जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

विद्युत रोहित्रातील तांब्याच्या तारेची चोरी,कोपरगावात गुन्हा दाखल

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील दहिगाव बोलका ग्रामपंचायत हद्दीत पिण्याच्या पाण्याचा पाणी पुरवठा करणारे रोहित्रातील ऑइल सांडून त्यातील सुमारे ४० हजार रुपये किमतीची तांब्यांची तार अज्ञात चोरट्याने चोरून नेली असल्याची फिर्याद महावितरण कंपनीचे कनिष्ठ अभियंता अमोल छबू बोडके (वय-२९) रा.गवारेंनगर कोपरगाव यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दाखल केली असल्याने दहिगाव बोलका आणि परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

कोपरगाव तालुक्यात चोरट्यांचा धुमाकूळ सुरु असून दुचाकी वाहन चोरी,गंठण पळविणे आदी घटनात मोठी वाढ झालेली दिसून येत असून चोरट्याने पोलिसांचा धाक राहिलेला दिसत नाही.पोलिसांना हुलकावणी देऊन ते आपली संधी साधून पोलिसांना वाकुल्या दाखवून लीलया फरार होताना दिसत आहे.शहरात अशा घटनांना ऊत आला असून आता चोरट्यानी आपला मोर्चा ग्रामीण भागातही वळवला असल्याचे सिद्ध झाले आहे.अशीच घटना कोपरगाव तालुक्यातील दहिगाव बोलका ग्रामपंचायत हद्दीत घडली आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,”कोपरगाव तालुक्यात चोरट्यांचा धुमाकूळ सुरु असून दुचाकी वाहन चोरी,गंठण पळविणे आदी घटनात मोठी वाढ झालेली दिसून येत असून चोरट्याने पोलिसांचा धाक राहिलेला दिसत नाही.पोलिसांना हुलकावणी देऊन ते आपली संधी साधून पोलिसांना वाकुल्या दाखवून लीलया फरार होताना दिसत आहे.शहरात अशा घटनांना ऊत आला असून आता चोरट्यानी आपला मोर्चा ग्रामीण भागातही वळवला असल्याचे सिद्ध झाले आहे.अशीच घटना कोपरगाव तालुक्यातील दहिगाव बोलका ग्रामपंचायत हद्दीत दि.२२ ते २३ जुलै रोजी रात्रीच्या सुमारास घडली आहे.तेथे पाणी पुरवठा योजनेसाठी विद्युत पुरवठा करण्यासाठी महावितरण कंपनीने रोहित्र जोडून दिलेले आहे.त्यात महागडी तांब्यांची वायर वापरलेली असते.त्यावरच चोरट्यांची वक्र दृष्टी गेल्याचे उघड झाले आहे.त्या ठिकाणच्या २५ के.व्ही.ए.क्षमतेच्या रोहित्रातील (तिचा कोड-डी.टि.सी.५२०६१०८) ऑइल सांडून देऊन चोरट्यानी त्यातील चाळीस हजार रुपये किंमतीची तांब्यांची वायर रातोरात फरार केली आहे.

या प्रकरणी फिर्यादी कनिष्ठ अभियंता अमोल बोडके रा.गवारे नगर यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.घटनास्थळी पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव,पो.हे.कॉ.डी.आर.एम.म्हस्के यांनी भेट दिली आहे.

या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलिसांनी आपल्या दप्तरी अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा क्रं.२७९/२०२२ भारतीय विद्युत कायदा २००३ चे कलम १३६ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक जाधव यांचे मार्गदर्शनाखाली यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस हे.कॉ.म्हस्के हे करीत आहेत.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close