जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

कोपरगाव तालुक्यातील ‘त्या’ ग्रामसेवकास अटक !

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील धोंडेवाडी ग्रामपंचायत मध्ये काम करणारे ग्रामसेवक शिवाजी भाऊसाहेब मगर,सरपंच रेणुका दत्तू दरेकर व ठेकेदार बाबासाहेब रामभाऊ शिंदे या तिघांनी संगनमताने २०२० ते २०२२ या काळात कुठल्याही प्रकारचे गावात विकासाचे काम न करता धनादेशाद्वारे २५ लाख ९५ हजार ९५० रुपयाचा गैरव्यवहार केल्याप्रकरणी आज संबंधित ग्रामसेवकास आज अटक केली असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

या प्रकरणी फरार असलेला आरोपी शिवाजी मगर शिर्डी पोलिसांना सदर इसम हातावर तुरी देऊन फरार झाला होता.शोध घेऊनही त्याचा तपास लागत नव्हता मात्र आज मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले असून पुढील कार्यवाही सुरु झाली असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.या प्रकरणी आमच्या प्रतिनिधीने पोलीस ठाण्याच्या सूत्रांशी केलेल्या चर्चेत हि जबाब उघड झाली असली तरी या प्रकरणी पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी यास नकार दिला आहे.मात्र आज अटक झाल्याचे सांगितल्यावर त्यांनी अजून माझ्यासमोर हि बाब आली नसल्याचे सांगितले आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,”धोंडेवाडी ग्रामपंचायतीमध्ये शिवाजी भाऊसाहेब मगर हे मूळ संवत्सर येथील रहिवासी असलेले इसम ग्रामसेवक म्हणून कार्यरत होते.सदर इसम हे सतत आपल्या कामावर गैरहजर असल्याने नागरिकांच्या तक्रारी आल्या होत्या.आलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने त्या ठिकाणी भेट देऊन विस्तार अधिकारी वाघमोडे यांनी त्यास नोटीस बजावली होती.त्यास नोटीस बजावूनही त्याने आपल्या ग्रामपंचायतीचे दप्तर पंचायत समितीत जमा केले नव्हते.दि.६ मे २०२२ रोजी नवीन ग्रामसेवकांना पदभार द्यावा असा आदेश बाजवले होते.तरीही संबंधित मुजोर ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकाने आपला पदभार नवीन ग्रामसेवकाकडॆ सोपवला नव्हता.

दरम्यान सदर ठिकाणी कोपरगाव पंचायतीचे गटविकास अधिकारी यांनी पंच समक्ष तपासणी केली असता १४ व्या वित्त आयोगातून असलेल्या बँक खात्यातून १४ आक्टोंबर २०२१ ते ०४ फेब्रुवारी २०२२ या कालखंडात १५ लाख ३५ हजार ७५० इतका खर्च केला असल्याचे उघड झाले आहे.मात्र त्यासंबंधी कागदपत्रे वरिष्ठ कार्यालयाकडे दाखल केली नव्हती.म्हणून वरिष्ठ अधिकाऱ्यांना संशय वाढला होता.त्यामुळे त्यांनी या ठिकाणी आपले चौकशी पथक पाठवून कामकाजाचे परिक्षण असता हा आर्थिक गैरकारभार उघड केला होता.

यात संशयित ग्रामसेवकाने १५ वित्त खात्यातून १५ फेब्रुवारी ते ०६ एप्रिल २२ या काळात १० लाख ६० हजार २०० रुपये इतका खर्च केला होता.पण कोणत्या कामावर झाला हे निदर्शनास येत येत नव्हते.दरम्यान धोंडेवाडी ग्रामपंचायतीत कोणतेही काम केल्याचे आढळून आले नव्हते.
ग्रामसेवक शिवाजी मगर,सरपंच रेणुका दरेकर यांनी काम न करता जवळपास २५ लाख ९५ हजार ९५० इतकी मोठी रक्कम बँक खात्यातून बाबासाहेब शिंदे यांच्या नावाने वेळोवेळी धनादेशद्वारे काढली असल्याचे उघड झाले होते.

कोपरगाव पंचायत समितीचे गट विस्ताराधिकारी बबन भाऊराव वाघमोडे यांच्या फिर्यादीवरून शिर्डी पोलिसांनी धोंडेवाडी ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक शिवाजी भाऊसाहेब मगर रा.संवत्सर.कोपरगाव धोंडेवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंच रेणुका दरेकर व बाबासाहेब शिंदे रा.शिर्डी या तिघांच्या विरोधात गुन्हा नोंद क्रं.०२७२ /२०२२ भा.द.वि.कलम ३४,४०९,४२० अन्वये गुन्हा दाखल केला होता.

दरम्यान उशिराने मिळालेल्या माहितीनुसार सदरची चौकशी सुरू असल्याचे पोलिस सूत्रांनी दिली आहे.त्यांना अटक केलेली नाही.

या प्रकरणी शिर्डी पोलिसांना सदर इसम हातावर तुरी देऊन फरार झाला होता.शोध घेऊनही त्याचा तपास लागत नव्हता मात्र आज मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले असून पुढील कार्यवाही सुरु झाली असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.या प्रकरणी आमच्या प्रतिनिधीने पोलीस ठाण्याच्या सूत्रांशी केलेल्या चर्चेत हि जबाब उघड झाली आहे.त्यामुळे धोंडेवाडी येथील ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.मात्र आणखी दोन आरोपी सरपंच आणि संबधित ठेकेदार यांच्यावर काय कार्यवाही होणार या कडे नागरीकांचे लक्ष लागून आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close