आरोग्य
कोपरगावातील…या महाविद्यालयात कोविड लसीकरण संपन्न

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव बेट येथील के.जे.सोमैया महाविद्यालयात मराठवाडा ग्रामीण विकास संस्था नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र कोपरगाव व महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने कोविड लसीकरण शिबीर अठरा वर्षापुढील युवकांसाठी आयोजित करण्यात आले होते.त्याचा अनेकांनी लाभ घेतला आहे.
देशात दररोज करोनाचे १५ हजारांहून अधिक रुग्ण आढळून येत आहेत.बहुतांश नागरिकांचे दोन डोस पूर्ण झालेले आहेत. मात्र अनेकांनी बूस्टर डोसकडे पाठ फिरवली आहे.त्यामुळे सरकारनं १८ वर्षांवरील सर्वांना बूस्टर डोस मोफत देण्याची घोषणा केली आहे. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी ही माहिती दिली आहे.त्यासाठी १५ जुलैपासून पुढील ७५ दिवस बूस्टर डोसची मोहीम राबवण्यात येत आहे या पार्श्वभूमीवर हे शिबिर आयोजित करण्यात आले होते.
गेल्या तीन वर्षापासून कोविड महामारीने सर्वांना ग्रासले असतांना लसीकरण हे संजीवनी वरदान ठरलेले आहे.या दृष्टीने महाविद्यालयात लसीकरण शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबिरात १८ वर्षां पुढील सर्वांना कोविशील्ड व कोव्हक्सीन या लसीचा पहिला,दुसरा व बुस्टर डोस देण्यात आला आहे.
या लसीकरण शिबीराचे उदघाटन कोपरगाव तालुका एज्यूकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोक रोहमारे,विश्वस्त संदीप रोहमारे व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.एस.यादव यांच्या हस्ते करण्यात आले.या लसीकरण शिबीरात वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच विद्यार्थी अशा एकूण १४० पेक्षा अधिक सेवकांनी याचा लाभ घेतला आहे.
सदर प्रसंगी एम.जी.व्ही.एस.च्या तालुका समन्वयक श्रीमती अश्विनी बागुल,प्राथमिक आरोग्य केंद्र कोपरगाव येथील अयोग्य सेविका श्रीमती नंदू नवले,श्रीमती रोहिणी नाईक,स्वाती सुपेकर,सुवर्णा वायखिंडे,डाटा ऑपरेटर कृष्णा राक्षे हे उपस्थित होते.या शिबिराचे आयोजन महाविद्यालयाच्या वतीने डॉ.बी.एस. गायकवाड,प्रो.के.एल.गिरमकर,डॉ.जी.डी.देशमुख,डॉ.व्ही.सी.ठाणगे,प्रा.बी. आर.सोनवणे,डॉ.संजय दवंगे यांनी केले.