जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

हजेरी पटावरील सर्वच विद्यार्थ्यांना गणवेशाचे वाटप करावे-मागणी

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)
महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाच्यावतीने सर्वशिक्षा अभियानांतर्गत राज्यातील सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वाटपाचा उपक्रम राबविला जातो.परंतु हा उपक्रम राबवीत असताना फक्त मागासवर्गीय विद्यार्थ्यांनाच याचा लाभ घेता येतो.सरकारी शाळेत शिकणारी सर्वच मुले ही कष्टकरी, शेतकरी,मजूर,हातावर पोट भरणाऱ्या गरीब कुटुंबातील असतात त्यामुळे गणवेश वाटप करताना मर्यादा न ठेवता सरसकट १०० टक्के विद्यार्थ्यांना ते वाटप करावेत अशी मागणी अहमदनगर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाचे सदस्य राजेश परजणे यांनी शासनाकडे नुकतीच केली आहे.

राज्याच्या शिक्षण विभागामार्फत गणवेश वाटप करताना त्यात मागासवर्गीय मुलांचाच सामावेश असतो.इतर मुले मात्र गणवेशापासून वंचित राहतात. कित्येक दिवस ती मुले विना गणवेशाचे शाळेत येतात.यावर्षी तर कोरोनासारख्या महामारीमुळे पालकांची आर्थिक परिस्थिती अतिशय बिकट झालेली असल्याने आपल्या पाल्यांसाठी गणवेश खरेदी करणे त्यांना अवघड झालेले आहे.त्यात गणवेश खरेदी अनिवार्य असल्याने पालकांसमोर मोठा पेच निर्माण झालेला आहे-राजेश परजणे

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व शालेय शिक्षणमंत्री वर्षाताई गायकवाड यांना पाठविलेल्या पत्रात श्री परजणे यांनी पुढे म्हटले आहे की,”सर्व शिक्षा अभियान, राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान व शिक्षकांचे शिक्षण केंद्र पुरस्कृत योजनांचे एकत्रिकरण करण्यात येवून गणवेश वाटपाचा उपक्रम प्रत्येक शाळा स्तरावर दरवर्षी राबविला जातो. जिल्हा परिषदा,महानगरपालिकांच्या सरकारी शाळेतील विद्यार्थ्यांसाठी गणवेशाचा उपक्रम राबविणे हे समुहभावाचे आणि शिस्तीचे प्रतिक मानले जाते. कारण शाळेचा गणवेश अंगावर चढवल्यानंतरच मुलांना विद्यार्थी म्हणून ओळख मिळते. प्रत्येक विद्यार्थ्याने शाळेच्या गणवेशामध्येच शाळेत यावे असा शाळेचा नियम आहे. त्यासाठी प्रत्येक पालकांनी आपल्या पाल्यास नियमितपणे गणवेशामध्येच शाळेत पाठवावे अशा सूचनाही देण्यात आलेल्या आहेत.

शिक्षण विभागामार्फत गणवेश वाटप करताना त्यात मागासवर्गीय मुलांचाच सामावेश असतो. इतर मुले मात्र गणवेशापासून वंचित राहतात. कित्येक दिवस ती मुले विना गणवेशाचे शाळेत येतात. यावर्षी तर कोरोनासारख्या महामारीमुळे पालकांची आर्थिक परिस्थिती अतिशय बिकट झालेली असल्याने आपल्या पाल्यांसाठी गणवेश खरेदी करणे त्यांना अवघड झालेले आहे. त्यात गणवेश खरेदी अनिवार्य असल्याने पालकांसमोर मोठा पेच निर्माण झालेला आहे.या गंभिर परिस्थितीचा विचार होवून सरकारी शाळांमधील मुलांना गणवेश वाटप करताना कोणतीही मर्यादा न ठेवता हजेरी पटावरील सर्वच मुलांना या उक्रमाचा लाभ मिळवून द्यावा अशीही मागणी श्री परजणे यांनी शेवटी पत्राद्वारे केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close