जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
विविध पक्ष आणि संघटना

जेऊर कुंभारीतील…या कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील जेऊर कुंभारी येथील कोल्हे गटाचे निष्ठावान कार्यकर्ते भानुदास वक्ते यांनी नामदार आशुतोष काळे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.

“आ.काळे यांनी अडीच वर्षात मतदार संघाचा विकासाच्या बाबतीत कायापालट करून जनसामान्यांच्या मनात आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. समर्थपणे कारखान्याची जबाबदारी सांभाळत असताना आदर्श कारभार करून सभासदांना न्याय देण्याचे काम त्यांनी केले आहे त्यामुळे त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याची माझ्यासारख्या अनेक कार्यकर्त्यांची इच्छा आहे”-भानुदास वक्ते,पक्षांतर करणारे कार्यकर्ते.

कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी बिनविरोध झाल्याबद्दल जेऊर कुंभारी येथील कार्यकर्त्यांनी आ.आशुतोष काळे यांचा नुकताच कारखाना कार्यस्थळावर सत्कार केला आहे.यावेळी त्यांच्या समवेत आलेल्या कोल्हे गटाचे कार्यकर्ते भानुदास वक्ते यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केली होती.त्यावेळी आ.काळे यांनी त्यांचा सत्कार केला आहे.

सदर प्रसंगी भानुदास वक्ते म्हणाले की,”आ.काळे यांनी अडीच वर्षात मतदार संघाचा विकासाच्या बाबतीत कायापालट करून जनसामान्यांच्या मनात आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. समर्थपणे कारखान्याची जबाबदारी सांभाळत असताना आदर्श कारभार करून सभासदांना न्याय देण्याचे काम त्यांनी केले आहे त्यामुळे त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याची माझ्यासारख्या अनेक कार्यकर्त्यांची इच्छा असल्याचे त्यांनी शेवटी सांगितले आहे.

सदर प्रसंगी गोदावरी खोरे केन ट्रान्सपोर्टचे कार्यकारी संचालक दिलीप शिंदे,रामनाथ आव्हाड,बाबाजी वक्ते,कल्याण गुरसळ,बापूसाहेब वक्ते,महेंद्र वक्ते,संजय चव्हाण,शिवाजी वक्ते,भाऊसाहेब वक्ते,गोरख चव्हाण,केशवराव आबनावे,तुषार गुरसळ,भानुदास वक्ते,किशोर वक्ते,भगीरथ पगारे आदी मान्यवर उपस्थित होते.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close