जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

कोपरगाव शहरात तरुणाने मारली नदीत उडी,परिसरात खळबळ

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहरातील गोदावरी नदीवरील छोट्या पुलावरून एका तरुणाने उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे.त्यामुळे शहरात काळजीचे वातावरण पसरले आहे.सदरचा तरुण हा गांधी नगर येथील रहिवासी असल्याची माहिती काही नागरिकांनी दिली आहे.

या प्रकरणी काही तरुण सदर पुलावरून जात असताना एका तरुणाने नदीत पुलावरून उडी मारली असल्याचे पाहिले होते.आधी त्यांना वाटले की ‘तो’ पोहण्यासाठी गेला असावा असा अंदाज होता.मात्र बराच वेळ होऊनही तो बाहेर न आल्याने त्या प्रसाद शेलार या तरुणाने नदीत उडी मारून त्याला शोधण्याचा प्रयत्न करून पाहिला मात्र तो सापडला नाही अशी माहिती प्रत्यक्षदर्शीनी दिली आहे.

कोपरगाव नदी पात्रात नुकतेच जलसंपदा विभागाने पाणी सोडले असून नदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यावर फळ्या टाकलेल्या असल्याने पाण्याची पातळी वाढलेली आहे.परिणामस्वरूप नदीवरील पाण्याची पातळी वाढुन खोली वाढलेली आहे.सदर तरुणाने दुपारी दोनच्या सुमारास नदीत उडी मारून आपली जीवन यात्रा संपवली आहे.त्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
सदर प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात अद्याप गुन्हा दाखल झालेली नाही.या प्रकरणी काही तरुण सदर पुलावरून जात असताना एका तरुणाने नदीत पुलावरून उडी मारली असल्याचे पाहिले होते.आधी त्यांना वाटले की ‘तो’ पोहण्यासाठी गेला असावा असा अंदाज होता.मात्र बराच वेळ होऊनही तो बाहेर न आल्याने त्या प्रसाद शेलार या तरुणाने नदीत उडी मारून त्याला शोधण्याचा प्रयत्न करून पाहिला मात्र तो सापडला नाही अशी माहिती प्रत्यक्षदर्शीनी दिली आहे.दरम्यान या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी अज्ञात कारणाने त्यास प्रतीसाद दिला नाही.

त्या नंतर त्यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात या प्रकरणी खबर दिली असून सदर तरुणांचे नाव आकाश नारायण कुंढारे (वय-२५) असल्याचे समजते.तो मनोरुग्ण असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.त्याने आईकडे काही रकमेची मागणी केली होती.मात्र तिने ते देण्यास नकार दिल्याने हि दुर्दैवी घटना उघड झाली आहे.या घटननेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close