जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

माजी खा.काळे यांचे विचार प्रेरणादायी-आ.काळे

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

माजी खा.शंकरराव काळे यांचे विचार प्रेरणादायी असून उच्च विचारांच्या माणसांचेच पुतळे उभे राहतात त्यांचे विचार आगामी पिढ्यांना प्रेरणादायी राहतील असा आशावाद कोपरगावचे आ.आशुतोष काळे यांनी नुकताच कोपरगाव पंचायत समितीच्या प्रांगणात व्यक्त केला आहे.

“कोपरगाव लोकसभा मतदारसंघाचे तत्कालीन खा.शंकरराव काळे यांचे शैक्षणिक,सामाजिक योगदान मोठे असून त्यांच्या कार्याचे स्मरण करणे ही खरी त्यांना श्रद्धांजली आहे”-कारभारी आगवन,अध्यक्ष,कर्मवीर शंकरराव काळे मित्र मंडळ.


  माजी खा.शंकरराव काळे यांच्या ९व्या पुण्यतिथी निमित्त त्यांचा पूर्णाकृती पुतळा उभारणीचे कामाचा भूमिपूजन व कार्यकर्ता गौरव सोहळा आ.आशुतोष काळे यांच्या हस्ते तर माजी आ.अशोक काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला त्या वेळी ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ नेते छबुराव आव्हाड हे होते.

 

   सदर प्रसंगी राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे,कोपरगाव नगरपरिषदेचे अध्यक्ष विजय वहाडणे,गोदावरी परजणे दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे,माजी नगराध्यक्ष पद्माकांत कुदळे,जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष विजय बंब,कोपरगाव पंचायत समितीच्या सभापती पौर्णिमा जगधने,उपसभापती अर्जुन काळे,सेनेचे उत्तर जिल्हा प्रमुख राजेंद्र झावरे,संस्थानचे माजी विश्वस्त संभाजी काळे,कर्मवीर काळे कारखाण्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम,कर्मवीर काळे मित्र मंडळाचे अध्यक्ष कारभारी आगवन,गौतम बँकेचे अध्यक्ष बाबासाहेब कोते,संचालक सचिन रोहमारे,चंद्रशेखर कुलकर्णी,राष्ट्र वादीचे तालुकाध्यक्ष माधवराव खिलारी,युवकांचे तालुकाध्यक्ष चारुदत्त सीनगर,नगरपरिषदेचे माजी गटनेते डॉ.अजय गर्जे,कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोक रोहमारे,सेनेचे शहराध्यक्ष कलविंदर दडीयाल,नारायणराव मांजरे,काकासाहेब जावळे,सतिष कृष्णांनी,आदी प्रमुख मान्यवरांसह बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

    सदर प्रसंगी कर्मवीर काळे मित्र मंडळाचे अध्यक्ष कारभारी आगवन यांनी माजी खा.शंकरराव काळे यांचा जीवनपट मांडला त्याचे सहकारातील,शैक्षणिक,सामाजिक कार्याचा आढावा घेतला आहे.

    त्यावेळी माजी खा.स्व.शंकरराव काळे यांचे सहकारी असलेल्या जेष्ठ कार्यकर्त्यांचा सन्मानचिन्ह शाल,श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आलेला आहे.त्यात श्रीधर आभाळे,माजी संचालक छबुराव आव्हाड,मोहनराव आभाळे,एम.टी.रोहमारे,रामकृष्ण बनकर,बाबासाहेब कोते,सिकंदर चांद पटेल,पुणतांबा ग्रामपंचायतीचे माजी सरपंच मुरलीधर थोरात,कैलास ठोळे,भगवंतराव देवकर,जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष विजय बंब,आदींचा समावेश आहे.

   यावेळी पुतळ्याच्या परवानगीसाठी ज्या मान्यवरांनी योगदान दिले त्यां जिल्हा परिषद अध्यक्ष राजश्री घुले,कोपरगाव नगरपरिषदेचे नगराध्यक्ष विजय वहाडणे,गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी,जिल्हा परिषद उपअभियंता उत्तम पवार,जिल्हा परिषद सदस्य,कोपरगाव पंचायत समिती पदाधिकारी सदस्य आदींच्या कार्याचा गौरव संयोजकांनी केला आहे.

   कार्यक्रमाचे प्रास्तविक कोपरगाव पंचायत समितीचे उपसभापती अर्जुन काळे यांनी केले तर सूत्रसंचलन गोरक्षनाथ चव्हाण सर यांनी केले तर उपस्थितांचे आभार माजी संचालक नारायणराव मांजरे यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close