जाहिरात-9423439946
संपादकीय

राज्याच्या सहकारातील,”योद्धा शेतकरी” नेता हरपला

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(नानासाहेब जवरे)

सहकारातील ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांचे आज पहाटे नाशिक येथील खाजगी रुग्णालयात वृद्धापकाळाने निधन झाले आहे.वयाच्या ९४ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.आज सायंकाळी साडेचार वाजता संजीवनी इंजिनीअरिंग कॉलेज येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार शासकीय इतमामात संपन्न झाले आहेत.पाणी प्रश्नी नेहमी आग्रही भुमिका मांडणारे अभ्यासू नेते म्हणून शंकरराव कोल्हे यांनीं ओळख निर्मांण केली होती.

माजी मंत्री स्व.शंकरराव कोल्हे यांनी गोदावरी नदीवर उभारलेले बंधारे हे राज्याला दिशा दर्शक ठरले होते.त्यातून गोदकाठची शेती फुलली होती.त्यातून राज्यात हा प्रयोग राबवला गेला होता.त्याचे श्रेय निर्विवाद त्यांचे होते. जल सिंचनाचा “गोडबोले गेट”हा त्यांचा जगजाहीर प्रयोग होता.१९७६-७७ साली गुजरातमधून गिर गायी आणून दूध धंद्यात बरकत आणली त्याचे श्रेय त्यांनाच जाते.त्यातून तालुक्यात श्वेत क्रांती झाली होती.त्यातूनच त्यांनी गोदावरी दूध संघाची स्थापना केली होती.तो पुढे वादात अडकला होता.

त्यांच्यावर संजीवनी सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर आज दुपारी ४.३० वाजेच्या सुमारास शोकाकुल वातावरणात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.सदर प्रसंगी राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात,भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील,माजी मंत्री राधाकृष्ण विखे,राम शिंदे,अण्णासाहेब म्हस्के,साई संस्थानचे अध्यक्ष आशुतोष काळे,माजी उपाध्यक्ष चंद्रशेखर कदम,गोदावरी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे,आयुक्त,जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले पोलीस अधीक्षक आदी मान्यवरांसह मोठ्या संख्येने नागरिक,समर्थक उपस्थित होते.

स्व.शंकरराव कोल्हे यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात पुणे व अमेरिकेतून उच्च शिक्षण घेऊन येसगाव ग्रामपंचायती पासून सुरु केली होती.त्या नंतर ते कोपरगाव पंचायतीचे सभापती म्हणून १९६२ साली ते कार्यरत होते.या खेरीज १९७२ साली त्यांनी अपक्ष निवडणूक लढवून विधानसभेत प्रवेश केला होता.त्या नंतर १९८५ चा अपवाद वगळता २००४ पर्यंत आमदारपद भूषवले होते.व त्यात शरद पवार मुख्यमंत्री असताना त्यांना १९९१-९३ साली महसूल मंत्री,सहकार मंत्री,परिवहन मंत्री अशा चढत्या क्रमाने विविध राजकीय पदे मिळाली होती.मात्र त्यांना शरद पवार यांनी त्यांच्या आक्रमक स्वभावामुळे एका पदावर जास्त काळ राहु दिले नाही.त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री शिवाजीराव निलंगेकर व सुधाकर नाईक या दोघांचे सरकार मोठ्या संख्येने आमदारांचा पाठिंबा मिळवून कोसळवले होते.त्या नंतर त्यांच्या पासून सावध होऊन शरद पवार यांनी त्यांना १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस स्थापन करूनही व त्यांनी लगेच त्यात प्रवेश दिला खरा पण त्या नंतर कोणत्याही बड्या पदावर नियुक्त केले नाही.उलट त्यांची राजकीय पदांची अधोगती केली होती.२००४ साली त्यांचा आ.अशोक काळे यांनी पराभव केला होता.त्या नंतर त्यांनी निवडणूक लढवली नाही.त्याचे व शरद पवार यांच्यात वितूष्ठ आले होते.त्यांनी व माजी खा.शंकरराव काळे यांनी शरद पवार यांना रयत शिक्षण संस्थेत प्रवेश दिला हि त्यांच्या राजकीय जीवनात मोठी चूक ठरली होती.साई संस्थानच्या पदावर त्यांना आधी डावलून घरातील अन्य सदस्यास नेमले होते.त्यावरून जेष्ठ व कनिष्ठ पवार व त्यांच्यात मोठा वाद निर्माण झाला होता.१९९७ च्या शिर्डी विधानसभां निवडणुकीत राधाकृष्ण विखे यांना पाठिंबा देण्यावरून त्यांचे निष्ठावान कार्यकर्ते स्व.नामदेवराव परजणे व त्यांच्यात मोठा वाद निर्माण झाला होता.त्यातून त्यांच्या हातून नामदेवराव परजणे यांनी गोदावरी दूध संघ काढून घेतला तो कधीही त्यांना परत घेता आला नाही.या लढाईत त्यांच्या व परजणे यांच्या शेकडो कार्यकर्त्यावर शंभरावर गुन्हे दाखल होऊन ऐन दिवाळीत कारागृहाची हवा खावी लागली होती.मात्र त्यांनी आगामी काळात निष्ठावान व कर्तृत्ववान कार्यकर्त्याना नेहमीच दुय्यम स्थान दिले होते.त्यातून अनेक निष्ठावान कार्यकर्ते त्यांच्या पासून दुरावले होते.तालुक्यात विधानसभेची तिरंगी लढत त्यांच्यासाठी नेहमी फायदेशीर राहिली होती.त्यांच्यात व माजी खा.स्व.शंकरराव काळे यांच्यातील,”मिळून राहू,मिळून…” हि युती कायम राहिली व प्रसंगी प्रत्येक निवडणुकीत वरचढ कार्यकर्त्यांचे खच्चीकरण हा कायमचा खेळ बनला होता.त्यांचा हा खेळ अनेक नेत्यांच्या आत्मचरित्रातून पुढे आलेला आहे.व त्याला स्वतः माजी मंत्री कोल्हे यांनी आपल्या आत्मचरित्रात दिला आहे.मात्र तो खेळ पुढच्या पिढ्यातही अद्याप सुरु आहे.ऊस उत्पादकांच्या आलेल्या उसातून प्रतिटन कपात करून उभारलेल्या शिक्षण संस्था पुढे त्यांनी प्रसिद्धीस आणल्या यात शंका नाही.मात्र ऊस उत्पादक सभासदांना किती न्याय मिळाला हा संशोधनाचा विषय आहे.तो आता येथील लिखाणाचा विषय नाही.

त्यांच्या मंत्री पदाच्या कालखंडात आय.ए.एस.अधिकाऱ्यांनी कामावर टाकलेला बहिष्कार चर्चेच्या अग्रस्थानी होता.त्या वेळी विधानसभेत मुख्यमंत्री शरद पवार त्यांनी मध्यस्थी करून त्यावर तोडगा काढला होता.त्यांना १९९९ साली जेष्ठेतेने विधानसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणूनही त्यांची त्यावेळच्या सभागृहाने निवड केली होती.

त्यांनी गोदावरी नदीवर उभारलेले कोल्हापूर पद्धतीचे बंधारे हे राज्याला दिशा दर्शक ठरले होते.त्यातून गोदकाठची शेती मोठ्या प्रमाणावर फुलली होती.त्यातून राज्यात हा प्रयोग राबवला गेला होता.त्याचे श्रेय निर्विवाद त्यांचे होते. जल सिंचनाचा “गोडबोले गेट”हा त्यांचा जगजाहीर प्रयोग होता.१९७६-७७ साली गुजरातमधून गिर गायी आणून दूध धंद्यात बरकत आणली त्याचे श्रेय त्यांनाच जाते.त्यातून तालुक्यात दुधाची श्वेत क्रांती झाली होती.त्यातूनच त्यांनी गोदावरी दूध संघाची स्थापना केली होती.तो पुढे वादात अडकला होता.त्यांच्या कार्यकाळात त्यांनी तत्कालीन जिल्हा नेते स्व.के.बी.रोहमारे यांच्या मदतीने संजीवनी सहकारी साखर कारखान्याची स्थापना केली होती.मात्र त्यांच्यात पुन्हा कधीच संधी झाली नाही.उलट वितुष्ट निर्माण झाले होते.के.बी.चे कार्यकर्तेच पुढे त्यांच्या गटात सामील झाले होते.मात्र त्यांच्यावर कायमच के.बिं.चा वरचष्मा राहिल्याचे दिसून आले होते.त्यांची तत्कालीन महसूल मंत्री बाबुराव भारस्कर यांच्या उपस्थितीत तहसील कार्यालयात आढावा बैठकीत के.बी.आणि त्यांच्यात रंगलेला कलंगीतुरा त्यावेळी राजकीय पातळीवर खूपच चर्चिला गेला होता.याखेरीज त्यांच्या मंत्री पदाच्या कालखंडात आय.ए.एस.अधिकाऱ्यांनी कामावर टाकलेला बहिष्कार चर्चेच्या अग्रस्थानी होता.त्या वेळी विधानसभेत तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी मध्यस्थी करून त्यावर तोडगा काढला होता.त्यांना १९९९ साली जेष्ठेतेने विधानसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणूनही त्यांची त्या वेळच्या सभागृहाने निवड केली होती.पाणी प्रश्नांचा अभ्यास असला तरी त्यांच्या काळात कोपरगावचा शेती सिंचनाचा पाणी प्रश्न कायम तेवत राहिला.मात्र तालुक्याच्या वाट्याचे ११ टी.एम.सी पाणी मात्र कायम दुरावत गेले हि वस्तुस्थिती होती.ती परत कोणालाही आजतागायत दुरुस्त करता आली नाही.निळवंडे कालव्यांचा प्रश्न तसाच स्थापने पासून तब्बल ५२ वर्ष तेवत राहिला.त्यासाठी शेवटी निळवंडे कालवा कृती समीतीस अखेर उच्च व सर्वोच्च न्यायालयाचे उंबरठे झिजवावे लागले.तेंव्हा कुठे तो वर्तमानात निकाली निघत आहे.ते मराठवाडा जलद कालव्यांचे पाणी खडा टाकून अडविण्याचे काम त्यांच्या अंगलट आले होते.वैजापूरचे तत्कालीन स्व.आ.आर.एम.वाणी यांनी त्या विरुद्ध रान पेटवले होते.त्यामुळे त्या पाण्याला वाट मोकळी करून द्यावी लागली होती.उजनी उर्फ रांजणगाव देशमुख उपसा सिंचन योजना हि युती शासनाच्या काळात आकारास आलेली योजना.पण तीचा राजकीय खेळ दुष्काळी तेरा गावांच्या वाट्याला आला होता.आता ती योजना समन्यायी कायदा झाल्याने व पूर पाणी बंद झाल्यामुळे बासनात गुंडाळली आहे.सन-२००६ साली राज्यात “बर्ड फ्ल्यू”आल्यावर कोपरगावात जिल्हा कुक्कुट पालन संघाने आयोजित केलेलं आंदोलन हा त्यावेळी राज्यात चर्चीत राहिलेला मुद्दा होता.अखेर माजी खा.सूर्यभान पाटील वहाडणे यांनी आजारी असतानाही त्यावर मार्ग काढला होता.राज्यात १९९५ साली युती शासन स्थानापन्न झाल्यावर त्यावेळी त्यांनी राज्यात झुणका भाकर योजना सुरु केली होती.त्याला उत्तर देण्यासाठी त्यांनी तालु क्यातील नैऋत्येकडील दुष्काळी १३ गावांना पाण्याऐवजी लोकवर्गणीतून गहू गोळा करून बालकांना लापशीचा कार्यक्रम राबवला होता.त्या वेळी विधानसभेचे माजी सभापती बाळासाहेब भारदे,आक्रांदचे नेते माजी आ.कुमार सप्तर्षी आदी नेत्याना बोलावुंन जिल्ह्यात चर्चा घडवून आणली होती.प्रशासनातील अधिकारी व राजकीय कार्यकर्ते यांच्यावर त्यांची जबरदस्त पकड होती.त्यांची राज्याचे मुख्यमंत्री बनण्याची महत्त्वाकांक्षा लपून राहिली नव्हती.त्यातून दोन मुख्यमंत्र्यांच्या विरुद्ध बऱ्याच आमदारांना घेऊन त्यांनी बंड केले होते.त्यातून तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार आणि त्यांच्यात आतून वितूष्ट आले होते.राज्यात आणि नगर जिल्ह्यात आपल्या आक्रमक स्वभावाने चर्चेत असलेले नेतृत्व आज पहाटे हरपले आहे.त्यांना आमच्या “न्यूजसेवा न्यूज पोर्टल”च्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली !

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close