जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

महिला डॉक्टरचा विनयभंग,कोपरगावात गुन्हा दाखल

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहरातील एक उच्च शिक्षित डॉक्टर महिलेचा एका अज्ञात इसमाने भ्रमणध्वनिवरून संपर्क साधून व्हाट्सअपच्या सहाय्याने अश्लील चलचित्र,छायाचित्र,संदेश,दृकश्राव्य संवाद साधून या महिलेशी जवळीक साधण्याचा व फिर्यादी महिलेस लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केल्या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

आधुनिक काळातील मोबाईल फोन हे संभाषणाखेरीज महाजाल (इंटरनेट) न्याहाळणे,लेखी लघुसंदेशांची देवाणघेवाण,गाणी ऐकणे,छायाचित्र काढणे,रेडियो ऐकणे,जीपीएस वापरणे,पैसे देणे,काढणे इत्यादी कामांकरिता वापरले जातात. हे याचे सदुपयोग दिसत असले तरी या साधनांचा दुरुपयोग करणारे महाभाग कमी नाही याचा दाहक अनुभव जगाच्या गाठी आहे.तसाच अनुभव सध्या कोपरगाव येथील एका महिला डॉक्टरला आला आहे.

भ्रमणध्वनी हे एक इलेक्ट्रॉनिक्स उपकरण (यंत्र) असून याचा दूरसंचारासाठी उपयोग केला जातो.याला इंग्रजीमध्ये मोबाईल फोन (मोबाईल) किंवा सेल्युलर फोन (सेल फोन) असे म्हणतात.भ्रमणध्वनीच्या सहाय्याने संभाषणाची व माहितीची देवाणघेवाण करता येते.पारंपरिक दूरध्वनी उपकरणे घरामध्ये एकाच जागी ठेवून वापरावी लागतात.मात्र आधुनिक काळातील मोबाईल फोन हे संभाषणाखेरीज महाजाल (इंटरनेट) न्याहाळणे,लेखी लघुसंदेशांची देवाणघेवाण,गाणी ऐकणे,छायाचित्र काढणे,रेडियो ऐकणे,जीपीएस वापरणे,पैसे देणे,काढणे इत्यादी कामांकरिता वापरले जातात. हे याचे सदुपयोग दिसत असले तरी या साधनांचा दुरुपयोग करणारे महाभाग कमी नाही याचा दाहक अनुभव जगाच्या गाठी आहे.तसाच अनुभव सध्या कोपरगाव येथील एका महिला डॉक्टरला आला आहे.त्यांना एका अज्ञात व्यक्तीने मो.क्रं.९११९४४३७७७,८८०६३०२९२१,९०७५३५६८५२ या भ्रमणध्वनी क्रमांकावरून दि.९ जून ते १२ जून या कालावधीत रात्री सात ते अकरा वाजेच्या दरम्यान संपर्क साधून फिर्यादी माहिलेच्या भ्रमणध्वनीवरील व्हॉट्सअपवर अश्लील चलचित्रफीत, फोटो,संदेश,चलचित्रसंवाद साधून जवळीक साधण्याचा प्रयत्न करून फिर्यादीला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करून विनयभंग केला आहे.या प्रकरणी या महिलेने कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरुद्ध फिर्यादी दाखल केली आहे.

कोपरगाव शहर पोलिसानी या प्रकरणी अज्ञात आरोपी विरुद्ध आपल्या दप्तरी गु.र.न.२१०/२०२० भा.द.वि.कलम ३५४(ड),५०९,सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० कलम ६७ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास शिर्डीचे उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर हे करीत आहेत.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close