडी बेदम मारहाण झाली होती.त्या घटनेत फिर्यादी हा शिर्डी आणि त्या नंतर नाशिक येथे उपचारार्थ दाखल असताना त्याचे मागील सप्ताहात निधन झाले होते.त्यावरून सहा जणांविरुद्ध गुन्हा दखल झाला होता.त्यातील चार जण अटकेत असताना व दोन जण फरार असतांना पुन्हा एकदा कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत तीळवणी हद्दीत दुसरी घटना उघड झाली आहे.

त्याबाबत सविस्तर वृत्त असे की,”कोपरगाव तालुक्यातील तीळवणी हद्दीतील फिर्यादी भाऊसाहेब दगु गायकवाड हा दि.२७ ऑगष्ट रोजी रात्री १०.३० वाजेच्या सुमारास आपले काम आटोपून आपल्या घरी जात असताना त्याच्या घराजवळ यातील आरोपी पप्पू भास्कर गव्हाळे,गणेश जयवंत भुजाडे दोघे रा.आपेगाव ता.कोपरगाव व तिसरा आरोपी वाल्मिक भाऊसाहेब निकम रा.उक्कडगाव हे दारू पिऊन एकमेकांना शिवीगाळ करून आरडाओरडा करत असताना आढळून आले होते.तेव्हा फिर्यादी भाऊसाहेब गायकवाड हा त्यांना म्हणाला की,”तुम्ही येथे आरडाओरडा करू नका,”तुम्ही तुमच्या घरी जा” असे म्हणाला असता आरोपींना फिर्यादीची जात माहीत असताना देखील फिर्यादीस, म्हणाले की,”ए बिल्डर तू जास्त माजला का ? तुला चोप द्यायला लागेल” असे म्हणून शिवीगाळ दमदाटी करून लाथाबुक्यांनी मारहाण केली आहे.
दरम्यान फियादीची आई व पत्नी हे आवाज ऐकून घटनास्थळी आल्या असताना त्यांनाही वरील आरोपींनीं शिवीगाळ केली आहे. व जाताना म्हणाले की,”तुम्ही…(जातीचा उल्लेख करून) या गावात राहाता कसे ? तुमचे घरे पेटून देऊ” असे म्हणून सज्जड दम दिला आहे.

दरम्यान याबाबत कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दि.३१ ऑगष्ट रोजी रात्री १०.१९ वाजता गुन्हा दाखल झाला आहे.घटनास्थळी शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव व पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी भेट दिली असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.दरम्यान गावातील परिस्थिती तणावाची पण शांततेत असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.

या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलिसांनी आपल्या दप्तरी गुन्हा क्रं.-३४०/२०२२ भा.द.वि.कलम ३२३,५०४,५०६ सह अ.जा.जमाती अत्याचारास प्रतिबंध सुधारणा कायदा-२०१५ चे कलम ३(आय)(आर),३(आय)(एस) प्रमाणे आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास जिल्हा पोलीस अधीक्षक यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक संजय सातव हे करीत आहेत.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close