गुन्हे विषयक
कोपरगाव तालुक्यात मोठा दरोडा,३.६० लाखांचा ऐवज लंपास

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील दहिगाव बोलका ग्रामपंचायत हद्दीत रहिवासी असलेल्या भाऊसाहेब पंढरीनाथ इंगळे यांच्या घरी आज दि.०६ मे रोजी पहाटे २.३० वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यानी घराची तोडून चाकूचा व एअरगनचा धाक दाखवून त्यांच्या घरातील विविध दागिने,रोख रक्कम असा सुमारे ०३ लाख ६५ हजार ६०० रुपयांचा ऐवज लंपास केला असून या प्रकरणी इंगळे यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
दहिगाव बोलका शिवारात भाऊसाहेब इंगळे यांच्या वस्तीवर प्रवेश करून अज्ञात चार चोरट्यानी नजीक शेजारी वस्ती नसल्याचे पाहून अज्ञात पंचविशीतील चार चोरट्यांनीं त्यांच्या घरावर पाळत ठेऊन आज पहाटे अडीच वाजेच्या सुमारास चार चोरट्यांनीं घराची कडी तोडून घरात घुसून त्यांना चाकूचा व बंदुकीचा धाक दाखवून त्यांच्या अंगावरील सोन्या-नाण्याचे दागिने व रोख रक्कम असा सुमारे ०३ लाख ६५ हजार ६०० रुपयांचा ऐवज बळजबरीने लंपास केला आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,”फिर्यादी भाऊसाहेब इंगळे हे सेवानिवृत्त रसायण तज्ञ असून ते सेवानिवृत्ती नंतर आपले जीवन आपल्या पत्नीसह गावी जगत आहे.त्यांची वस्ती दहिगाव बोलका येथे असून ती दहिगाव बोलका ते संवत्सर रेल्वे स्टेशन मार्गावर गावापासून केवळ शंभर मीटर अंतरावर आहे.त्यांचा शेती व्यवसाय असून त्यास जोडधंदा म्हणून ते शेळीपालन करत आहे.त्यांची दोन मुले नोकरी मिमित्त परदेशात आहेत.नजीक शेजारी वस्ती नसल्याचे पाहून अज्ञात पंचविशीतील चार चोरट्यांनीं त्यात एक जाड तर तीन मध्यम होते.एकाचे पोट पुढे आलेले होते.तर तिघांच्या अंगात फुल पॅन्ट व अंगात शर्ट होता.त्यांच्या घरावर पाळत ठेऊन आज पहाटे अडीच वाजेच्या सुमारास चार चोरट्यांनीं घराची कडी तोडून घरात घुसून त्यांना चाकूचा व बंदुकीचा धाक दाखवून त्यांच्या अंगावरील सोन्या-नाण्याचे दागिने व रोख रक्कम असा सुमारे ०३ लाख ६५ हजार ६०० रुपयांचा ऐवज बळजबरीने लंपास केला आहे.
गेलेल्या मालात ७० हजार रूपये रोख त्यात दोनशे,पाचशे दाराच्या नोटांचा समावेश आहे.तर या खेरीज ९६ हजार रूपये किमतीचे ०८ तोळे वजनाच्या सोन्याच्या चार बांगड्या,४८ हजार रुपये किमतीचे चार तोळे वजनाचे गंठनं,त्यात सोन्याची चैन,सोन्याच्या दोन पळ्या व काळे मणी आदींचा समावेश आहे.या शिवाय ०१ लाख ४० हजार रुपये किमतीचे सात ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या तीन अंगठ्या,त्यात एक खड्याची व एक बदामाची,एक चौकोनी आदींचास समावेश आहे.या शिवाय रोख ०३ हजार ६०० रुपये किमतीच्या तीन ग्रॅम वजनाच्या रिंगा एक जोड,०३ हजार रोख रक्कम पेटित ठेवलेली,त्यात १०० व ५०० दराच्या नोटा,त्याशिवाय ०५ हजार रुपये किमतीची एक एअरगन (स्वामीराज सुखदेव बागल यांचे घरातील) असा एकूण ०३ लाख ६५ हजार ६०० रुपयांचा ऐवज घेऊन पोबारा केला आहे.
घटनेपूर्वी त्यांनी आधी १२.३० वाजेच्या सुमारास स्वामीराज बागल यांच्या घरात चोरी केली होती.मात्र तेथे केवळ ८०० रुपयांचा ऐवज मिळाला होता.
या प्रकरणी फिर्यादी भाऊसाहेब इंगळे यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात आज तीन वाजेच्या सुमारास गुन्हा दाखल केला आहे.घटनस्थळी पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी आपल्या सहकाऱ्यासमवेत भेट दिली आहे.
कोपरगाव तालुका पोलिसांनीं या प्रकरणी आपल्या दप्तरी गुन्हा क्रं.१६८/२०२२ भा.द.वि.कलम ३९२,३४ प्रमाणे आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान या घटनेचा पुढील तपास शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव हे करित आहेत.