जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

दोन दिवसांत चार दुचाकींची चोरी,शिर्डी पोलिसांपुढे चोरट्यांचे आव्हान!

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

शिर्डी शहर आणि परिसरात गेल्या अनेक महिन्यांपासून दुचाकी चोरीला जाण्याचे प्रमाण धक्कादायक वाढले आहे टोळी जेरबंद करण्यात पोलिसांना अपयश येत असल्याने त्यांचे धाडस वाढत आहे.पोलिस मात्र या वाहन चोरांपुढे पुरते हतबल झाल्याचे दिसून येत असुन दोन दिवसांत चार दुचाकी वाहने चोरुन या टोळीने शिर्डी पोलिसांना आव्हान दिले आहे.त्यामुळे दुचाकीस्वारात चिंतेचे वातावरण पसरले आहे.

शिर्डीतच चोरी गेलेल्या या चार दुचाकी मधील एका गवंडी काम करणारा गरीब कुटुंबातील व्यक्तीला दवाखान्याच्या कामानिमित्त आल्यानंतर दुचाकी चोरीला गेल्याने पोलिस स्टेशन च्या आवारातच अक्षरशः रडू कोसळल्याने हे दृश्य पाहून उपस्थित ही हळहळले आहे.अशाच घटना वारंवार होत असून पोलीस बघ्याची भूमिका घेत असल्याबद्दल नागरिकांत व्यक्त होत आहे.

दुचाकी वाहनं ही वर्तमानात सामान्य नागरिकांची गरज बनली आहे.मात्र सध्या दळणवळणाचे प्रमुख माध्यम बनलेल्या या वाहनावर चोरट्यांची वक्रदृष्टी वळाली आहे.त्यामुळे दुचाकीस्वार धास्तावून गेले आहे.अशाच घटना शिर्डीत वारंवार होत असून दुचाकी चोरीचा प्रश्न गंभीर बनला आहे.चोरटे हातोहात त्या लांबवित असून पोलिसांना वाकुल्या दाखवीत आहे.प्रतिदिन शिर्डी शहरातील भागातून रोज एक दुचाकी. चोरीला जाणे हा नित्यक्रम बनला आहे. दोन दिवसांत चक्क चार दुचाकी चोरीला गेल्याची घटना घडल्याने शिर्डी परिसरात खळबळ उडाली आहे.

या चार दुचाकी मधील एका गवंडी काम करणारा गरीब कुटुंबातील व्यक्तीला दवाखान्याच्या कामानिमित्त आल्यानंतर दुचाकी चोरीला गेल्याने पोलिस स्टेशन च्या आवारातच अक्षरशः रडू कोसळल्याने हे दृश्य पाहून उपस्थित ही हळहळले आहे.
अन्य दोन घटनांमध्ये सतीश गायके यांची काळ्या रंगाची पल्सर क्रमांक एम.एच.१७ ए.आर.४००७ हि नगरपंचायत शेजारील पार्किंग मधून चोरीला गेली तर ११ नंबर चारी येथील कातोरे वस्तीवरून सुनील विश्वनाथ होन यांच्या एक प्लॅटिना आणि एक सी.डी.डीलॅक्स मोटारसायकल चोरीला गेल्याची तक्रार अर्ज दाखल केला आहे.

सर्वजण पोलिस स्टेशनला उपस्थित होते.यावेळी सतीश गायके यांनी संस्थान आणि नगरपंचायत यांनी लक्ष देत साई नगर ची पार्किंग भाडे तत्वावर द्यावी आणि तिथे सीसीटीव्ही कॅमेरे बसवत भाविकांची आणि नागरिकांची वाहने सुरक्षित कशी राहतील याची काळजी घ्यावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

रोजच्या दुचाकी चोरीच्या घटनांमुळे मात्र पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी साईबाबांच्या पावनभूमीकडे लक्ष देण्याची गरज असल्याची भावना जनतेमधून व्यक्त होत आहे. शिर्डी शहरात दोनतीन वर्षात सहसा शिर्डी पोलिसांना टोळी जेरबंद करण्यात यश आले नाही तत्कालीन उपविभागीय अधिकारी सोमनाथ वाकचौरे यांनी देखील जाताना आपण दुचाकी टोळी पकडण्यात यश आले नाही अशी खंत व्यक्त केली होती ती खंत उपविभागीय अधिकारी संजय सातव पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील पुर्ण करतील का ? हा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close