जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

कोपरगाव तालुक्यात सर्पदंशाने अल्पवयीन मुलींचे निधन

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव ग्रामपंचायत हद्दीत रहिवासी असलेली अल्पवयीन मुलगी कु.अश्विनी संजय कोळेकर (वय-०९ वर्ष) हिला सर्पदंश होऊन त्यात तिचे नुकतेच निधन झालं आहे.तिला उपचारार्थ कोपरगाव ग्रामीण रुग्णालायत दाखल करण्यात आले होते.मात्र उपचार करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला मृत घोषित केले आहे.

सरकारी आकडेवारीनुसार सोन लाखाहून अधिक मृत्यू सर्पदंशाने होत आहे.सरकारी रुग्णालयातल्या मृत्यूंवरून काढली आहे.प्रत्यक्षात सर्पदंश झालेल्या कित्येक व्यक्ती सरकारी रुग्णालयापर्यंत येत नाहीत.फक्त ग्रामीण भागाचा विचार केला तर हे प्रमाण आणखी जास्त होईल.कारण बहुतांश घटना ग्रामीण भागातच घडतात.एक़ा अभ्यासानुसार सर्पदंशाच्या ८८ टक्के घटना ग्रामीण भागात होतात.अशीच घटना कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव येथे एका अल्पवयीन मुलीबाबत घडली आहे.

आपल्या देशात सर्पदंशाच्या दरवर्षी सुमारे दोन लाख घटना घडतात आणि त्यात सुमारे पंधरा हजार व्यक्ती दगावतात.दर लाख लोकसंख्येत दरवर्षी सर्पदंशामुळे दोन-तीन व्यक्ती मरण पावतात.पण खरा आकडा यापेक्षा खूप जास्त असेल.कारण ही आकडेवारी केवळ सरकारी रुग्णालयातल्या मृत्यूंवरून काढली आहे.प्रत्यक्षात सर्पदंश झालेल्या कित्येक व्यक्ती सरकारी रुग्णालयापर्यंत येत नाहीत.फक्त ग्रामीण भागाचा विचार केला तर हे प्रमाण आणखी जास्त होईल.कारण बहुतांश घटना ग्रामीण भागातच घडतात.एक़ा अभ्यासानुसार सर्पदंशाच्या ८८ टक्के घटना ग्रामीण भागात होतात.अशीच घटना कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव येथे एका अल्पवयीन मुलीबाबत घडली आहे.

या प्रकरणी कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी यांनी कोपरगाव तलाउक पोलीस ठण्यात अकस्मात मृत्यूची खबर दिली असून कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात काल ०६.४३ वाजेच्या सुमारास अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.घटनास्थळी पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव व पोलीस नाईक आर.टी.चव्हाण यांनी आपल्या सहकाऱ्यासमवेत भेट दिली आहे.

कोपरगाव तालुका पोलिसांनीं या प्रकरणी आपल्या दप्तरी अकस्मात मृत्यू नोंद क्रं.३२/२०२२ सी.आर.पी.सी.१७४ प्रमाणे नोंद केली आहे.
दरम्यान या घटनेचा पुढील तपास कोपरगाव तालुका पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक आर.टी.चव्हाण हे करित आहेत.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close